chitika

Showing posts with label marathi katha. Show all posts
Showing posts with label marathi katha. Show all posts

Saturday, 13 October 2012

                         स्वप्नांच्या पलीकडले 

कोल्हापूरची मीटिंग संपली आणि मी घरी जाण्यासाठी एस टी पकडली. मीटिंग म्हणावी तशी यशस्वी झाली नव्हती . मन जरा खट्टू झालं होतं. तरी बरं की एस टी तरी लगेच मिळाली. . एस टी वाटेला लागली आणि मग सकाळपासून मनाआड केलेले घरचे विचार मनात पिंगा घालू लागले .
घरातून निघतानाच सुलाभाशी , माझ्या पत्नीशी झालेला वाद मला आठवला . किती क्षुल्लक कारणावरून आम्ही भांडलो होतो ! आजची मीटिंग महत्वाची होती आणि सुलभाला नेमकं आजच गाणगापूर की कोणत्याशा गावाला जायचं होतं ! तिने जायला माझी काहीच हरकत नव्हती. पण तिला माझ्याच बरोबर जायचं होतं ! तीर्थाच्या ठिकाणी जाण्यात मला मुळीच रस नव्हता . सुलभाला ते ठाऊक होतंच! पण या वेळी मात्र ती का
कोण जाणे, कधी नव्हे ती हट्टाला पेटली होती ! मी मग तावातावाने तिचा निरोप न घेताच घरातून निघालो होतो.
वेळेवर एस टी सुटल्यावर थोड्या वेळाने मन शांत झाल्यावर मला भांडल्याबद्दल पश्चात्ताप व्हायला लागला . मी तिला फोन करायचा प्रयत्न केला. पण रागावलेल्या सुलभाने स्वीच ऑफ करून ठेवला होता. त्यामुळे माझा नाईलाज झाला. मिटींगमध्ये पण मी मधून मधून अस्वस्थ होत होतो . आता तर घरी जातो कधी आणि तिची समजूत घालतो कधी असे मला झाले होते. तिला खुश करण्यासाठी काय भेटवस्तू न्यावी याचा मी विचार
करू लागलो .
वास्तविक पहाता आमचा प्रेम विवाह झाला होता. ते पाहता आमचे वैवाहिक आयुष्य अत्यंत सुखी असायला हवे होते. आमचे दोघांचे एकमेकांवर निरतिशय प्रेम असूनही वरचेवर छोट्या छोट्या गोष्टींवरून आमचे वाद व्हायचे आणि वातावरणात ताण यायचा . आज देखील तसेच झाले होते.
आमच्या लग्नाला सात वर्षे झाली तरी आम्हाला अपत्य प्राप्ति झालेली नव्हती. ते देखील आमच्या काळजीचे कारण ठरत होते. तसे तीन वर्षे झाल्यानंतर मूल झाले नाही म्हणून आम्ही साऱ्या चाचण्या करून घेतल्या होत्या. दोघांमध्ये काहीही दोष नव्हता. आता देवाची कृपा कधी होते त्याची वाट बघण्यावाचून हातात काहीच नव्हते. आजची गाणगापुरची वारी कदाचित त्यासाठीच असण्याची शक्यता होती आणि म्हणूनच मला भांडून तिच्या भावना दुखावल्याचे वाईट वाटत होते.

सुलाभाचा राग शांत झाला की नाही ते पहावे आणि लवकरच घरी परतत असल्याचे कळवावे म्हणून मी मोबाइल हातात घेतला आणि नंबर डायल करणार इतक्यात चालकाने करकचून ब्रेक दाबल्याचा आवाज आला आणि सफाईदारपणे घाटाची वळणे पार करणारी आमची एस टी वेडी वाकडी हेलपाटत कशीतरी डावीकडे वळून गचका खावून थांबली . सगळेजण भराभरा खाली उतरले . मी देखील उतरलो . बघतो तर काय ! डावीकडे असलेल्या खोल दरीच्या काठावर पुढचे चाक आणि मागचे चाक एका दगडाला अडलेले अशा स्थितीत ती कशी बशी उभी होती ! एक तसूभर जरी पुढे गेली असती तर आम्हा सर्वांचा कपाळमोक्ष निश्चित होता ! सर्वांच्या काळजात अगदी धस्स झालं!
सर्वजण देवाचे आभार मानू लागले. आता त्या बसला त्या स्थितीतून बाहेर काढून मार्गी लागायला दोन तीन तास तरी सहज लागणार असा माझा अंदाज होता. मी सभोवार पहिले. हाकेच्या अंतरावर लहानसे स्थानक दिसत होते. मी तिथे गेलो. तेरगाव नावाचे ते गाव होते. तिथल्या टपरीवर बसून चहा घेता घेता मी विचार करू लागलो . घडलेली घटना आठवून आत्ताही अंगावर काटा येत होता. बसपाशी आलो तर अजूनही बस त्याच स्थितीत होती. मदत मिळायला वेळ लागणार होता. शिवाय एक टायरही पंक्चर झालेले दिसत होते. एकूण परिस्थिती बघता तीन तास तरी लागतील असे वाटत होते. एवढा वेळ कसा आणि कुठे काढावा कळेनासे झाले. मग विचार केला कि खूप दिवसात मनासारखी भटकंती करायला जमले नाही . आता वेळच घालवायचा आहे तर फिरून यावे झाले!
मी आपली पिशवी उचलली . माझ्याजवळ सामान काहीच नव्हते. पिशवी खांद्याला अडकवून मी भटकायला निघालो. निरुद्देश भटकता भटकता मी एका जंगलात येऊन पोहोचलो. चारही बाजूला पसरलेली ती हिरवाई पाहून मन कसं प्रसन्न झालं. मधूनच अस्पष्ट दिसणारी पायवाट धरून मी निघालो . कुठे जायचे ते ठरलेले नव्हतेच. पाय नेतील तिकडे चालत गेलो. बराच वेळ चालत गेल्यावर अचानक ब्रेक लागल्यासारखा थबकलो. पायवाट अचानक संपली होती आणि मी एका जुनाट वाड्यासमोर उभा होतो!

आश्चर्यचकित होऊन मी त्या भव्य वाड्याचे निरीक्षण करू लागलो. एकंदर रंगरूपावरून वाडा खूपच जुना, अगदी इंग्रजांच्याही आधीच्या काळातला असावा असे वाटत होते. त्याच्या नवलाईच्या काळात तो अतिशय आकर्षक असावा अशी खात्री वाटली .काळ्या दगडाचं ते बांधकाम इतकं भक्कम होतं कि काळाच्या ओघाचा त्याच्यावर फारसा परिणाम दिसला नाही. . मधल्या फटीतून झाडे झुडुपे उगवली असली तरी त्यामुळे बांधणी सैल झालेली दिसली नाही. पुढे जावे कि नाही याचा विचार करण्यात थोडा वेळ गेला. अखेर उत्सुकतेने मला मागे फिरू दिले नाही . मी पुढे जाऊन वाड्याच्या प्रवेश द्वारातून म्हणजे दार नसलेली चौकट ओलांडून आत गेलो.
आत गेल्यावर तर माझ्या आश्चर्याला पारावारच राहिला नाही. एका भव्य दिवाणखान्यात आल्याचे मला जाणवले. आतील उंचच उंच छत बघायला मान पूर्ण मागे
न्यावी लागली. कधीकाळी झगझगीत असणारे झुंबर आता असंख्य कोलीष्टकांसह लटकत होतं. भिंतींवर मोठमोठ्या तसबिरींच्या रिकाम्या चौकटी जागोजागी
दिसत होत्या. त्यातील चित्रे मूल्यवान असल्यामुळे कोणीतरी काढून घेतली असावीत बहुधा ! एका तसबिरीतले चित्र मात्र शाबूत होते. त्यांनी माझे लक्ष्य वेधून घेतले.
कुण्या ऐतिहासिक पुरुषाचे ते तैलचित्र दिसत होते. मी त्यावरची धूळ शक्य तितकी पुसली . काळाच्या ओघात अस्पष्ट झाले असले तरी एका
उमद्या , ऐटबाज पुरुषाचे ते चित्र होते हे कळत होते.
त्याच्या अक्कडबाज मिशा तर विशेष लक्षात राहण्याजोग्या होत्या.दिवाणखाना पाहून झाल्यावर मी आत गेलो. आत जाणारा दरवाजा अर्धवट बंद
अवस्थेत होता.
मी तो पूर्ण उघडण्याचा प्रयत्न करताच तो मोठ्याने करकरत उघडला . आतल्या बाजूला माजघर असावे. ते देखील दिवाणखान्याला
शोभेल असे विस्तीर्ण होते. त्याच्या भिंतीत मोठ मोठे कोनाडे दिसत होते. त्याचा वापर कशासाठी करत असतील याचा मी विचार करू लागलो.
कदाचित मशाल किंवा उजेडाचे जे कोणते साधन असेल ते ठेवण्यासाठी त्याचा वापर करत
असावेत, कारण माजघरात उजेड येण्याकरिता कुठलाच
मार्ग दिसत नव्हता. माजघरात प्रवेश करण्याच्या विरुद्ध दिशेला भिंतीमध्ये दोन दरवाजे असावेत. कारण तिथे आता फक्त चौकटी उरल्या होत्या.
त्यातल्या एका चौकटी मधून मी आत गेलो. ते बहुधा स्वयंपाकघर असावे.
त्यात चुलाणे लावण्यासाठी उपयुक्त वाटणारी ओट्या सारखी जागा
दिसली. त्याच्या विरुद्ध दिशेला दोन पायरया उतरून एक छोटीशी खोली दिसली.
बहुधा देवघर असावे. कारण आमच्या घरी आजही अशी स्वतंत्र पण
लहानशी खोली देवासाठी आहे. त्या खोलीलाही खिडकी दिसली नाही.
स्वयंपाक घरासारख्या जागेला मात्र खिडक्या होत्या. त्यातून येईल तीच हवा
देवघरातही खेळावी अशी योजना असावी असे वाटले. माजघराच्या दुसऱ्या चौकटीतून आत गेल्यावर तीन चार लहान लहान खोल्या दिसल्या.
ती कदाचित कोठीघरे किंवा गेस्टरूम असाव्यात. त्या खोल्यांच्या वरच्या बाजूला झरोके होते. मागच्या बाजूला बरीच मोठी मोकळी जागा किंवा परसू
होते. मात्र अंघोळ करण्याला योग्य अशी जागा दिसली नाही. कदाचित उघड्यावरच करत असावेत. किंवा तट्टा लावून तात्पुरता आडोसा करत असतील. एका बाजूला वर जाण्यासाठी जिना दिसला. वर जावे कि नाही याचा विचार पडला. पण तेवढेच कशाला सोडायचे असा विचार करून पायरी
चढायला सुरुवात केली. पडझड झालेल्या असल्या तरी चढता येण्याजोग्या होत्या पायऱ्या. वरती पण खालच्यासारख्याच खोल्या होत्या.
पण जास्त
हवेशीर होत्या. गम्मत म्हणजे इतक्या मोठ्या वाड्यात एकही वस्तू नव्हती! त्या पुरुषाच्या तसबिरीचाच काय तो अपवाद! काही वस्तू दिसल्या
असत्या तर! तिथे राहणाऱ्या लोकांविषयी काहीतरी जाणून घेता आलं असतं! माझा जीव हळहळला . ही वास्तू इतकी दुर्लक्षित का बरे असावी? कदाचित भूताखेताच्या वावड्या उडालेल्या असू शकतील! पण अशा वावड्या उडवणारे अवैध कामांसाठी तिचा उपयोग करतात. इथे तसेही काही दिसत
नव्हते .
आपण ह्या वास्तूचा उपयोग केला तर? विजेसारखा एक विचार माझ्या मनात चमकून गेला.
एखाद्या विशिष्ट कामासाठी म्हणून नव्हे पण एकांतात काही
करायचे असल्यास ह्या वस्तूचा उपयोग होऊ शकेल एवढेच मला वाटून गेले. तो विचार मी माझ्या मनाच्या कप्प्यात ठेवून दिला.एव्हाना बराच वेळ झाला होता.
पोटात भूक लागली होती. जवळ काहीच नव्हते. नाईलाजाने त्या वास्तूकडे पुन्हा पुन्हा वळून
बघत परत फिरलो.

गावात आल्यावर पहिले तर माझी एस टी
दुरुस्त होऊन निघून गेली होती. त्याची मला काळजी नव्हती. माझ्या भटकंतीची आवड
असलेल्या मनाला जो खजिना गवसला होता त्यापुढे त्या गेलेल्या एस टी चे दुक्ख काहीच नव्हते. तिथे असलेल्या एकुलत्या एका भिकार खानावळीत मी जेवलो. जेवताना सहज म्हणून त्या वाड्याबद्दल काही माहिती मिळाली तर पाहावं
म्हणून जेवणाऱ्या लोकांना विचारायचा प्रयत्न केला, पण गावातला एक ओसाड वाडा या पलीकडे कोणाला काहीच माहिती नव्हती.
मला मात्र तो वाडा आवडला. पुढच्या वेळी आपल्या भटकंती ग्रुप ला बरोबर घेऊन यायचे आणि
वस्ती करण्याच्या तयारीने यायचे असे मनाशी ठरवून मी त्या
गावाचा निरोप घेतला. घरी गेल्यावर नेहेमीप्रमाणे माझ्या मित्रांचा कंपू माझ्या भटकंतीची
हकीगत ऐकण्यासाठी उत्सुक होऊन वडाच्या पारावर जमला.
मला दिसलेल्या वाड्याबद्दल ऐकून अपेक्षेप्रमाणे तिथे जायला सर्वजण उत्सुक झाले. पंधरा दिवसानंतर शुक्रवारी सुट्टी येत होती. तिचा उपयोग करून तो वाडा
पहायला जायचे ठरवून टाकले आम्ही! पंधरा दिवस मोठ्या मुश्किलीने काटले. शुक्रवारी सकाळी लवकरची एस टी पकडून आम्ही तेरगावला पोहोचलो.
मधले
पंधरा दिवस पाउस पडला नसावा असे मला वाटले. मागच्या वेळी दिसलेली हिरवाई मला कुठेच दिसेना!
सगळीकडे वाळलेल्या पिवळ्या गवताचे साम्राज्य
पसरले होते. मी त्या दिवसाच्या आठवणी मनात जागवत त्या दिवशीची पायवाट शोधू लागलो. हिरव्यागार
गवतात स्पष्ट दिसलेली टी पायवाट पिवळ्या गवतात मला काही केल्या
सापडेना! कोणाला विचारावे म्हटले तर त्या दिवशीचा गावकरी लोकांचा अनुभव चांगलाच लक्षात होता. कोणी सांगणारा भेटणार नाही याची खात्री होती. मला मूर्खात काढणारेच भेटले असते.

मी वेगवेगळ्या ठिकाणी आतपर्यंत जाऊन खूप शोध घेतला. सारी मेहेनत व्यर्थ! सगळ्या मित्राना मी त्यांना थापा मारल्या असे वाटू लागले. त्यांचा
गैरसमज दूर करण्याचा मार्ग मला दिसेना! शेवटी नाईलाजाने आम्ही परत फिरलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी परत येउन वाडा शोधून काढावा असा माझा विचार होता, पण कोणीच त्याला दुजोरा दिला नाही. सर्वजण रात्रीच्या एस टी ने परत गेले. मी मात्र हट्टाने थांबलो. मी खोटे बोलत नव्हतो
हे त्यांना पटवून दिल्याशिवाय मला चैन कसे पडणार? तिथल्या एकुलत्या एका गेस्ट हाउस मध्ये मी अंग टाकले.
रात्रभर मला वाडा सापडल्याची
स्वप्ने पडत राहिली. सकाळ होताच मी वाडा शोधायला निघालो. मी कागद पेन्सिल बरोबर घेतली . रस्त्याचा नकाशा तयार करायला. पुढच्या वेळी
सर्वांना नेण्यासाठी उपयोगी पडला असता.

मी प्रथम एस टी स्थानकावर गेलो. अपघाताच्या दिवशी गेलो तसा पुन्हा गेलो; आश्चर्याची गोष्ट म्हणजे काल मला शोध शोध शोधूनही न सापडलेली
पायवाट आज अगदी सहज दिसली. मी कमालीचा गोंधळलो. काल मी दुसऱ्याच कुठल्यातरी जागी गेलो होतो कि काय? कारण कालच्या जागी गवत
पूर्ण वाळलेले होते तर आज मागच्या वेळी दिसलेली हिरवाई कायम होती. मी अतिशय आनंदित झालो. झपाझप पावले टाकत पायवाटेने निघालो.
वाड्यासमोर आल्यावर तर माझ्या आश्चर्याला पारावारच राहिला नाही! वाडा आतां ओसाड राहिलेला नव्हता! त्याची रंगरंगोटी झालेली होती! झाडे झुडुपे साफ झाली होती.सर्व दारे खिडक्या दुरुस्त झालेल्या दिसत होत्या.एवढेच नव्हे तर वाड्याच्या प्रचंड दारासमोर सुंदरशी रांगोळी रेखलेली दिसत होती!
कोणीतरी तिथे रहायला आले होते खास! मी वाड्याच्या जवळ गेलो. आतून लहान मुलाच्या बोलण्याचा आवाज ऐकू येत होता. एखाद्या मुलाने कसलातरी हट्ट करावा आणि आईने त्याला रागे भरावे अशा प्रकारचे ते आवाज होते. आवाज अशाकरता म्हणतो कारण हे सर्व संभाषण ज्या भाषेत चालू होते ती मला मुळीच कळत नव्हती . तामिळ , तेलगु किंवा अशीच कोणती तरी ती असावी असा मी अंदाज बांधला. तो वाडा कोणी घेतला,तिथे आलेले नवीन लोक कोण असावेत हे जाणून घेण्याची मला खूपच उत्सुकता होती.

तिथे नवीन आलेले लोक कोण असतील ? कुठून आलेले असतील ते सर्व जाणून घेण्याची मला अनावर उत्सुकता निर्माण झाली. भाषेचा प्रश्न समोर
दिसत होताच , तरीसुद्धा मी उत्सुकतेपोटी पुढे झालो. दार वाजवणार इतक्यात कोणीतरी माणूस काही कामासाठी कदाचित बाहेर आला. दार वाजवण्याच्या
तयारीत मला पाहून कोण तुम्ही? काय पाहिजे? अशासारखे प्रश्न विचारू लागला .अर्थातच ते
त्याच्या भाषेतच होते. मी त्याच्या हावभावावरून त्यांचा अंदाज
बांधत होतो . तेवढ्यात आतून कोणीतरी या संवादाबद्दल काहीतरी विचारले असावे बहुधा,कारण आतून बायकी आवाजात प्रश्नार्थक स्वर आला व त्याने दाराकडे
तोंड करून उत्तर दिले . आतून पुन्हा काहीतरी प्रश्न आला. त्यावर त्याने माझ्याकडे निरखून पहिले आणि अचानक जोरात ओरडला. ओरडला कसला,किंचाळलाच ! काहीतरी अगम्य शब्द उच्चारात त्याने आत धूम ठोकली. माझा आश्चर्याने जणू पुतळाच झाला. त्याला इतके कसले आश्चर्य वाटले असावे ते मला कळेना. आता पुढे काय करावे ते हि कळेनासे झाले. काही क्षण असेच शांततेत गेले. अचानक आतून गलबला ऐकू येऊ लागला .एक प्रौढा आतून बाहेर आली, माझ्याकडे नीट निरखून बघितले आणि अचानक ती देखील त्या पहिल्या माणसाप्रमाणे ओरडत आत पळाली,
मग तर काय एकामागोमाग एक अशी अनेक लहान मोठी माणसे बाहेर आली आणि मला बघून चकित होऊन आत पळाली. या सगळ्या गोंधळात मला जे विचारायचे होते ते कोणीकडेच राहिले !

काय करावे ते मला कळेना! तिथून निघून जायलाही मन होईना ! काही वेळ अशा स्थितीत निघून गेला आणि एकदम बऱ्याचशा बायकांचा घोळका
बाहेर आला. सर्वांनी माझ्याकडे हसून बघत आत येण्याची खूण केली.

मी माझ्याही नकळत पुढे झालो. प्रौढ वाटणाऱ्या त्या बाईने माझ्या पायावर पाणी घातले. नंतर तिच्या मागे उभी असलेली तरुण स्त्री पुढे झाली. तिने झिरझिरीत ओढणीने तोंड झाकून
घेतले होते. तिने मला औक्षण केले. त्यानंतर मला आत यायला वाट करून देत सगळ्याजणी मागे झाल्या. ह्या सर्व प्रकारामुळे गोंधळलेला मी आत जायला कचरू लागलो. त्यावर दोघा समवयस्क माणसांनी माझा हात हळुवारपणे धरत
आग्रहपूर्वक आत नेलं. मी भीत भीत आत गेलो . तोच दिवाणखाना
होता ! पण आता झुंबर लखलखत होती ! लोड तक्क्याची बैठक अंथरलेली होती .तिथे काही वयस्कर लोक बसलेले होते.
नकळत मी त्यांच्यापुढे वाकलो. त्यांनी जवळ घेत आशीर्वाद दिला . ते सर्व आपापसात चर्चा करू लागले. मला त्यांची भाषा कळत नव्हती पण एकंदर त्यांच्या वागण्या वरून ते मला दुसराच कोणीतरी समजत होते एवढे माझ्या लक्षात आले. "तुम्ही समजत आहात तो मी नव्हे" हे वाक्य मला येत असलेल्या सर्व भाषा वापरून मी
त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण सर्व व्यर्थ ! अखेरीस मी थकलो . गप्प बसून राहिलो .मनातल्या मनात पुढे काय करावे याचा विचार करू लागलो .माणसांनी भरल्या त्या दिवाणखान्यात मी मात्र एकटा पडलो होतो.

जो तो माझ्याकडे कुतूहल भरल्या नजरेने बघत होता आणि माझ्याशी नजरानजर होताच हळूच हसून नजर वळवत होता. हे असं किती वेळ चालणार तेच मला समजेना ! मला बसल्या बसल्या पेंग येऊ लागली . ते पाहून एका वयस्कर माणसाने एका नोकराला काहीतरी सांगितले. त्या नोकराने मला आपल्या मागे येण्याची खूण केली आणि तो चालू लागला.
मी त्या वयस्कर माणसाकडे पहिले. त्याने संमती दर्शक मान हलवली. मी नोकराच्या मागे गेलो. तो मला एका खोलीत घेऊन गेला. मी आधी पाहिलेल्या तीन चार खोल्यांपैकी एक ! ती बेडरूम होती ! प्रशस्त पलंगावर पांढरा स्वच्छ पलंगपोस घातलेला होता.पायागती सुंदरशी चादर ठेवलेली होती. मी इतका थकलो होतो कि कसलाही विचार न करता पलंगावर ताणून दिली. मला केव्हा झोप लागली ते कळलेही नाही.
तासा दोन तासांनी माझी झोप उघडली . मी पहातो तर तो नोकर माझ्या उठण्याचीच वाट पहात असल्यासारखा जमिनीवरच बसून होता. तो माझ्याकडे पाहून कळे न कळेसा हसला . मला त्याने प्यायला पाणी दिले. नंतर "चला" अशा अर्थाची खूण करून तो चालू लागला. मी त्याच्या मागे गेलो.
वाड्याच्या मागच्या अंगाला न्हाणीघर होते. अगदी मला वाटले होते तसेच ! तट्टा लावून केलेले ! मला माझ्या कल्पनाशक्तीचे कौतुक वाटून गेले. माझ्या चेहेऱ्यावर हसू उमटले बहुधा, कारण नोकराच्या चेहेऱ्यावर आश्चर्य उमटलेले मी पहिले. मी गप्पच बसलो. कारण माझ्या हास्याचे कारण त्याला
सांगायचे म्हटले तरी भाषेच्या अडसरामुळे ते शक्य नव्हते. न्हाणीघरात गेलो तर घंगाळात गरम पाणी तर दुसऱ्या हंड्यात साधे पाणी , लोटा वगैरे सारे साहित्य तयार होते. मी मुकाट्याने अंघोळ केली. तो बाहेर उभाच होता. अंघोळीनंतर मी आपले कपडे शोधू लागलो तर त्याने तत्परतेने पुढे येऊन नवा कोरा झब्बा व धोतर दिले. धोतर मला कुठे नेसता यात होते?
मी ते हातात घेऊन विचार करू लागलो कि याला माझी अडचण कशी सांगू? पण त्याने ती न सांगताच ओळखली बहुधा ! त्याने मूकपणे मला
धोतर नेसवून दिले व नेसवताना एक एक स्टेप समजावूनही दिली , म्हणजे दाखवली ! त्यानंतर तो मला माजघरात घेऊन गेला. तिथे सात आठ
पाने मंडळी होती.

केळीच्या पानावर बरेच पदार्थ वाढलेले दिसत होते. पदार्थ ओळखू येत नव्हते पण वास चांगला होता.मी जास्त विचार न करता मला दाखवलेल्या पानावर बसलो. ओळखीचे नव्हते तरी ज्येष्ठ दिसणाऱ्या लोकांना खुणेने नमस्कार केला आणि जेवायला बसलो.
नोकर लोक वाढत होते. मध्येच ती प्रौढ स्त्री आली . सर्वाना,खास करून मला आग्रह करून गेली. मी तिला खुणेनेच स्वयंपाक चांगला झाल्याचे सांगितले. तिला
झालेला अवर्णनीय आनंद तिच्या फुलून आलेल्या चेहेऱ्यावर मला स्पष्ट वाचता आला. जेवणानंतर काय करावे असा प्रश्न पडला. नोकर माणसे कुठल्या न
कुठल्या कामात गुंतली होती . बायकाही कुठेतरी लवंडल्या असाव्यात
कारण कोणीच दिसत नव्हते. माझी झोप झालेली होती . मी हळूच सटकण्याची संधी व जागा दिसते का ते पाहावे म्हणून वाड्यात फिरू लागलो.
वाडा ओसाड होता तेव्हा मी पूर्ण फिरलो होतोच पण आता साधन सामग्रीने भरलेला वाडा बघताना गोंधळायला होत होतं. अचानक मला दिवाणखान्यातील
तस्बिरींची आठवण आली. मी दिवाणखान्यात गेलो. जिथे मी रिकाम्या चौकटी पाहिल्या होत्या तिथे अप्रतीम निसर्गचित्रे दिसत होती. काही ठिकाणी काही व्यक्तींची तैलचित्रे दिसली .
त्यातले एक तैलचित्र मी ताबडतोब ओळखले. अगदी राजबिंड्या ऐटबाज तरुणाचे ते चित्र होते. घारे तीक्ष्ण नजर असलेले ते डोळे ! अक्कडबाज
मिशा ! डोक्यावर लाल पगडी ! चेहेरा ओळखीचा वाटतही होता, पण आठवतही नव्हता ! तो कोण असावा ते मी आठवण्याचा प्रयत्न करत उभा होतो.
तेवढ्यात ती प्रौढ स्त्री कुठूनशी प्रगट झाली आणि मला ती तसबीर न्याहाळताना बघून हळूच हसली. मला काहीच बोध झाला नाही. " हा कोण " असे मी तिला खुणेने विचारू लागलो, तर ती तोंडावर पदर घेऊन खुदकन हसली आणि माझा गालगुच्चा घेऊन " एवढं पण कळत नाही? वेडा कुठला!" अशा सारख्या खुणा करत तिच्या अगम्य भाषेत काहीतरी बडबडत आत निघून गेली. मी हतबुद्ध होऊन स्तब्ध उभा राहिलो. मी तिच्या खुणांचा
अर्थ लावायचा प्रयत्न करू लागलो. अचानक माझ्या डोक्यात प्रकाश पडला ! ते माझेच तैलचित्र आहे असे तर तिला म्हणायचे नसेल ? छे! छे!
तो उमदा पुरुष कुठे आणि मी कुठे ! पण तिला असे का वाटत असावे? मी नीट निरखून ते चित्र पुन्हा पहिले.

घारे डोळे, सरळ नाक आणि एकूण
चेहेरयाची ठेवण यात साम्य होते खरे ! भाऊ म्हणून सांगितले तर सहज पटेल इतके साम्य होते ,पण तो मी नव्हतो हे ही खरे होते न ! त्यांच्या
गैरसमजामागचे कारण माझ्या लक्षात आले.
मी मिशा राखल्या नव्हत्या. त्या राखल्या तर साम्य आणखीन जास्तच दिसेल हे मलाही पटले. पण त्या लोकांचा गैरसमज भाषा येत नसताना दूर
कसा करायचा तेच मला कळत नव्हते . अर्थात , इथे आल्यापासून माझी जी चंगळ सुरु होती त्यामागे ही तस्बिरच आहे हे माझ्या लक्ष्यात आले.
मनात विचारांचे मोहोळ घेऊन मी वाड्यात फिरू लागलो. ज्या खोल्या मला पूर्वी कुबट वाटत होत्या त्या आता तशा नव्हत्या . खोलीच्या छताला
लावलेली जाळी मला अचानक दिसली. त्यातून बेताचा उजेड आणि हवेचा झोत सरळ अंगावर येणार नाही अशा बेताने हवा आत येण्याची सोय होती . ती बालन्तिनीची खोली होती बहुधा ! हळू हळू मी सारी हवेली पालथी घातली . मला कोणीही अडवलं नाही. फाटकापाशी गेलो तर भला मोठा अडाणा
लावून शिवाय कुलूप लावलेलं दिसलं. संपूर्ण वाड्याला चारही बाजूनी उंच भिंतींचे संरक्षण होतेच . माझ्यासाठी मात्र ते तुरुंगाहून वेगळे नव्हते असे मला वाटले. अर्थ स्पष्ट होता ! खायला प्यायला आणि वाड्यातल्या वाड्यात फिरायला मला बंधन नव्हते पण बाहेर जायला मी स्वतंत्र नव्हतो !

मी उदास झालो. काहीतरी करायचे म्हणून वरच्या मजल्यावर गेलो. तिथल्या एका खोलीत मला सतार ठेवलेली दिसली . माझी उत्सुकता जागी झाली.
मी
सतार शिकत होतो. खूप चांगली येत होती असे नव्हे पण वाजवण्यात मला खूप आनंद मिळत असे एवढे खरे. मी सतार काढली. तारा जुळवल्या आणि डोळे मिटून हलकेच सूर छेडायला सुरुवात केली. थोड्याच वेळात मी त्यात इतका रंगून गेलो कि मला स्थळा काळाचे भान राहिले नाही.

त्या सुरांनी माझे
एकटेपण , औदासिन्य , कैदेत पडल्याचे दुक्ख सर्व काही बाहेर काढले. मी भानावर आलो तेव्हा माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहात होते. मी डोळे पुसून
खाली आलो. दिवस सरला. रात्र झाली. अचानकपणे मला टीव्ही ची आठवण झाली. ही माझी रोजची बातम्या ऐकायची वेळ ! पण वाड्यात टी व्ही तर सोडाच
पण साधी वीज देखील नव्हती . मी सुस्कारा सोडला. रात्री पुन्हा सकाळ सारखेच चविष्ट जेवण झाले. पण मला ते आता चविष्ट लागले नाही. इथून बाहेर कसे
पडायचे याच चिंतेत मी होतो. जेवणानंतर मी आवारातच शतपावली घातली. आकाशात दिसणाऱ्या कोट्यावधी चांदण्या पाहून मनाला थोडी शांतता वाटली.
मी बेडरूम मध्ये आलो आणि कुठून मला ह्या वाड्याकडे येण्याची दुर्बुद्धी सुचली म्हणून स्वतःला दोष देत तळमळत पडून राहिलो. मला माझ्या बायकोची ,
सुलभाची तीव्रतेने आठवण येत होती.सर्वजण माझी काळजी करत असतील का ? माझे सारे मित्र परत गेले आणि मी मात्र गेलो नाही म्हणून ती चिडली
असेल का? माझा झक्की स्वभाव तिला माहिती होता. मला लहर आली कि मी असा डोंगर दऱ्या नदी,सागर किनारी भटकायला पुष्कळदा जात असे. त्यामुळे
मी असा कैदेत सापडलो असेन हे त्यांच्या ध्यानी मनी ही येणार नाही. माझ्या झक्की स्वभावाला बोल
लावत ते माझी वाट बघत बसतील. अचानक मला
माझ्या आईचे शब्द आठवले. ती म्हणाली होती , " बेटा, तू घराबाहेर जातोस तेव्हा दिवसातून एकदा तरी घरी संवाद साधत जा. तू असा बाहेर जातोस आणि
चार चार दिवस तुला घरी फोन करायची शुद्ध नसते. सर्व काही नीट आहे तोवर ठीक , पण कधी अडचणीत सापडलास तर घराच्या लोकांना कल्पना कशी येणार ? तू नेहेमीसारखा आपल्याच तंद्रीत असशील असे ते धरून चालतील . जेव्हा त्यांच्या लक्षात येईल तेव्हा कदाचित उशीर झालेला असेल. "
आज तिचे ते शब्द अक्षरशः खरे झाले होते. मी अडचणीत सापडलो होतो.

आणि कुणाच्या तरी मदतीशिवाय यातून सुटू शकणार नव्हतो . मला एकदम माझ्या
मोबाईल ची आठवण झाली. मला सकाळ पासून एकही फोन आला नव्हता. मला आठवले. अंघोळीसाठी मी कपडे काढले तेव्हा तो खिशात राहिला होता!
तो मला कसा सापडेल ? माझ्या अंगावर तर कपडे देखील माझे स्वतःचे नव्हते. माझी भाषा इथे कुणाला समजत नव्हती ! मी हताशपणे डोळे मिटले. विचार करता करता केव्हातरी मला झोप लागून गेली.
कसल्याशा स्पर्शाने माझी झोप चाळवली. मी डोळे उघडून पहिले. ओढणीने तोंड झाकून मला ओवाळणारी स्त्री माझ्या पायाशी येऊन बसली होती
आणि हलक्या हाताने माझे पाय चुरीत होती. आता तिने ओढणी खांद्यावर घेतली होती . ती अत्यंत सुंदर दिसत होती. क्षणभर त्या लावण्यवतीकडे मी टक लावून बघतच राहिलो आणि मग एकदम चटका बसल्या सारखा उठून बसलो. ती सुंदर होती पण सुलभा, माझी पत्नी नव्हती ! परस्त्री होती ! मी तिला विविध खाणाखुणा करून " मी तुझा नवरा नाही " हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करू लागलो पण तिला ते काहीच समजत नव्हते. उलट मी तिच्यावर रागावलो आहे असे वाटून तीच माझी समजूत घालत होती असे मला वाटले.
अखेर मी गच्च डोके धरून बसलो ! माझ्याकडे पाहून तिने रडायला सुरुवात केली. माझा नाईलाज झाला. मी आपली उशी आणि चादर घेऊन खाली झोपू लागलो . तेव्हा तिने माझा हात धरून मला पलंगावर झोपायला लावले आणि स्वतः खाली झोपली.

मी देखील नाईलाजाने पलंगावर मुकाट्याने पडून राहिलो. झोप काही आली नाही. काही विपरीत घडेल की काय या शंकेमुळे मी जागाच राहिलो. पहाटे
पहाटे केव्हा डोळा लागला कळलं नाही. सकाळी जाग आली तेव्हा एकदम दचकून चारीकडे पाहिलं. खोलीत मी एकटाच होतो. माझ्या जीवात जीव आला. मग मी निश्चिंत मनाने झोपी गेलो. भरपूर झोप झाल्यावर मी उठलो. उठून करायचं काय हा प्रश्नच होता. तेवढ्यात तो नोकर आला. त्याने मला मागील दारी नेले. परसदारी विहीर होती. तिथे तोंड धुवून आल्यावर मला दूध देण्यात आले. ती पिऊन मी उगीच इकडे तिकडे फिरू लागलो.
माझ्या मागोमाग सावलीसारखा तो नोकर होताच! अंगणात आलो तर घरातून एक गोंडस मूल रांगत रांगत बाहेर आले. मला पाहून काहीतरी आवाज
काढू लागले. मी त्याला कडेवर उचलून घेतले. मला येत असलेली सर्व बालगीते त्याला म्हणून दाखवली. त्याने देखील खुदुखुदु हसून छान प्रतिसाद दिला .

थोड्या वेळाने मला त्याचा देखील कंटाळा आला. ह्या घरात किती माणसे रहातात, त्यांचे एकमेकांशी काय नाते आहे, माझे त्यांच्याशी काय नाते आहे,
--म्हणजे त्यांना असे वाटते-- त्याची मला काहीच कल्पना नव्हती. एका गोष्टीचे मला अत्यंत आश्चर्य वाटत होते. मला त्यांची भाषा समजत नाही याचे त्यांना काहीच आश्चर्य कसे वाटत नाही? सर्वस्वी भिन्न भाषेच्या व्यक्तीला ते आपली व्यक्ती कसे काय समजत होते? जणू काही मी त्यांचा
लहानपणी हरवलेला मुलगा होतो आणि खूप वर्षांनी सापडल्यामुळे हे सर्व

त्यांना अपेक्षितच होते ! अचानक माझ्या डोक्यात हा विचार चमकला .
खरोखर असेच काही घडले तर नसेल न? मला याच गोष्टीची जास्त शक्यता वाटू लागली.केव्हातरी काहीतरी कारणाने दुरावलेला तसबिरीतला तो तरुण मुलगा तो मीच असे त्यांना खात्रीपूर्वक वाटत असले पाहिजे. काहीही असले तरी माझ्या मनाची तगमग थांबत नव्हती . माझ्या घरातल्या
माणसांशी संवाद साधण्यासाठी मी आसुसलो. कसेही करून माझी अडचण त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे . त्यासाठी मला काय करता येईल याचाच मी सतत विचार करू लागलो." माझा मोबाईल कुठे आहे?" असे त्या नोकराला सारखे विचारू लागलो, पण त्याच्या डोक्यात ते शिरता शिरेना ! माझे
डोके अति विचाराने पिसाळल्यासारखे झाले होते. समोर येईल त्याच्यावर ओरडावेसे वाटत होते.

पुन्हा रात्र झाली . कालचा अनुभव आठवून पोटात भीतीचा गोळा आला. त्या परक्या बाईच्या सहवासात रात्र काढण्याच्या कल्पनेनेच मी अर्धमेला
झालो. आज तर आणखीनच कहर झाला. ती प्रौढ स्त्री त्या तरुण स्त्रीला नखशिखांत सजवून खोलीत घेऊन आली आणि " ही तुझी बायकोच आहे,
हिचा स्वीकार कर " अशा अर्थाच्या खुणा करून निघून गेली. मी अर्थातच बधलो नाही. ती तरुण स्त्री रात्री उशिरापर्यंत माझ्या विनवण्या करत राहिली. ती मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती पण मला समजत नव्हतं.

चार दिवसांनी ते मला आपोआप समजलं! चार दिवस -नव्हे चार रात्री कोऱ्या गेल्यावर अचानक ती स्त्री रात्री मला काय सांगत असेल त्याचा अंदाज यायला लागला. घरातले वातावरण तिच्यासाठी बदलून गेले.
ती प्रौढ स्त्री तिच्याच बाबतीत चंडीका अवतार धारण करताना दिसू लागली. घरातली नोकर माणसे रिकामी राहून सारी कामे त्या तरुण स्त्रीला करावी लागत आहेत हे मला दिसून आले. दिवसभर ती बिचारी खालमानेने कामे करत राहूनही प्रौढ स्त्रीची बोलणी खात रहायची . रात्र झाली की
माझ्या खोलीत येऊन माझी मनधरणी करत रहायची. माझ्या लक्षात येऊ लागलं की माझं माझ्या पत्नीशी एकनिष्ठ रहाणं ह्या स्त्रीच्या कष्टाचं
कारण बनतं आहे. रात्री ती मला तिच्या हाताला बसलेले चटके दाखवू लागली की माझ्या मनाची तळमळ व्हायची ! मी तिला कसे समजावू की मी
माझ्याबरोबर तिच्याही शीलाचे रक्षणच करतो आहे.
एक दिवस या साऱ्यांचा कडेलोट झाला.
माझ्यासमोरच त्या तरुण स्त्रीला प्रौढ स्त्रीने हातातल्या काठीने मार मार मारले. ती तरुणी स्फुंदत राहिली पण तिने कसलाही प्रतिकार केला नाही.
शेवटी मला ते पहावेना म्हणून मी त्या स्त्रीच्या हातातून काठी काढून घेण्याचा प्रयत्न केला पण माझ्याकडे जळजळीत नजरेने पहात तिने मला दूर ढकलले व आणखी दोन चार दणके तिला दिले ! मला कळून चुकले की पतीला -[त्यांच्या दृष्टीने -] आकर्षित करता न आल्याची ही अशी
शिक्षा तिला मिळते आहे. त्या रात्री तिच्या सर्वांगावर उमटलेले वळ पाहून मी अगदी कळवळलो. आज मात्र तिने मला कसलीच विनवणी केली नाही.
जणू काही दिवसा काम आणि मार आणि पतीची अवहेलना सहन करत रात्र घालवणे हेच आपले प्राक्तन असल्याचे तिने मनोमन समजून घेतले आणि मान्यही केले होते. मी तिला पलंगावर बसण्याची खूण केली आणि वास्तव समजावून सांगण्याचा शेवटचा प्रयत्न केला. माझे बोलणे न समजल्याने ती दीनवाणी होऊन माझ्याकडे बघत राहिली. तिच्याकडे पाहून माझं जीव अत्यंत कळवळला . मी इथे आल्यामुळे ह्या स्त्रीवर अशी वेळ
आली आहे.

इतके दिवस ती इथे सुनेच्या मानाने रहात होती. पती नसल्याने कदाचित सहानुभूतीलाही पात्र असेल सर्वांच्या! माझ्या आगमनामुळे तिची काहीही चूक नसताना तिची अशी अवस्था झालेली आहे . त्या अर्थी त्याला मीच कारणीभूत आहे. असे माझे मन मला सांगू लागले
माराचे वळ उमटलेले तिचे अंग , रडून सुजलेले डोळे आणि कोमेजून गेलेला उदास चेहेरा मला पाहवेना आणि हे सर्व माझ्यामुळे हा विचार मला
सहन होईना ! माझ्या सुलाभाचा चेहेरा डोळ्यापुढे नाचू लागला . तिची अशी अवस्था केल्याबद्दल ती मला धिक्कारत आहे असे वाटू लागले. मनावर एक प्रकारची गुंगी आली. आणि मनावरचा माझा ताबा सुटून गेला. मनात सुलभाच्या नावाचा आक्रोश चालू
असतानाच शरीराने मी त्या झिरझिरीत ओढणीतील स्त्रीचा औट घटकेचा पती झालो !

मी डोळे उघडले तेव्हा मला दिसले की माझी आई, सुलभा आणि माझे सारे मित्र माझ्याभोवती कोंडाळे करून बसले होते. प्रत्येकाकडे माझी नजर जाताच त्याच्या चेहेऱ्यावर हलकेसे स्मित उमटत होते. सुलभाकडे नजर जाताच मला ती झिरझिरीत ओढणी वाली स्त्री आठवली. तो वैभवसंपन्न वाडा! माझे तिथले वास्तव्य , ती कैद आणि अखेर ते .......सारे सारे आठवले. मला तिथून कोणी आणि कसे सोडवले हे जाणून घेण्यास मी उतावीळ झालो होतो. मी पुन्हा पुन्हा सर्वाना विचारत होतो पण कोणीच सांगेना!
वाड्याचा विषय काढताच" ते सर्व विसरून जा" असे म्हणू लागले. अखेर मी अन्न सत्याग्रह करण्याची धमकी दिली तेव्हा कुठे सुलभा मला सांगायला तयार झाली.
माझे मित्र मला सोडून परत गेले खरे पण त्यांना ते बरे वाटेना ! माझ्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण फोन आउट ऑफ रीच येऊ
लागला त्यामुळे काळजी वाटून सर्वजण तेरगावला आले. एका माहितगार व्यक्तीला घेऊन ओसाड वाड्यापाशी आले. तिथे एका धुळीने माखलेल्या कुण्या ऐतिहासिक पुरुषाच्या तसबिरीपाशी बेशुद्ध पडलेला मी त्यांना दिसलो. तातडीने मला खाजगी गाडीत घालून इथे आणले आणि डॉक्टरला दाखवले. मानसिक ताणामुळे मी बेशुद्ध आहे असे त्यांचे म्हणणे पडले.
" किती दिवसांनी मला घरी आणले?" मी सुलभाला विचारले.

" छे! छे! किती दिवसांनी कुठे? दुसऱ्याच दिवशी! परवाच नाही का तुमची मीटिंग झाली? सुलभा उद्गारली
फक्त दोन दिवस? मी बुचकळ्यात पडलो. माझ्या हिशोबाने मी किमान एक आठवडा तरी तिथे घालवला होता. मला सात दिवस मी जेवलेले विविध
पदार्थ देखील आठवत होते. आणि हे सर्वजण वाड्याला ओसाड का म्हणत आहेत ? मी तर तो चांगला गजबजलेला पहिला! तिथलं आतिथ्य आणि नंतर कैद अनुभवली. त्यात लहान बाळापासून वडील माणसांपर्यंत सर्व लोक होते. हे सर्व काय खोटंच? शिवाय मला औक्षण करणारी ती झिरझिरीत ओढणी मागची स्त्री? ती कशी काय खोटी असू शकेल ? माझ्या आणि या सर्वांच्या अनुभवात इतका जमीन आसमानाचा फरक कसा काय ? मी माझे अनुभव सांगितले तर मला वेडा समजतील का? की मानसिक ताणाचा तो परिणाम होता असे समजतील? मी विचारांच्या आवर्तात सापडलो
मी पहिल्यापासून गणित मांडायला सुरुवात केली. सर्वांसोबत वाडा शोधण्याचे इतके प्रयत्न केले पण तो सापडला नाही. तो आधीपण मी एकटाच असताना दिसला होता.नंतरही एकटा गेलो तेव्हा लगेच सापडला . पंधराच दिवसात तो इतका कसा चांगला झाला? गम्मत म्हणजे हे प्रश्न मी तिथे
असताना मला पडले नाहीत.आता पडत आहेत! मला त्या सौन्दर्यवतीची आठवण झाली. माझे शील जपण्याचा माझा आटोकाट प्रयत्न आणि अखेर
मला त्यात आलेले अपयश ! ह्या इतक्या साऱ्या गोष्टी खोट्या ? विचार करता करता मी केसातून हात फिरवत होतो . अचानक माझ्या कपाळातून जोरात कळ आली ! मी चाचपून पहिले तर टेंगूळ ! माझी खात्री झाली ,माझे अनुभव खोटे नव्हते! पहिल्या दिवशी त्या स्त्रीला ढकलण्याच्या प्रयत्नात माझे डोके पलंगाच्या कडेवर जोरात आपटून टेंगूळ आले होते. सकाळी नोकराने त्यावर काहीतरी उगाळून लावले देखील होते.
कोणाला काहीही वाटो , सुलभाला सारे खरे सांगायचेच असा निश्चय करून मी सुलभाला हाक मारली.
" सुलभा...... इकडे ये. मला तुला काही सांगायचं आहे." मी तिला बोलावले
" मला देखील तुम्हाला काही सांगायचं आहे " प्रसन्नपणे ती म्हणाली.

मी तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं ,.........आणि पाहताच राहिलो! नुकत्याच सुस्नात होऊन आलेल्या सुलभाच्या चेहेऱ्यावर अगदी तसेच, ..नव्हे... ,तेच भाव होते. असीम तृप्तीचे ! अपार समाधानाचे ! त्या झिरझिरीत ओढणीआडच्या चेहेऱ्यावर मला दिसलेले! मीलनानंतरचे !
"आपल्याकडे आता एक पाहुणा येणार आहे बरं का ! " डोळे मिचकावत ती म्हणाली आणि माझ्या कानापाशी येऊन हळूच पुटपुटली ,
" तुम्हाला बाबा म्हणणारा!"

 

 

                                     जे हा द

 "अल्लाह का लाख शुक्र, जो इक मुसलमाँके घर पनाह मिली, जिस सूरतेहालमे इस्लामकी तौहीन हो रही है, अल्लाहने मुझे इक भाईके घर पहूंचादिया है... बडे भाई...इस अल्लाहके बंदेको अपनी पनाह मे ले लीजिये.. काफिरोंकी तादात इस कदर बढ चुकी है.. के मै बाहर इक कदम रख्खूं तो भूनके रख देंगे..कुरआन साफ साफ कहता है मियाँ.. काफिरको मुसलमाँ बनाओ या फिर अल्लाहके पास भेज दो.. यही मकसद है हमारा... क्या देख रहे है बडेभाई... नाचीजको गिरफ्तार करने इस मुल्ककी पुलीस जगहजगह पागल कुत्तोंकी तरह घुम रही है... इक बार समंदरसे पाकिस्तान चला गया तो इनाम मिलजायेगा मुझे... पाकिस्तानकी सरजमींको मुझपर फक्र होगा... आपपर फक्र होगा... मजहब सबसे उपर है भाईसाहब... हम मामुली पियादे है इस जंगमे... हमसे लाख शहीद होजाये... पर अल्लाहका नाम रौशन होनेतक राहत की साँस लेना शरमिंदगी है... भाभीजान... आप समझाईये इन्हे... ये बडे है.. हमसे जियादा जानते है.. जेहादका वक्त है.. हम मरनेके लिये तो तैय्यार है.. पर मरनेसे पहले हम कुछ करके जाना चाहते है... काफिरोंको ऐसा सबक सिखाना चाहते है... के इस्लामकी तरफ गर्दन उपर न कर सके.. आप खुदही देखिये बडे भाईसाहब... पुश्तोंसे रहरहे है आप यहाँ... क्या मिला... इक चार दीवार का मकाँ.. और इक वजूद... के आप ना यहाँके है.. न वहाँके... भाईजान... यहाँ एक अरब लोग रहते है... तीन चारसौने अपनी जाँन गवाभी दी... तो इस मुल्कको क्या फरक पडेगा... लेकिन अगर आपने मुझे पनाह न दी... तो सदियोंतक पाकिस्तानके स्कूलकी किताबो मे बच्चोंको यही सिखाया जायेगा... के जनाब अतर उल रहमान खाँ अन्वर... अपनी सरजमींके दुष्मन थे... काफिरोंके अहबाब थे... हिंदोस्तांके दोस्त थे... जिन्होने अकमल जाफरको पनाह न दी... और उसे काफिरोंके हवाले कर दिया... जिससे पाकिस्तानके पाक इरादोंके बारेमे दुनिया जान गयी.... और उन्हे पुरा न होने दिया... अन्वर भाईसाहब... ये आपका छोटा भाई... जो पाकिस्तानसे आया है और पनाह मांग रहा है... आपके सामने घुटने टेककर ये अर्ज करता है... के आज आप इस्लामका साथ देंगे... तो पाकिस्तानके लिये आप एक ऐसे शक्स बनजायेंगे... जिसका नाम लेते हर मुसलमाँ गर्दन झुकायेगा... अन्वर खाँ साहब.. रहम..."

अन्वर खाँ च्या घराच्या मागच्या भिंतीवरून उडी मारून आलेला जाफर भुतासारखा प्रकटला होता. बाहेर हल्लकल्लोळ चाललेला होता. अतिरेक्यांचा एक प्लॅन आधीच समजल्यामुळे दोन अतिरेकी पकडण्यात पोलिसांना यशही आलेले होते. मात्र आणखी दोघे परागंदा झालेले होते. त्यातलाच एक जाफर होता, जो मुसलमान वस्तीतील अतिशय गचाळ आणि दाट गल्लीबोळांमधून कसाबसा पोलिसांची नजर चुकवून अन्वर खाँच्या घरात प्रकट झाला होता. प्रथम त्याला मारण्यासाठीच अन्वरने हालचाल केली. पण तो पाकिस्तानहून आलेला आहे हे समजल्यावर अन्वरची दातखीळच बसायची वेळ आली होती. फरिदा तर जी भिंतीला चिकटली ती नुसतीच थिजलेल्या डोळ्यांनी जाफरकडे बघत होती. बरे झाले की मुले आत्ता घरात नव्हती असे दोघांना या क्षणी वाटत असले तरी बाहेर प्रत्येक मुस्लिम घराची झडती घेणार्‍या पोलिस पथकाच्या घिसाडघाईत शाळेतून येणारी आपली दोन्ही मुले कुठे हारवणार तर नाहीत ना याची आता त्यांना चिंता लागली होती. अन्वर डोळे फाडून जाफरकडे बघत होता.
बाहेरचे आवाज वाढतच चाललेले होते. कोणत्याही क्षणी आपल्याही घराचे दार ठोठवण्यात येईल हे अन्वर आणि फरिदाला माहीत होते. ज्या मुस्लिम धर्मनेत्यांना पोलिसांचा हा प्रकार मंजूर नव्हता ते अनेक लोकांना बरोबर घेऊन घोषणा देत पोलिसांच्या मागेमागे चालत होते. हे मगाशीच अन्वरने पाहिले होते. त्या धर्मनेत्यांच्या मागच्या लोकांची संख्या एक एक ने वाढू लागलेली होती. केवळ काही मिनिटांतच वातावरण अत्यंत तंग होणार आणि बहुधा वाढीव फोर्स आणून पोलिस गोळीबार करून संचारबंदी ठोठावणार हे आता अन्वरला समजलेले होते. फरिदाचे पाय तर जमीनीत रुतल्यासारखेच झालेले होते. केव्हापासून तिला मुलांना शोधायला बाहेर पडायचे होते. पण अन्वर स्वतः जाणार म्हणत होता. पण त्याचीही हिम्मत होत नव्हती. आणि त्यावरच जोरजोरात चर्चा चाललेली असताना हे भूत अचानक प्रकटलेले होते. त्यामुळे दोघे मुळासकट हादरलेले होते. हा जर आत्ता या क्षणी पोलिसांना आपल्या घरात दिसला तर आपलेच नाही तर आपल्या मुलांचेही भवितव्य संपुष्टात येणार हे अन्वरला समजले. पण जाफरच्या भाषणातील तीव्रता इतकी बोचरी आणि इतकी प्रभावी होती की उभ्याउभ्याच अन्वरला त्यात तथ्य वाटू लागलेले होते. अन्वरच्या आधीच्या दोन पिढ्या भारतात राहिलेल्या होत्या. फाळणीच्यावेळी त्याच्या आजोबांचे दोन सख्खे भाऊ पळून पलीकडे गेलेले होते. पण आजोबांना जाताच आले नव्हते. तेही पळून जायच्या प्रयत्नात असतानाच त्यांना तेव्हाच्या पोलिसांनी धरले होते. त्यांना धरण्याचे कारण इतकेच की तेव्हा प्रत्येक मुस्लिम पुरुषावर अतिरेकी कारवाया करण्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. तिकडे मुस्लिमांनी केलेले अत्याचार हिंदुस्तानात आणि बाकीच्या जगात समजत होते. पण इकडे शासनाने मुस्लिमांवर केलेले अत्याचार नीटसे समजतही नव्हते. त्या झुंजीत आजोबांच्या पायात गोळी घुसली आणि ते आयुष्यभरासाठी लंगडे झाले. मात्र त्यांनी ठरवले, की संधी मिळाली की पळून जायचे. पण काही काळाने शांतता प्रस्थापित झाली तेव्हा त्यांचे निधन झाले आणि अन्वर खाँच्या वडिलांनी तोवर सुरू केलेला व्यवसाय भरभराटीस आला. इकडे भारत पाकिस्तानचे आणखी एक युद्ध झाले आणी त्यात पाकिस्तानने सपाटून मार खाल्ल्यावर अन्वर खाँच्या वडिलांनी तिकडे जाण्याचा प्रयत्नच थांबवला. एकंदरीत भारतीय सरकार जर निधर्मवादाच्या नावाखाली तशीही आपल्याला सुरक्षा आणि आरक्षण देऊ पाहात असेल तर तिकडे जाऊन कशाला मरायचे? त्यापेक्षा इतक्या प्रचंड लोकवस्तीच्या आणि त्यातही प्रचंड मुसलमान लोकवस्तीच्या देशात होत असलेली आपली भरभराट कशाला सोडायची? अन्वर खाँ चे वडील पाकिस्तानचा 'प' ही विसरले. मात्र स्वतःच्या घरात आणि गल्लीबोळांत झालेला हिंसाचार मात्र डोळ्यांपुढून दूर होईना. बाळकडूच असे मिळाले अन्वर खाँ ला की भारतीय सरकार आणि हिंदू हे आपल्याला हाल हाल करून या देशात ठेवतात. आपले एकमेव कर्तव्य म्हणजे आपली लोकसंख्या भरपूर वाढवायची आणि जमेल त्या व्यवसायात शिरकाव करून श्रीमंत व्हायचे. एक वेळ अशी यायला हवी की रस्त्यावर दर तीन माणसांमागे एक मुसलमान असायला हवा. अन्वर खाँ हिंदू आणि भारतीयांचा तिरस्कार करतच मोठा झाला. त्याला दोनच मुले होती याचे त्याला वैषम्य वाटत होते आणि फरिदाचा विरोध मोडून काढून आणही एक बेगम करण्याचा त्याचा इरादा तो आता प्रत्यक्षात आणणार होता.
पण आत्ता प्रत्यक्ष जाफरला पाहून मात्र त्याची फाटली होती. हिंदू आणि भारताचा तिरस्कार व्यक्त करण्याची संधी ही अशी आपल्यासमोर येईल हे त्याच्या कधी गावीही नव्हते. जाफर प्रत्यक्ष अतिरेकी होता. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर त्याला निश्चीतच अत्यंत कडवी शिकवण आणि लढण्याचे प्रशिक्षण मिळालेले असणार होते. याशिवाय नक्कीच त्याच्याकडून अत्यंत घातक असे काहीतरी करून घेण्याचा पाकिस्तानचा इरादा असणार होता. अतिरेकी कसे दिसतात हेही माहीत नसलेला अन्वर थिजून जाफरकडे बघत होता. पण जाफर तर दिसत होता एखाद्या आम, नम्र आणि गोड स्वभावाच्या पंचविशीच्या युवकासारखा. ना काही शस्त्र ना काही अस्त्र. पण तो जे बोलत होता ती वक्तव्येच तलवारीहून धारदार होती. आपल्या भागाला अतीसंवेदनशील भाग असे नांव मिळालेले आहे याची व्यवस्थित जाणीव असलेल्या अन्वर खाँ ला जाफरपुढे एक शब्द बोलता येत नव्हता.
अन्वर खाँ का घाबरला होता, तर जर त्याने जाफरला सहाय्य केले नाही, तर उद्या पाकिस्तानातून आपले दूत पाठवून त्या संघटनेने अन्वर आणि त्याच्या कुटुंबाचे शिरकाण केले असते. तिकडून कोणाला पाठवायचीही जरूर नव्हती खरे तर त्यांना. नुसत्या एक फोनवर इथल्याइथेच ते काम झाले असते. घरातच बाँब फुटला असता. आणि अन्वर खाँ ने जर त्याला सहाय्य केले असते, तर ए टी एस ने नुसती त्याचीच नव्हेत, तर अख्ख्या वस्तीची पिसे काढली असती.
कचाट्यात सापडला होता अन्वर खाँ. त्याला जाफरचे म्हणणे अंतर्बाह्य मान्य होते, पण ते मान्य करून जाफरला मदत करणे हे भयानक कृत्य होते. इस्लाम अन्वर खाँ च्या स्वतःच्याही प्राधान्ययादीत सर्वोच्च स्थानावर अढळपणे स्थानापन्न झालेला होता, पण ते तसे प्रत्यक्ष कृतीने मान्य करणे ही आत्महत्या ठरली असती आणि न मान्य करणे हा अकाली अनैसर्गीक मृत्यू.
"क्या करने आये थे तुम हिंदोस्तांमे"
"बम"
खलास. जाफर इतका स्पष्ट आणि इतका भेदक नजरेने पाहात बोलत होता की जणू तो 'पनाह' मागत नसून हुकूम सोडत आहे की मला पकडू देऊ नका.
फरिदाने दोन्ही हात तोंडावर दाबून धरले होते. अन्वरने नजरेनेच तिला धीर देत जाफरला सांगितले...
"मेरे दोनो बच्चे बाहर है.. बाहर उन्हे कुछ हो गया तो..."
"इस इलाकेमे बच्चोंको अकेले भेजतो हो आप बाहर?.. दिमाग खराब है आपका?"
जाफरने उलट भीती वाढवलीच. आता फरिदा जमीनीवर बसून रडू लागली. तिच्या रडण्याचा आवाज वाढल्यावर मात्र जाफरचे खरेखुरे रूप प्रकट झाले. त्याने कोठून तरी वेपन काढले आणि फरिदाच्याजवळ जाऊन तिच्या डोक्यावर ते टेकवत घुसमटत्या पण जरबयुक्त आवाजात म्हणाला..
"भाभीजान भाभीजान कहकर बडी गलती कर रहा था शायद मै... अब मुंहसे आवाज निकालोगी तो भेजा उडादुंगा.. ऐ अन्वर के बच्चे... छुपनेक जगह बता... और ये तेरी बीवी मेरे साथ रहेगी... कही तू काफिरोंसे मिल गया तो ये दोजखमे तेरा इंतजार करेगी... चल्ल.. कहा छुपना है..."
भीतीने थरथर कापत असलेला अन्वर नुसताच बघू शकत होता. अतिरेकी, त्यांच्या अतिरेकी कारवाया, हिंदू मुस्लिम वाद यातील काही प्रकार त्याने नुसतेच पेपरात वाचले होते आणि स्वतः अती संवेदनशील विभागात राहात असल्याने काही किरकोळ प्रकार त्याला पाहताही आलेले होते... पण प्रत्यक्ष स्वतःच्या घरात स्वतःच्या डोळ्यादेखत स्वतःचीच बायको दुसर्‍याने धरलेली आणि तेही पिस्तुलाच्या धाकावर, हे पाहताना त्याचे पाय लटपटत होते.
जाफरच्या नाजूक दिसणार्‍या पोरगेल्याश्या शरीरातील अमानुष ताकद फरिदाला जाणवत होती. त्याच्या डाव्या हाताची बोटे तिच्या दंडात लोखंडासारखी रुतली होती. डोक्याला लोखंडाचा गार स्पर्श बोचत होता. एक शब्दही निघत नव्हता तोंडातून. आत्तापर्यंत 'घुटने टेकून' रहम मागणार्‍या जाफरने आता आपल्याला काहीही चॉईस ठेवलेला नाही हे अन्वरच्या लक्षात आलेले होते. मुले कुठे आहेत हा विचार करण्याचा आता वेळही नव्हता.
अन्वरला काहीही समजत नव्हते की यांना कुठे लपवावे? तो नुसताच इकडे तिकडे बघत राहिला. जाफरची बोटे फरिदाच्या दंडात आणखीन खोल घुसल्यावर तिच्या तोंडातून एक वेदनेचा हुंकार निघाला. त्याची शिक्षा म्हणून ती बोटे आणखीनच रुतली. अन्वरच्या चेहर्‍यावर भीती ओसंडून वाहत होती. खरे तर अन्वरला जागाच सुचत नाही आहे हे जाफरच्याही लक्षात आलेले होते. त्यामुळे तोही इकडे तिकडे बघू लागला.
"काफिरकी औलाद है क्या अन्वर ??? खुदकेही घरको नही जानता है? किसी हिंदूके साथ सोयी थी अम्मी?"
जाफरची शिवीगाळ कानांमधून मनात गेली की असह्य मानसिक यातना होत होत्या अन्वरला. खरे तर त्याला मनातून असे वाटत होते की इस्लामचा हा रखवाला पकडला जाऊ नये. पण ज्या प्रकारे जाफर वागत होता, अन्वर स्वतःच घाबरला होता.
फरिदाने अतिशय हळूहळू मान मागे वळवली. अधिक वेगात वळवली तर हा पिस्तुलाने डोके पुन्हा जागच्याजागी वळवेल या भीतीने ती अतिशय काळजी घेत होती. एका भिंतीवर ती चिरडली जात होती त्या पकडीने. त्यामुळे हालताही येत नव्हते. शेवटी एकदा तिची मान तिला हवी तेवढी वळली आणि इकडे तिकडे जागा शोधण्यासाठी पाहणार्‍या जाफरला पाहताना तिच्या मनात एक विचार येऊन गेला. तो विचार म्हणजे..... भय... भीती ही भावना तर जाफरच्याही डोळ्यांमध्ये तिला दिसली... एकच क्षणभर तिला फार फार बरे वाटले... आपल्या घरात कितीही नासधूस केली तरी हा नालायक स्वतःही घाबरलेलाच आहे हे तिला जाणवले.. त्याच क्षणी जाफरचेही तोंड तिच्याकडे वळले आणि त्याला जाणवले की ही आपल्याकडे बघतीय...
"क्या देखती है स्साली???"
"मै... मै... बताती हूं.. आपको... "
"छुपनेकी जगह???"
"ज... जी... "
"या अल्लाह... कितनी खुबसूरत रिहाई होगी जो तुने मुझे बचालिया... चल्ल... कहा जाना है???"
"उपर.."
अन्वरचे घर एकमजली होते....
"उपर कहाँ??? जहन्नुम????"
जाफरचा तीक्ष्ण स्वर कानात इतक्या जवळून घुसला की फरिदाला कसेसेच झाले.. जवळपास रडतच ती म्हणाली...
"आप बताईयेना इन्हे.. उपर जनाना कमरा है..."
जाफरचा चेहरा आत्ता सुखाच्या लाटेवर स्वार झाल्यासारखा दिसत होता... जणू ती लाट अरबी समुद्राच्या भारतीय किनार्‍याला धडकून पाकिस्तानची भेट घ्यायला धावत चाललेली होती... वर एक लहानशी खोली आहे आणि ती स्त्रियांसाठी आहे ही माहिती मिळाल्यावर जाफरने वर आकाशाकडे पाहात अल्लाचे आभार मानले.. सुटका निश्चीत होती हे त्याच्या चेहर्‍यावर दिसत होते... ... मुस्लीम जनान्यात पोलिस पाय ठेवू शकणार नाहीत हे नक्की होते... नाहीतर मोठा बाका प्रसंग आला असता शासनावर ह्याची तिघांनाही जाणीव झालेली होती..
या तरुण वयाच्या मुलाच्या अंगात इतकी ताकद असेल असे दोघांनाही वाटलेले नव्हते... एकाच झपाट्यात फरिदाला वर जायच्या दिशेने जाफरने इतक्या जोरात ओढले की ती पडायला आली होती... पण त्याच्याच पकडीने सावरली गेली आणि कसायाबरोबर शेळी जावी तशी एका अंधार्‍या जिन्याकडे जाऊ लागली.. अन्वर दोघांच्याही मागे असूनही त्याची हिम्मत होत नव्हती की जाफरच्या हातावर प्रहार करून ते पिस्तुल उडवून लावावे..
अंधार्‍या जिन्याच्या खाली उभा राहून अन्वर काळजीने वर एकेक पायरी चढणार्‍या या दोघांकडे पाहात होता...
फरिदाने पुढे होऊन एक दार उघडले... आतल्या लहानश्या खोलीत इतका अंधार होता की नजर सरावायला एक दोन क्षण गेले... मागे खाली उभ्या असलेल्या अन्वरकडे पाहात आणि खोलीत पोचलेल्या फरिदाला आणखीनच घट्ट पकडत जाफर अन्वरला डोळे संतापाने मोठे करत म्हणाला..
"मेरी रिहाई नही हुई... तो इसकी रिहाई हो जायेगी इस दुनियासे... और सुन... बच्चे आये तो कहना मां घरमे नही है... अगर एक भी बच्चा उपर आया तो वो उपरही जायेगा.. आधे घंटेमे कोई नही आया तो इक बार ये दरवाजा बाहरसे खटखटाना... ऐसेही आधे आधे घंटेके बाद दो बार और करना.. डेढ घंटेके बाद हम चलेजायेंगे.. अल्लाह तुझे बख्शे... बात समझगया है?? ... या और किसी तरीकेसे समझाये???... और पुलिस आयी तो सूरत ऐसी रखना... जैसे आजतक तुझे डर नही लगा हो... पाकिस्तान जिंदाबाद..."
जाफरने आत पाऊल टाकले आणि मागे बघत दार जोरात लावून घेतले. तो एक क्षणच त्याचे फरिदाकडे दुर्लक्ष झाले होते. हातही तिच्यापासून सुटलेला होता. जाफर मागे वळला आणि.....
... त्याची किंकाळी तोंडाबाहेरही पडू शकली नाही... दोन्ही मांड्यांच्या बरोबर मध्ये ब्रह्मांड आठवेल अशा वेदना होत होत्या... घुसमटत जाफर दोन्ही हात पोटाखाली धरून अक्षरशः गुडघ्यांवर ओणवा होऊन फरिदाच्या पावलांवर कोसळला होता... या नाजूक तरुणीच्या गुडग्यात इतकी अमानुष ताकद असेल यावर त्याचा अजूनही विश्वास बसत नव्हता...
वेदनांमुळे पोटावरचे हातही सुटत नव्हते आणि मानही वर होऊ शकत नव्हती.. खच्चून ओरडावे तर कोणी बाहेरच्याने ऐकले तर काय याचे भय होते मनात...
फरिदा आता हळूहळू स्वतःच्या गुडघ्यांवर बसली आणि तिचे तोंड जाफरच्या तोंडापाशी आले... उजव्या हाताने त्याची हनुवटी उचलून त्याच्या पाण्याने भरलेल्या डोळ्यात आपली तीक्ष्ण नजर घुसवत तितक्याच भेदक आवाजात फरिदा जाफरला म्हणाली....
"पाकिस्तान जिंदाबाद... मै तुम्हारी सिनियर हूं... शफीना बेगम नाम सुना है कभी ट्रेनिंगमे??? ... अन्वर ये सब नही जानता.. ये इक चिमनी है.. बडी है.. ये वैसे खुलती तो आसमानमे है... मगर बीचसे एक छोटासा रास्ता है.. जो घरके अंदरसे जमीनमे जाता है... और वहाँ इक और रास्ता है.. जो सीधा समंदरमे हमारा जो सिक्रेट बेस है वहाँ निकलता है... तुम रिहा तो हो गये हो... लेकिन आयेंदा किसी मुस्लिम औरतपर रिव्हॉल्व्हर मत रोखना.. बुरा होगा.... खुदा हाफिझ..."
मरणप्राय वेदनांनी वाकडातिकडा झालेल्या चेहर्‍याने हतबुद्ध होऊन जाफर फरिदाकडे बघत होता.. त्याच्या हातातील पिस्तुल कधीच फरिदाच्या हातात गेलेले होते...
सर्व काही संपलेले होते... सुटका जवळपास झालेलीच होती...जाफरच्या चेहर्‍यावर हळूहळू भीतीची जागा आनंद घेत होता... दोघेही एकमेकांना पाहून हासू लागले होते... ओळख पटली होती... दोघांचाही हेतू एकच होता.. उद्दिष्ट एकच होते...
जाफरने पिस्तुलासाठी हात पुढे केला आणि म्हणाला..
"पाकिस्तान जिंदाबाद"
तीच घोषणा देत फरिदाने पिस्तुल जाफरच्या हातात ठेवले आणि त्याच क्षणी तिची मान जाफरच्या उजव्या हाताच्या पकडीत आवळली गेली... तिचा श्वास घुसमटत असतानाच तिला जाफरचे जळजळीत शब्द ऐकू आले..
"उस्मान जाफर.. फ्रॉम ए टी एस इन्डिया...चल साली... तेरेको हमारी ट्रेनिंग देते है अब"

                     तू पण ना

विस्तीर्ण समुद्र किनारा.
काय सुरेख नाव आहे ह्या गावाचं!
समुद्रही तितकाच सुंदर आहे इथला.
लख्ख निळं पाणी...तळाला वाळुच्या अगदी बारीक सारीक हालचाली सुद्धा डोळ्यांना स्पष्ट टिपता याव्यात, असं.
लाटांचा एका लयीतील गाज...त्याला वाऱ्याच्या झुळूकेची सुरेख सोबत..
चहु बाजुंनी हिरव्या मऊ सुया अंगावर लेऊन उंच गेलेली सुरुची बनं...
आणि जणु त्यांच्याशी पैज लावल्याप्रमाणे त्यांच्यापेक्षाही उंच जाणारे, डोक्यावर झापांचा मुकुट आणि गळ्यात नारळांची कंठी घातलेले माड...
बदामी रंगाची,पाऊल टाकुनही खराब होईल की काय असं वाटायला लावणारी आणि म्हणुनच की काय, पावलं टाकल्यावर त्यांना भाजणारी, गरम वाळु...
ह्या किनाऱ्यावर आम्ही दोघं फिरतोय.
अगदी हातात हात घालुन वगैरे कसे प्रेमी लोकं फिरतात...तसे.
पण त्याच्या चेहऱ्यावर ऊन येतंय वाटतं. तरीच मला तो नीट दिसत नाही आहे.
इकडे बघ ना रे.
श्या! बघितलं त्याने, तरी दिसत नाहीये.
थांब जरा, आपण सावलीत जाऊ तिकडे. मला बघायचंय तुला.
काय म्हणालास? हो रे...बघते ना रोज. पण आज इथे पुन्हा बघायचंय...बराच वेळ...सतत..एका चित्ताने.
हसु नकोस रे. जा. नाही बघत मग.

अहं..मी नाही जा आता..माझी नेहमी अशी मस्करी करतोस तू.
आता ऑफिसमध्ये पण नाही बघणार तुझ्याकडे.
च्च्च्च..काय बोलले मी...मी पण ना बोलता बोलता काहीपण बोलुन जाते.
.
.
नाही हं..तसं काही अगदी तुझ्याचकडे बघत नाही बसत मी. कामं असतात मलाही...तुमची टीम लीडर आहे म्हटलं मी.
ठीक आहे, चल त्या सुरुच्या झाडांच्या सावलीत बसु.
पाण्यातुन चालायची खुप इच्छा आहे पण इथे ऊन मी म्हणतंय.
चल पटापट..पाय भाजताहेत.
बोल आता.
अरे बोल ना, आता का शांत? असा काय बघतो आहेस आता?
.
चल! मी कशाला लाजु?
.
ह्म्म्म..माहित आहे,हा प्रत्येक पिक्चरमधल्या हिरोचा पेटंट डायलॉग आहे....
खरंच का सगळ्या मुली लाजल्यावर आणि रागवल्यावर छान दिसतात?
ते राहुदे..चल सगळे वाट पाहत असतील...जेवण झाल्यावर निघायचंय आपल्याला.
.
.
हो रे...मलाही नाही निघावसं वाटत आहे. आपण दोघांनी तरी काही काळ इथे थांबावं,
संध्याकाळी पुन्हा समुद्रावर यावं,
रात्री जेवण झाल्यावर झोपाळ्यावर मस्त गप्पा मारत बसावं..
अख्खी रात्र सुद्धा चालेल!
गप्पा तरी काय...मीच बोलत असते...तू फक्त श्रोत्याचं काम बजावतोस.
पण किती शांतपणे, मन लावुन ऐकतोस रे तू...खरंच ऐकतोस ना रे?
मी पण काय विचारतीये..तूच म्हणाला होतास ना की मी बोलत असले की तुला ऐकतच रहावसं वाटतं.
असो...हे कितीही हवंहवंसं वाटलं तरी शक्य नाही मि.सारंग देसाई.
उद्यापासुन ऑफिस आणि नाना व्यवधानं असणार आहेत आपल्याला. निघावंच लागेल आज.
चल..उगाच आपल्यामुळे उशीर नको.
.
.
हं, माहित आहे मी किती अनरोमॅंटिक आहे, बोरिंग आहे अ‍ॅण्ड ऑल दॅट...आणखी काही?
तू पण ना असा आहेस अगदी...चल आता.

******
अ‍ॅण्ड आय वॉन्ट धिस टु बी डन इन टु आवर्स!
हम्म.. नुसते येस मॅम म्हणु नका. चला कामाला लागा.
का रे सारंग? तू का असा उभा? चल लवकर कोड घे हातात, आज डेमो द्यायचा आहे ना क्लायंटला.
.
आता काय बोलायचंय माझ्याशी? संध्याकाळी बोलु डेमो झाल्यावर.
.
हो रे बाबा...सि.सि.डी ला जाऊ.
इकडे असल्यावर आपल्या बोलण्याला कॉफीची साक्ष नाही असं कधी होतं का?
नाऊ कमॉन. गेट गोईंग.

******
मस्त झाला ना डेमो? अगदी खुश झाला क्लायंट.
मला वाटतं याच्या पुढच्या काही ऑर्डर्स येतील आपल्याला. वुई हॅव मेड ईट सारंग!
.
बरं बाबा, नाही करत ऑफिसच्या गोष्टी.
बोल. तू काही बोलणार होतास ना.
.
.
.
.
.
अरे काय बोलणार? म्हणजे तू अचानक असं काही सांगशील असं मला वाटलंच नाही.
.
हो.बरोबर आहे.पहिल्यांदा मलाच सांगतोय्स.
पण अचानक लग्न वगैरे?
.
गप्प बस हं..काहीही फुटकळ कारणं सांगु नकोस...
लग्नाचं वय वगैरे झालंय हे काही कळत नाही का मला?
सगळ्यांना कळतं. पण...या आधी बोलला नाहीस कधी.
कदाचित मीच कधी विचारलं नाही.
.
हो रे राजा, मी खुश आहे. खुश नसायला काय झालं?
तू पण ना असा आहेस अगदी... मग पुढचं कसं काय?
******

हो गं आई. कळतं मला. पण जरा वेळ दे ना.
आता कुठे मी जॉब मध्ये स्थिर होत आहे. काय घाई आहे लग्नाची?
.
हम्म्म..मी काही टाळत वगैरे नाही आहे.
.
हो गं. कोणी असेल आवडत तर तुला सांगेन येऊन...
.
पण नुसतं मला आवडुन काय आहे? समोरच्याला पण मी आहे अशी आवडली पाहिजे ना.
.
नाही. काही नाही.
चल मी निघते ऑफिसला.
,
काय? आज कशाला ठेवला बघण्याचा कार्यक्रम?
तू मला विचारुन का नाही ठरवत गं ह्या गोष्टी?
आज मला उशीर होणार आहे ऑफिस मधुन यायला. पुढच्या दोन दिवसात डिलीव्हरी करायची आहे अ‍ॅप्लिकेशनची.
.
बघु गं पुन्हा कधीतरी.
चल बाय. मी गेले.

******
काहीतरी काय बोलतोय्स सारंग? मी का खुश नसेन अरे?
.
.
अरे बाबा..त्या दिवशी घरी जायची घाई होती.
आता म्हणुन तर तुला मुद्दाम कॉफी साठी बोलवलं. सांग आता चल.
....
बोल आता. काय झालं शांत बसायला?
.
.
.
काय म्हणजे? नाव काय आहे तुमच्या होणाऱ्या सहचारीणीचं?
....
अय्या...लाजतोय्स की काय?
.
कसं कळलं म्हणजे? मी काय आज ओळखते का तुला? सांग आता.
.
संध्या. छान नाव आहे रे. शेवटी माझं पण नाव आहे ते म्हटलं.
आणि काय? ह्याच शहरातली आहे का?
उत्तम!
दिसायला सुंदर असणारच...आफ्टर ऑल सारंग देसाईची चॉईस आहे.
.
.
.
काय म्हणतोय्स?
.
अरे नाही रे. शांत नाही बसले मी. विचार करत आहे.
.
काय?
.
चल! असं काही नाही. आणि असलं तरी...
.
.
नाही. काही नाही.
.
.
.
.
आग्रह करतो आहेस म्हणुन सांगते. हो. आवडतोस मला तू. मनापासुन आवडतोस.
खुप प्रेम करते मी तुझ्यावर!
.
.
नाही..मी नाही रडत आहे.
प्रत्येकाला आपला जोडीदार निवडायचा हक्क आहे. आणि...
.
आणि मी ही अशी.
हं, स्वप्नं असतातच रे...सगळ्यांचीच असतात.
पण ती कोणाला पुरली आहेत आयुष्याला?
आय अ‍ॅम रिअली हॅप्पी फॉर यु सारंग.
तुला खुप चांगली जोडीदारीण मिळाली आहे.
.
.
म्हटलं ना, नाही रडत मी.
.
ए गप्प बस हं तू. म्हणे मुली मंद असतात...मी काय केलं आता मंदासारखं?
.
.
काय?
.
मला बरं वाटावं म्हणुन म्हणतोय्स ना?
.
चल! माझा नाही विश्वास बसत. ठरलं असेल तुझं लग्न.
.
अरे पण..
.
तुला माझ्याकडुन ऐकायचं होतं? माझ्या होकाराची वाट बघत होतास?
पण...पण हे असं खोटं का सांगितलंस?
.
.
मग? कळलं का आता...मला काय वाटतं ते तुझ्याबद्दल?
.
काय?
.
.
.
अरे काय बोलु? तू पण ना असा आहेस अगदी.
.
मी लाजत नाहीये.
.
.
ओके.ओके. आय लव्ह यु टू.

किती पीडतो हा मला. पण हे सत्यच आहे ना?
की मी स्वप्न बघतीये?
म्हणजे...म्हणजे खरंच त्याला मी आवडायचे?
त्यालाही माझ्याबद्दल तेच वाटतं जे...
मला ना...समुद्रा किनारी फिरल्यासारखं वाटतंय आता...
खाली पायांना वाळुचा स्पर्श जाणवतोय...पण..
यावेळी, सकाळचा.. मऊ, थंड...गुबगुबीत गादीवरुन चालत गेल्यासारखा
हो...तशीच कुरवाळतीये ती माझ्या पायांना...जसं
तू..मला..माझ्या मनाला कुरवाळलंस...
अरे...मला त्या लाटांचा लयीतला गाजही ऐकु येतोय..खरंच!
आपण कुठे आहोत सारंग?
.
.
गप रे.. चिडवु नकोस.
पण असा कसा रे तू?
एवढे दिवस फक्त माझी प्रतिक्रीया पहायला हे सगळं केलंस?
.
.
नाही रे..मी स्वत:ला कमी लेखत नाही. पण तरीही कुठलाही...
.
.
हो. कुठलाही धडधाकट मुलगा माझ्याशी लग्न करेल अशी अपेक्षा मी ठेवलीच नाही कधी आयुष्यात!
.
ए...फटके काय देतोय्स..गप रे.
चल आता ती केन दे माझी इकडे. नीट फोल्ड होत नाहीये..आतली रस्सी तुटलीये.
बदलुन आणायला हवी.
.
.
तोपर्यंत काय करणार म्हणजे?
आहेस ना तू आधार द्यायला?
तुझे दोन डोळे पुरे आहेत आपल्याला जगाकडे बघायला. चल!

 

                        कामिकाझे

 जपानी माणसाने चार ओळी खरडल्या तरी त्याला एक प्रकारचा गूढ अर्थ प्राप्त होतो हेच खरे. त्यांच्या झेन गोष्टीच बघा किंवा हायकू बघा. मी एक हायकू वाचली होती ती अशी काहीतरी होती. माझा त्याचा अभ्यास नाही पण त्यातील गूढ अर्थ माझ्या चांगला लक्षात राहिला होता...तो असा काहितरी होता...
फासा
चार चेहरे.

प्रयत्न

 दु:ख
याचा अर्थ असा आहे की तुम्ही कितीही नियंत्रण करायचा प्रयत्न केला तरी फेकल्यावर फासाच्या एका तरी चेहर्‍यावरचे दान पडतेच आणि मग ते कुठले आहे हे समजून काय करणार...शेवटी दु:खच.... असे काहितरी.

आता ही हायकू बघा..
वसंत ऋतूत ती फुलतात मग विरतात
आयुष्य एखाद्या नाजूक फुलासारखेच आहे
सुगंध त्याचा कसा राहील
कायमचा ?

ही हायकू रचली होती जपानच्या एडमिरल ताकिजिरो ओनिशी याने. याच माणसाने कामिकाझेसाठी वैमानिकांची भरती केली होती. कामिकाझेचा शब्दश: अर्थ “स्वर्गीय वारा” किंवा दुसर्‍या शब्दात सांगायचे तर इश्वरी कृपा. आज आपण कामिकाझेची गोष्ट ऐकणार आहोत. आता कामिकाझे असणे/होणे चूक का बरोबर हे आपण जे झाले त्यांच्यावर सोडू आणि आपल्याला यातून प्रखर देशभक्ती म्हणजे काय हे कळाले तरी मी म्हणतो या लेखाचे काम झाले. ही गोष्ट कमांडर तादाशी नाकाजिमा यांच्या लेखावरून लिहिली आहे.
१९४४ साली फिलिपाईन्समधे माबलाकातच्या जपानी विमानतळावर जपानच्या २०१ एअर ग्रूपचा तळ होता. १९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळच्या उदास सावल्या त्या विमानतळावर पसरत असतानाच एक काळी कुळकुळीत गाडी त्या विमानतळाच्या मुख्यालयासमोर थांबली आणि त्यातून एडमिरल ताकिजिरो ओनिशी बाहेर पडला. जपानच्या १ क्रमांकाच्या स्क्वाड्रन कमांडर असलेला हा अनुभवी हवाईदलाचा अधिकारी, हवाई युद्धाचा तज्ञ म्हणून जगभर प्रसिद्ध होता. त्याने आल्या आल्या सर्व वैमानिकांची आणि त्यांच्या अधिकार्‍यांची बैठक बोलवली आणि फालतू बडबड न करता त्याने मुद्द्याला हात घातला.
“परिस्थिती अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. जपानच्या साम्राज्याचे भवितव्य “शो” वर अवलंबून आहे. (फिलिपाईन्स शत्रूच्या ताब्यात परत जाऊ नये म्हणून जी योजना आखली गेली होती तिचे नाव होते ’ऑपरेशन शो’. या पराजयाच्या जवळ आलेल्या काळात या शब्दाचा अर्थ मोठा उपहासपूर्ण वाटत होता. त्याचा अर्थ आहे ’विजय’) एडमिरल कुरिटाच्या अधिपत्याखाली एक नौदल लेतेच्या आखातात आक्रमण करून तेथील शत्रूला कंठस्नान घालणार आहे. यासाठी या पाण्यात शत्रूच्या बोटींना मज्जाव करायची कामगिरी १-स्क्वाड्रनवर सोपवण्यात आली आहे. कमीत कमी एक आठवडा आपल्याला हे संरक्षण पुरवायचे आहे. पण पारंपारीक युद्ध करून शत्रूच्या या बोटी बुडवणे आपल्याला शक्य नाही. माझ्या मते शत्रूची ही विमानवाहू जहाजे जर त्यांच्या धावपट्टीवर आपल्या विमानांनी धडक मारून ती उध्वस्त केली तरच हे शक्य आहे. यासाठी आपली झिरो फायटर विमाने उपयोगी पडतील. त्यात २५० किलो स्फोटके सहज जाऊ शकतात”
त्यांना काय करायचे होते त्याचे चित्र. अर्थात हे खरे आहे.
ते ऐकून, एकणार्‍यांच्यात विरश्री संचारली. त्याच्या या भाषणाचा अर्थ न कळण्याइतके ते दुधखुळे नव्हते. तो त्यांना त्याच्या आत्मघातकीपथकात सामील व्हा असे आवाहन करायला आला होता. त्याचे भाषण संपल्यावर २०१- एअर ग्रूपच्या कमांडर तामाईने त्याच्या स्क्वाड्रन लिडर्सशी चर्चा करण्यासाठी वेळ मागितला. हे ऐकल्यावर त्याचे बहुतेक करून सर्व वैमानिक या आत्महत्येला तयार होतील अशी त्याला खात्री होती. “ते सर्व जण चुपचाप होते पण त्यांचे डोळे बोलत होते. व जे अनेक वाक्यात सांगता येणार नाही ते एका नजरेत सांगत होते ’हो आम्ही जाणार’”. कमांडर तामाईने नंतर त्याच्या आठवणीत सांगितले आहे. फक्त दोघांनी या कामगिरीसाठी नकार दिला.
या पहिल्या हल्ल्याचे नेतृत्व लेफ्टनंट युकिओ सेकी करणार होता, हा एक बुद्धिमान, अत्यंत प्रामाणिक असा अधिकारी होता आणि त्याने त्याचे प्रशिक्षण जपानच्या इता जिमा नॅव्हल एकॅडमीमधून पूर्ण केले होते. जेव्हा कमांडर तमाईने सेकीला मोहिमेबद्दल सांगितले तेव्हा त्याने समोरच्या टेबलावर आपले दोन्ही कोपरे टेकले. हाताच्या पंजांनी आपल्या हनुवटीला आधार दिला आणि डोळे बंद केले.
या तरूण अधिकार्‍याचे नुकतेच लग्न झाले होते. त्याच्या डोळ्यासमोर त्याची सुंदर पत्नी व स्वप्ने तरळली. दोन सेकंदानंतर त्याने डोळे उघडले, मान वर करत तो म्हणाला “ठीक आहे मी हे नेतृत्व स्विकारतो”.
२० ऑक्टोबरला सूर्योदय झाल्यावर एडमिरल ओनिशी याने कामगिरीवर जाणार्‍या २४ कामिकाझेंना बोलवले आणि त्यांना त्यांची कामगिरी समजाऊन सांगितली. ती सांगतांना त्याच्या सारख्या कसलेल्या व युद्धात ताऊन सुलाखुन निघालेल्या कमांडरचाही आवाजातला कंप जाणवत होता.
“जपान एका अत्यंत भीषण आपत्तीला सामोरे जात आहे. या आपत्तीतून बाहेर पडणे हे आपले राजे, त्यांचे मंत्रीमंडळ आणि माझ्या सारख्या कनिष्ट दर्जाच्या अधिकार्‍यांच्या शक्तिबाहेरचे आहे. आता जपानचे भवितव्य तुमच्या सारख्या तरूणांच्या हातात आहे” त्याच्या डोळ्यातून अश्रूंचे दोन थेंब ओघळले ते त्याने लपविले नाहीत. (ही एक अशक्य कोटीतील गोष्ट मानली जाते) “जपानसाठी जे काही करता येईल ते करा त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो”.

इतर विमानतळावरही कामिकाझेसाठी याच प्रकारची भरती चालली होती. सेबूच्या विमानतळावर २० ऑक्टोबरला संध्याकाळी ६ वाजता सगळ्यांना एका सभागृहात जमविण्यात आले. त्यांना संबोधीत करत कमांडर म्हणाला
“या विशेष कृतीदलात ज्याला भाग घ्यायचा आहे त्याने एका कागदावर आपले पद व नाव लिहून तो कागद एका लिफाप्यात घालून, ते बंद करून माझ्याकडे द्यायचे आहे. ज्याला जायचे नाही त्याने कोरा कागद लिफाप्यात घालावा. तुम्हाला विचार करायला तीन तास देण्यात येत आहेत”.

रात्री ९ वाजता एका वरीष्ठ आधिकार्‍याने एक पाकीट कमांडरच्या घरी पोहोचते केले. आतल्या कागदांमधे फक्त दोन कोरे होते.
२५ ऑक्टोबरला कामिकाझे तुकडीने आपला पहिला यशस्वी हल्ला केला. सहा विमानांनी पहाटे दवाओ विमानतळावरून उड्डाण केले आणि ती लगेचच शत्रूच्या तीन विमानवाहू नौकांवर जाऊन आदळली. ही तिन्हीही जहाजे निकामी झाली.
त्याच दिवशी सकाली ले. सेकीने माबलकात विमानतळावरून आपल्या सहकार्‍याबरोबर उड्डाण केले. त्यांना मार्ग दाखवणार्‍या एका विमानाच्या वैमानिकाने त्यावेळेचा वृत्तांत लिहिताना म्हटले “शत्रूच्या चार विमानवाहू नौका व इतर सहा नौका दिसल्यावर ले. सेकीने सुर मारला व तो एका विमानवाहू नौकेवर जाऊन आदळला. दुसरे एक विमान त्याच नौकेवर आदळले आणि त्या नौकेतून धुराचे मोठे लोट निघू लागले. अजून दोन वैमानिकांनी आपले लक्ष अचूकपणे टिपले.”

कामिकाझेच्या यशाची बातमी जपानच्या नौदलात झपाट्याने पसरली. त्या अगोदर जपानने याच नौकांवर ९३ लढाऊ विमाने आणि ५७ बाँबफेकी विमानांच्या सहाय्याने हल्ला चढवला होता पण त्याने शत्रूचे काहीच नुकसान झाले नव्हते. या पार्श्वभुमीवर कामेकाझेच्चे यश फारच उठून दिसत होते.
एडमिरल ओनिशीची आता खात्री पटली होती की हे मानवी टॉरपेडोच आता कामास येणार आहेत. त्याने २-एअर प्लिटच्या व्हाईस एडमिरल फुकुदोमेला या बाबतीत पटवले. “ याखेरीज आपल्याला दुसरा मार्ग नाही. तुझ्याही फ्लिटने हा मार्ग अनुसारायची वेळ आता आलेली आहे.”
अशा रितीने कामिकाझेचा मार्ग मोकळा झाला आणि तरूण वैमानिक या त्यागासाठी मोठ्या अहमहमिकेने या स्वर्गीय वार्‍यावर स्वार होण्यासाठी नावे नोंदवू लागली. जपानच्या मुख्य भुमीवरूनही कामिकाझेमधे सामील होण्यासाठी अनेक तरूण पुढे सरसावले व बोलावणे यायची वाट पाहू लागले..............
काही कामिकाझे -
अशा रितीने कामिकाझेचा मार्ग मोकळा झाला आणि तरूण वैमानिक या त्यागासाठी मोठ्या अहमहमिकेने या स्वर्गीय वार्‍यावर स्वार होण्यासाठी नावे नोंदवू लागली. जपानच्या मुख्य भुमीवरूनही कामिकाझेमधे सामील होण्यासाठी अनेक तरूण पुढे सरसावले व बोलावणे यायची वाट पाहू लागले..............

पण काळ आणि होणार्‍या गोष्टी कोणासाठी थांबत नाहीत. जशी जशी दोस्तराष्ट्रांच्या आक्रमणाची तीव्रता वाढत गेली तशी तशी कामिकाझेच्या हल्ल्यांची संख्याही वाढत गेली. दुर्दैवाने जपानी अधिकार्‍यांना आता विमाने कमी पडू लागली होती. एक निकाराचा प्रयत्न म्हणून ५ जानेवारीला एक सगळ्यात मोठा कामिकाझे हल्ला योजण्यात आला. १५ विमाने लिंगायेनच्या आखातात अमेरिकेच्या युद्धनौकांच्या काफिल्यावर आदळली. त्यात अमेरिकेच्या युद्धनौकांचे बरेच नुकसान झाले.

जपानच्या भुमीवरच्या अनेक पराभवानंतर जपानला अखेरीस फिलिपाईन्सवरचा ताबा सोडावा लागला. दोस्तांनी फेब्रुवारीत इवो जिमा वर आक्रमण केले. एप्रिलमधे त्यांनी ओकिनावावर आक्रमण करून या युद्धावरची आपली पकड घट्ट केली. याने जपानची भुमिका बदलली. आता ते आक्रमक राहिले नाहीत तर आता त्यांना आपल्या मातृभुमीच्या संरक्षणासाठी लढायचे होते. कामिकाझे आता फार मोठ्या प्रमाणावर उपयोगात आणण्यात आले. कामिकाझे वैमानिकांसाठी खास विमाने तयार करण्यात आली व प्रशिक्षण केंद्रेही उघडण्यात आली. या लढाईसाठी एका नवीन आत्मघाती अस्त्राची निर्मीती करण्यात आली. बाँबरला एक १८०० किलोचे मिसाईल जोडण्यात आले. लक्ष टप्प्यात आले की हे मिसाईल सोडून त्याच वेळी ते विमान नौकांवर धडकविण्यात येई. या विमानांच्या वैमानिकांना नाव ठेवण्यात आले जिनराई बुताई. (स्वर्गीय वज्र ) अमेरिकन मात्र याला “बाका बाँब” म्हणत. म्हणजे मुर्खांचा बाँब !

हे अस्त्र ओकिनावावर १२ एप्रिलला जपान्यांनी जो हल्ला केला त्यादरम्यान डागले गेले. ज्या विमानाने पहिला हल्ला केला त्याचा वैमानिक शेवटपर्यंत शांत होता. तो या हल्ल्यावर जायच्या अगोदर एका वसतीगृहाच्या पर्यवेक्षकाच्या भुमिकेत होता. त्या मृत्यूच्या दारी चाललेल्या विमानात चढताना तो खाली उभ्या असलेल्या त्याच्या सहाय्यकाला म्हणाला “मी आपल्या
वसतीगृहासाठी काही चटया मागवल्या आहेत त्याच्यावर जरा लक्ष ठेव. ओकिनावा येईपर्यंत हा वैमानिक शांतपणे झोपला होता आणि सत्य हे आहे की त्याला उठवावे लागले होते.
ओकिनावाच्या युद्धातच १८०० आत्मघातकी हल्ले करण्यात आले. जपानने शरणागाती पत्करली तो पर्यंत २५१९ कामिकाझे वैमानिकांनी आपले बलिदान दिल्याची नोंद आहे.


१५ ऑगस्ट १९४५ रोजी जपानच्या शरणागतीनंतर युद्धबंदीची घोषणा झाल्यावर जपानच्या पाचव्या एअर फ्लीटचा प्रमुख एडमिरल उगाकी याने कामिकाझे प्रमाणेच आपली आयुष्य संपवायचे ठरवले. “मी माझ्या वैमानिकांना मरण स्विकारायला लावले, मलाही आता त्याच रस्त्याने जायला पाहिजे”. असे म्हणून त्याने आपल्या गणवेषावरील सर्व पदचिन्हे, मानसन्मान काढून टाकले व इतर कामिकाझेप्रमाणे त्याने आपले साहित्य उचलले व जमलेल्या इतर वैमानिकांना तो म्हणाला “ मी ओकिनावावर आत्मघात करणार आहे. ज्यांना माझ्या बरोबर यायचे आहे त्यांनी हात वर करावेत”. हाताशी असणार्‍या विमानांच्या संख्येपेक्षा वैमानिकांची संख्या जास्त होती. अकरा विमानांपैकी सात विमानांच्या वैमानिकांनी (त्यात एडमिरल उगाकीही होता.) ओकिनावावर अमेरिकन लक्षावर धडकण्याअगोदर ते तसे करत असल्याचा संदेश पाठवला.
त्याच संध्याकाळी एडमिरल ओनिशी जो नॅव्हल जनरल स्टाफचा उपप्रमुखही होता त्याने एक चिठ्ठी लिहायला घेतली
“ माझ्या सहकार्‍यांनी जे अतुलनीय शौर्य गाजवले आहे त्यांच्या अमर आत्म्यांना मी वंदन करतो. मी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची क्षमा मागून माझी जीवनयात्रा संपवत आहे. जपानच्या युवकांनी कामिकाझेप्रमाणे जपानच्या पुनर्बांधणीस व जागतीक शांतीसाठी वाहून घ्यावे” असे लिहून त्याने त्याची सामुराईची तलवार स्वत:च्या पोटात खूपसून घेतली. पण तो लगेचच मेला नाही. त्याने काईशाकुनिनही नेमला नव्हता. वैद्यकीय मदत नाकारून तो संध्याकाळ पर्यंत तो तसाच विव्हळत पडला. ही शिक्षा त्याने स्वत:ला करून घेतली होती -

एडमिरल ओनिशी
त्याचा गुन्हा दुसर्‍या महायुद्धातील अमानवी कामिकाझेची निर्मिती हाच असणार कारण तो पर्यंत त्याच्या आयुष्यात पश्चात्ताप व्हावा असे कुठलेही कृत्य त्याने केले नव्हते...............
(एखादा जपानी जेव्हा सेपूकू (आत्महत्या) करतो तेव्हा तो एका दुसर्‍या माणसाला त्याचे शीर धडावेगळे करण्यासाठी नेमतो. त्याला म्हणतात काईशाकुनिन. पण काही वेळा पश्चात्ताप टोकाचा असेल तर हा दुसरा माणूस नेमला जात नाही. वेदनेत तडफडत मरणाला कवटाळले जाते)
ले. सेकी -

ज्याने बंकर हिल नौका बुडविली तो कामिकझे कियोशी -


कामिकाझे - स्मारक....

 

                           अखेरचा पर्याय !

प्रिय बहीण अनामिका,
या आधी तुला बरीच पत्र लिहिली पण एकाही पत्राचं तू उत्तर पाठवलं नाहीस, कदाचित तू ती वाचलीच नसशील तुझं वय नक्कीच पत्र वाचण्याइतकं नसणार तेव्हा, म्हणूनच इतक्या उशीरा तुला हे पत्र लिहीत आहे.
तुला कदाचित माहीतही नसेल की तुला एक मोठा दादा आहे. खरंतर मलाही माहीत नव्हतं की मला लहान भाऊ झालाय की बहीण, पण एकदा आत्याला माझ्या आईबद्दल बोलताना मुलगी बद्दल काहीसं बोललेलं ऐकलं, तेव्हा मला कळलं आणि मी माझ्यातर्फे तुला अनामिका हे नाव देऊन टाकलं. आईबाबांनी तुझं नाव काय ठेवलंय?
कमीतकमी हे तरी सांगितलंय का की तुला एक मोठा भाऊ आहे म्हणून ?
का कुणास ठाऊक पण त्यांना मी कधी आवडलोच नाही. तू येणार हे आईबाबांना कसं कळलं कुणास ठाऊक, पण त्यांनी ताबडतोब माझी रवानगी इकडे आत्याकडे केली. त्या दिवशी मी त्यांना पाहिलं ते शेवटचं अजूनही मला भेटायला सुद्धा कुणी आलं नाहीये. माझी सावलीसुद्धा तुझ्यावर पडू नये असं बाबांना बोलताना ऐकलं होतं. इतका का मी वाईट आहे ?
तसा मी इकडे आत्याकडे ठीकच आहे असं म्हणायचं. काका देवाघरी गेल्यावर आत्या एकटीच होती तिला आता माझा आधार आहे, असं ती तरी म्हणते, तसं ती मनापासून म्हणत असेल असं मला नाही वाटत, तरी मला फारसा त्रास नाही. मात्र मला आत्या क्षणभरही एकटं सोडायला तयार नसते. बाहेर मुलांच्यात खेळणं तर दूर पण साधं नीट बोलूही देत नाही. आता मी काय लहान आहे का ? चांगला आठवीत आहे मी आता. हं आता आमची शाळाच अशी आडगावात आहे म्हटल्यावर थोडा जगापेक्षा मागे असेनही मी, पण मी खूप पुस्तकं वाचतो बरं का ! तसंही रोज खिडकीतून बाहेरच्या मैदानावर खेळणार्‍या मुलांकडे आशाळभूतपणे कितीवेळ पाहणार ?
आईबाबा तुझ्याशी कसे वागतात गं ? चांगलेच वागत असू देत, पण बाबा काय सांगतील ते नीट ऐक हं, कारण एकदाच मी त्यांचं न ऐकता बाजूच्या माईंकडे गेलो होतो तर त्यांनी मला पट्ट्यानं मार दिला होता. मी मुलगा असून दोन दिवस कळवळत होतो, तू तर मुलगी आहेस तुला नाही सहन होणार.

आता आणखी जास्त लिहीत नाही, तसं लिहिण्यासारखं खूप आहे, पण तुझं उत्तर आलं तरच लिहीन कारण माझं पत्रही तुझ्यापर्यंत पोहचू न देण्याची काळजी आईबाबा घेत असतीलही कदाचित. तेव्हा जर पत्र मिळालं तर उत्तर मात्र नक्की पाठव मी वाट पाहत आहे.
तुझा
किरणदादा

.
विमलाताईंना रोजच्या पत्रव्यवहाराच्या गठ्ठ्यात आज पुन्हा ते पत्र मिळालं. या आधीही तशीच चार-पाच पत्र त्यांना मिळाली होती पण त्यांनी तिकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं होतं. `असेल कुणाचंतरी नेहमीसारखंच ख्यालीखुशाली विचारणारं पत्र' त्यांनी विचार केला होता. न फोडताच त्यांनी ती पत्र पुन्हा पत्र पेटीत टाकून दिली होती. पत्र पाठवणार्‍या व्यक्तीला एकदा कळवायलाच हवं की ज्या ताम्हणकरांना पत्र पाठवली जात आहेत ते इथे रहात नाहीत असं म्हणून त्यांनी पत्ता नीट टिपून घेतला पण कामच्या गडबडीत ते राहूनच गेलं.
आजच्या पत्राकडे पाहताना त्यांना ते आठवत होतं.
मन काहीवेळ मागेपुढे करत होतं, अखेरीस दुसर्‍याचं खासगी पत्र फोडण्याची तयारी व्हायला काही मिनिटं गेलीच. शेवटी मनाशी निश्चय करत त्यांनी ते पत्र फोडलं.
लहानसंच पत्र पण त्यांच्या मनात अनेक प्रश्न उभे करून गेलं. कोण असेल हा मुलगा ? कुठे असेल याची बहीण ?
एरव्ही त्यांच्या स्वभावानं त्यांना शांत राहू दिलं नसतं पण अनेक कामं शिल्लक होती, नवीन घराची कागदपत्र पूर्णं करणं, विजेच्या मीटरची नोंद स्वतःच्या नावावर करणं, शहरात नवीन आल्यावर जे काही सोपस्कार पार पाडावे लागत होते त्यांच्या धावपळीत विमलाताईंचा दिवस कुठच्याकुठं निघून गेला.
त्या पत्राचा त्यांना विसर पडला.

.
प्रिय बहीण अनामिका,
खूप दिवस तुझ्या पत्राची वाट पाहिली पण तुझं उत्तर आलं नाही. मला वाटतं माझं पत्र खरंच तुझ्या हातात न पडू देण्याची काळजी बाबा घेत असतील. जर आता हे पत्र त्यांच्याच हातात असेल तर नक्की ते मला मार देण्यासाठी इथे येतील, पण मला माराची भिती आता नाही वाटत. कमीतकमी या कारणाने का होईना ते मला भेटतील तर खरे.
इथे आल्यापासून आजपर्यंत आई किंवा बाबा कुणीच माझ्या भेटीला आलं नाहीये. तुझ्या येण्यानं ते मला विसरले तर नसतील ना ?
तसं असलं तरी चालेल, पण तू मात्र विसरू नको की तुझा दादा इथे आहे. पुढे जेंव्हा तू मोठी होशील तेव्हा मला भेटण्यासाठी हट्ट कर, मलाही तुला पाहायचं आहेच.
काल आत्याच्या हातचा मार खाल्ला. चूक माझीच होती, तिने बजावून सांगितलेलं असतानाही मी तिची नजर चुकवून बाहेर मुलांच्यात खेळायला गेलो. खरंच, इथली मुलं वाईट आहेत. मला खेळायला घेण्याऐवजी माझी खिल्ली उडवत होते सगळे. माझ्याभोवती फेर धरून नाचत काहीसं ओरडतही होते. त्याच आरड्याओरड्यामुळे आत्या बाहेर आली आणि तिनं मारतच मला घरात नेलं. खरंतर मला अजूनही कळत नाही की त्या मुलांना आत्या का रागावली नाही ? कदाचित तिला भांडण नको असतील, कारण आजूबाजूला त्या मुलांचे पालक ( आपल्याला जे कुणी सांभाळतात त्यांना आपले पालक म्हणतात, तुला माहीत नसेल तर लक्षात ठेव) वावरत होते किंवा दुसर्‍यांच्या लहान मुलांना रागावायची तिची इच्छा नसेल, पण मार मात्र मलाच पडला.
मला अजूनही कळलेलं नाहीये जर इथली माणसं इतकी वाईट आहेत तर मला इथे का ठेवलेय बाबांनी ?
तुला शक्य झालं तर बाबांना विचार माझ्याबद्दल ते सांगतीलच असं नाही पण प्रयत्न कर..... पण नकोच एखाद्यावेळी माझ्यामुळे तुलाच मार पडायचा.
आता खूप उशीर झालाय अंधार पडायच्या आत मला हे पत्र टपाल पेटीत टाकायलाच हवं नाहीतर आत्याच्या हाताला लागलं तर ती चिडेल, तिला अंधार पडल्यावर मी बाहेर गेलेला अजिबात आवडत नाही.
या पत्राचं उत्तर तरी नक्की पाठव हं

तुझा
किरणदादा

.
पुन्हा एकदा आणखी एक पत्र विमलाताईंच्या हातात होतं. यावेळी मात्र त्यांना मागच्या पत्राची प्रकर्षानं आठवण झाली. नकळतच त्यांनी ते पत्र फोडलं.
परत एकदा त्यांच्या हळव्या मनाला चटका बसला. आई वडिलांपासून दूर वाढणारा हा किरण त्यांना जरा हुरहूर लावून गेला. का बरं याच्या आई वडिलांनी त्याला आपल्यापासून दूर केला असेल ? बापाचं काळीज दगडाचं असूही शकेल कदाचित पण आईसुद्धा लेकराविना कशी राहते ? आज आपली मुलं नोकरीनिमीत्तानं का होईना पण काहीकाळ दूर आहेत, तर त्यांची किती आठवण येत असते आपल्याला, आणि ही माता अशी लेकराची आठवणही न काढता कशी राहू शकते ?
पुन्हा एकदा मनात प्रश्नांची उधळण झाली. यावेळी मात्र विमलाताईंनी पत्राचा पाठपुरावाच केला.
संध्याकाळी त्यांचे डॉक्टर पती घरी आल्या आल्या त्यांनी ते पत्र त्यांना दाखवलं. पत्रामधल्या मुलाचा शोध घेण्याची त्यांना गळ घातली आणि त्यांनी तसं मान्य करेपर्यंत त्या शांत बसल्या नाहीत.
पत्त्यावर असलेल्या ताम्हणकर आडनावाचा आधार घेत शोध घेत असताना त्यांना ती थोडीफार माहिती मिळाली.
अर्जुन ताम्हणकर, एका सरकारी पदावर काम करणारी व्यक्ती. घरचं वातावरण एकदम सनातनी. चार मुलींच्या पाठीवर झालेला घरातला एकुलता एक मुलगा, अर्थातच थोडेफार लाडही झाले, पण जबाबदार्‍याही त्याच प्रमाणात वाढल्या. घरच्या जबाबदार्‍या पार पडेपर्यंत त्यांच्या लग्नाचं वय बर्‍यापैकी उलटलं.
सांसारिक जीवन उत्साहात नसेल पण व्यवस्थित पार पडत होतं. यथावकाश त्यांना अपत्यही झालं आणि इथेच काहीतरी चुकलं.
लेबररुम मधून मुलाच्या रडण्याचा आवाज आला आणि ताम्हणकर कुटुंबीय मोठ्या आशेने डॉक्टरांच्या बाहेर येण्याची वाट पाहत राहिले. वाट पाहण्याच्या परिसीमा संपत आल्यानंतर डॉक्टर बाहेर आले ते ही गंभीर चेहर्‍यानं. नजरेनंच खूण करून त्यांनी ताम्हणकरांना बाजूला नेलं आणि बराचवेळ त्यांच्याशी काही बोलत राहिले.
अर्जुनरावांनी परत येऊन आपल्या कुटुंबीयांना बातमी दिली, त्यांना मुलगी झाली होती आणि काही वैद्यकीय गुंतागुंतीमुळे पुढे पुन्हा माता बनण्यात त्यांच्या पत्नीच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकत होता.
सनातनी विचारसरणीच्या ताम्हणकर कुटुंबीयांवर हा दुखा:चा पहाडच कोसळल्यासारखा होता. वंशाला दिवा तर हवा.....
मुलीचं बारसंही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत करून घेण्यात आलं आणि `किरण' असं मुलगा मुलगी कुणालाही चालू शकणारं नाव देऊन टाकल्या गेलं.
लहानपणापासूनच किरणचा सांभाळ मुलाप्रमाणं केल्या गेला. बाहुली, भातुकली असले खेळ कधी तिच्या नजरेसही पडू दिले नव्हते. इतकं सगळं करूनही अर्जुनरावांचा तिच्यावर राग कायम होता.
कशीबशी चार- सहा वर्ष अर्जुनरावांनी किरणचा सांभाळ केला, पण कायम राग-राग करतच. अखेरीस हे सारं सहन न होऊन त्यांच्या पत्नीनं दुसर्‍या अपत्याचा त्यांचा विचार अमलांत आणायला मान्यता दिली, स्वतः:ची पर्वा न करता.
दुसर्‍या अपत्याची चाहूल लागली आणि अर्जुनरावांनी किरणला दूरवर आपल्या मोठ्या बहिणीच्या घरी कायमचं पाठवून दिलं.
अर्जुनरावांची मोठी बहीणही आपल्या भावाच्याच विचारसरणीची, तिनंही किरणला कधी मुलींप्रमाणे जपलं नाही.
.
वेगवेगळ्या स्रोतांतून माहिती मिळणं अजूनही चालूच होतं, आजवर ज्या किरणला त्या मुलगा समजत होत्या ती प्रत्यक्षात एक मुलगी होती हे जरी त्यांना कळलं असलं तरीही विमलाताईंच्या मनात अनेक प्रश्न अनुत्तरित राहिलेले होते.
किरणचा सांभाळ जरी मुलाप्रमाणं केला असला तरी तिला स्वतःला तिच्या स्त्रीत्वाची निसर्गतच असायला हवी असलेली जाणीव कशी नव्हती ?
ज्या बहिणीला किरण पत्र लिहीत होती ती नक्की कुठे होती ? आणि पत्र नेमकी याच पत्त्यावर कशी येत होती ?
.
अशातच आणखी एक पत्र येऊन पडलं.
.
प्रिय बहीण अनामिका,

काल राखीपौर्णिमा होती, तुझ्या राखीची मी खूप वाट पाहिली पण राखी आलीच नाही. आजूबाजूच्या मुलांच्या हातावर बांधलेल्या राख्या पाहिल्यावर खूप वाईट वाटलं. ज्यांच्या सख्ख्या बहिणी नाहीत ते सुद्धा चुलतं मावसं बहिणींनी बांधलेल्या राख्या मिरवत होते आणि माझी सख्खी बहीण असताना कालच्या दिवशी माझा हात मोकळाच होता.
तुलाही माझ्याबद्दल आपुलकी नाही का ? आईबाबांसारखं तू ही मला वाईट समजतेस का ?
मला तुला भेटायचंय तुझ्या हातून राखी बांधून घ्यायचीये. एक दिवस गुपचुप मी इथून आत्याचा डोळा चुकवून सटकणार आहे आणि मग तिकडे येईन. यायचं कसं ते मला माहीत नाहीये पण विचारता येईल कुणालाही. मग आपण भेटू, आईबाबांना मात्र यातलं काही सांगू नकोस हं .

तुझा
किरणदादा
.
विमलाताईंनी पत्र वाचलं आणि त्यांच्या अंगावर शहारा आला. ही अशी स्वतःबद्दल अजाण असलेली मुलगी खरंच घरातून निघून इकडे यायला निघाली तर ?
तिला भले स्वतःबद्दल काहीही वाटो पण पहाणार्‍या जगापासून तिचं स्त्रीत्व लपून राहणार आहे का ? काय होईल तिचं या पाशवी जगात ?
ताबडतोब त्यांनी आपल्या पतीला त्यांच्या क्लिनिकवर निरोप पाठवून बोलावून घेतलं आणि सगळा प्रकार व्यवस्थित त्यांच्या कानावर घातला.
सगळी हकीगत ऐकल्यावर त्यांच्यातला मानसोपचार तज्ज्ञ जागा झाला. त्यांनी विमलाताईंना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं दिली.
" अगं, ही एक साधी पण अत्यंत गुंतागुंतीची केस आहे, काही माणसांचं मन अतिशय संवेदनशील असतं त्यांच्या मनावर एखादी गोष्ट ठसवल्या गेली की ते इतक्या सहज मान्य करून टाकतं की शरीराच्या क्षमताही त्यापुढे कमी पडतात. संमोहनाच्या कार्यक्रमात पाहिलंच असशील की संमोहनाखाली गेलेली व्यक्ती नाही का कारल्याला केळं समजून सहजासहजी खाते ? हा ही तसाच प्रकार परिणाम मात्र खूप खोलवर झालेला. " विमलाताई कान देऊन ऐकत होत्या.
" यावर इलाज असा काहीच नाही का ? " त्या विचारत्या झाल्या. आवाजात काळजी जाणवत होती.
" नाही कसा ? एकदा त्या मुलीच्या आईवडीलांना भेटायला हवं त्यांनी जर तिचा मुलगी म्हणून स्वीकार केला तर हळूहळू तिच्या विचारात फरक पडायला लागेल, आणि वयापरत्वे येणारे हार्मोनीक बदल त्यांचं काम करतीलच. मात्र हे सारं लवकरात लवकर घडायला हवं अन्यथा वयात येताना होणार्‍या बदलांचा त्या मुलीच्या मनावर विपरीत परिणाम होण्याचीच शक्यता जास्त आहे." विमलाताईंची समजूत काढून त्यांचे पती पुन्हा क्लिनिकवर निघून गेले.

सगळ्या प्रकाराचा नीटसा उलगडा झाला नसला तरी विमलाताईंना वेळेचं महत्त्व जाणवलं होतं, त्यांनी ताबडतोब शक्य त्या प्रकारांनी ताम्हणकर कुटुंबाचा आत्ताचा पत्ता शोधण्यासाठी प्रयत्न चालू केले.
.
एखाद-दोन दिवसात विमलाताईंकडे अर्जुनराव ताम्हणकरांची उरलेली माहितीही जमा झाली आणि ती चांगलीच धक्कादायक होती.
काही काळ त्यांचं वास्तव्य आज विमलाताई रहात असलेल्या घरातही होतं पण काही काळच, त्यामुळेच त्यांचं अस्तित्व शेजार्‍यांच्या मनातून सहज पुसल्या गेलं होतं. कदाचित त्याच काळात किरणला त्यांनी आत्याकडे पाठवलं असावं. म्हणूनच तिची पत्र या पत्त्यावर येत असावीत.
ताम्हणकरांनी ही जागा सोडली, आणि दुसरीकडे गेले. तिथेच त्यांच्या दुसर्‍या अपत्याची जन्मवेळ आली. प्रसुतीकाळात गुंतागुंत झाल्यानं ऐन प्रसूतीवेळी सौ. ताम्हणकरांची प्राणज्योत मालवली आणि दुर्दैवाने वैद्यकीय सुविधा पुरेशा नसल्याने बाळालाही वाचवता आलं नव्हतं. अशीही एक चर्चा होती की जन्माला आलेलं दुसरं अपत्यही मुलगीच असल्यानं अर्जुनरावांनीच त्या अर्भकाचं काही बरवाईटं.......
याच संशयापोटी पत्नीच्या वियोगानं आधीच दुखी: असलेल्या अर्जुनरावांना त्यांच्या सासरच्या मंडळींनी झाल्या प्रकाराचा दोष देत त्यांची पोलिसांत तक्रार केली. मग त्याच त्या चौकश्या, अपमान, समाजाच्या जाळणर्‍या नजरा हे सारं सहन न झाल्यानं म्हणा किंवा झाल्या प्रकाराबद्दल अपराधाची काही टोचणी असल्यामुळे म्हणा ,अर्जुनरावांनी आत्महत्या केली.

.
विमलाताई पुन्हा एकदा शहारल्या, आजकाल लोकं स्वतःला इतकी प्रगत म्हणतात आणि तरीही हे असं अमानुष कसं वागू शकतात ? बरं, इतकं सगळं होऊनही झाल्या प्रकाराचा त्या अभागी जिवाला पत्ताही लागू न देणार्‍या या लोकांना माणूस म्हणावं की सैतान ?
.
काहीही झालं तरी आता त्या कधीही न पाहिलेल्या अभागी पोरीला इथे येण्यापासून थांबवायलाच हवं होतं.
न जाणो ती मुलगी अचानक इथे आलीच तर तिच्या मनावर काय वेदनादायक प्रसंग कोसळेल, आणि त्याचे परिणाम काय होतील ?
किरणवर उपचार करण्याची जरी त्यांची तयारी असली तरी तो करण्याइथपत तरी वेळ मिळायलाच हवा होता, त्यातुनच जी मुलगी स्वत:च स्वतःच स्त्रीत्व मान्य करायला तयार नव्हती ती आपल्यासारख्या परक्या माणसांवर कसा विश्वास ठेवेल ?
काहीही असो किरण यातून बाहेर पडलीच पाहीजे, त्यांच्यातली आई म्हणत होती ते ही एका न पाहिलेल्या अभागी जिवाबद्दल. याच विचारात काहीवेळ भरकटत राहिल्यावर विमलाताईंनी मनाशी ठाम निश्चय केला काही झालं तरी किरणला सध्यातरी इथे येऊ द्यायचं नाही, परिस्थिती आवाक्यात येईपर्यंत तरी किरणनं काही आततायी निर्णय घ्यायला नको. तरीही शेवटी किरणने त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचा प्रश्न उरतच होता तो कसा सुटणार होता ?

मनाशी काही ठाम निर्णय घेउन विमलाताईंनी टेबलावरचा रायटिंग पॅड पुढे ओढत लिहायला सुरुवात केली.
.

त्या नंतर कितीतरी वेळ त्या लिहितच होत्या हळूहळू त्यांच्या चेहर्‍यावर समाधान फुलत जाताना दिसतं होतं.

 

                                                   बळी
                                                       
 नवीन जागी तिची नजर भिरभिरत होती. मान वळवून ती चारी बाजूंचा अंदाज घेत होती. पाचेक मिनिटे मी शांत बसून राहिलो. घामाने अंग भिजून गेले होते. छातीची धडधड हळू हळू कमी झाली. आपल्या इटुकल्या पायांनी तेव्हढ्या वेळात तिने परस फिरून घेतला. माझ्या घरातून मी सुरा घेऊनच आलो होतो. एका हातात तिची मान घट्ट पकडून मी तिला दगडावर झोपवले.......
===
==
=
==
===
तशी मला ती पहिल्याच नजरेत आवडली होती. शेजारीच राहायची आमच्या. शेजार्‍यांच्या दारात त्यांनी पाळलेल्या कोंबडीच्या लहान लहान पिलांबरोबर खेळायची, त्या पिलांना दाणे भरवायची. तेव्हाच माझ्या मनात हे असले विचार येऊ लागले होते. शेजार्‍यांचा तिच्यावर कमालीचा जीव होता आणि जीव ओवाळून टाकण्यासारखीच होती ती.....जेव्हा जेव्हा मी तिला खेळवायला जवळ घ्यायचो, तेव्हा तेव्हा तिच्या वासाने, स्पर्शाने माझ्या मनात एक भूक उसळायची. अखेर याच भुकेने सद्सविवेकबुद्धीचा संपूर्ण ताबा घेतला.....

मी तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहायला सुरुवात केल्याबरोबरच आमच्या घरमालकाने माझ्याकडे एका वेगळ्याच संशयाने पाहायला सुरुवात केली होती. चौदा भाडेकरू असलेल्या वाड्यात गुपित सांभाळणे हे अवघडच नाही तर अशक्य काम होते. सुरुवातीला घरमालकाने मला नजरेनेच धमकी द्यायचा प्रयत्न केला. पण एकदा डोक्यात तसली नशा चढली की माणसाला देवाचेही भय उरत नाही तिथे घरमालकाला कोण जुमानतो! माझा निशाणा पक्का होता आणि त्या दिशेने प्रयत्नही मी चालू केले होते. काहीही करून तिला उचलायचे मनात होते. तो एव्हढासा जीव मला प्रतिकार करणार नाही हे माहितच होते मला........ आणि नेमके तेव्हाच घरमालकाने घोटाळा केला.
घरमालकाने आपली शंका शेजार्‍याच्या कानावर घातली आणि तिथून माझा सगळाच डाव फसायची शंका मला आली. तिला कोणत्याही परिस्थितीत मी हातातून जाऊ देणार नव्हतो. शेजार्‍यांनी तिची जास्तच काळजी घ्यायला सुरुवात केली. आता ती मला बाहेर फारशी दिसेनासी झाली. सहकुटुंब बाहेर जातानाही शेजारी तिला कुलुपाआड बंद ठेवू लागले. माझीही अस्वस्थता वाढायला लागली. खेळण्यापासून लांब ठेवलेल्या मुलाला जसे तेच खेळणे हवे असते, तशीच मला तीच हवी होती, पण मला तिच्याशी फक्त खेळायचे नव्हते. माझी इच्छा त्याहून फार भयंकर होती. काहीही करून आता तिला मिळवायचे या निश्चयाने आता मला झपाटून टाकले होते.
आणि अखेर तो दिवस आलाच. जवळच असलेल्या किराणामालाच्या दुकानात शेजार्‍याची बायको काहीतरी आणायला गेली अन तेव्हढ्यासाठी कडीकोयंडा कशाला म्हणून तिने दरवाजा उघडाच ठेवला. मला हीच संधी होती आणि मी ती हातातून जाऊ देणार नव्हतो. डोळ्यासमोर मला आता फक्त तीच दिसत होती. जेमतेम पंधरा मिनिटांचा वेळ होता माझ्याजवळ...........दरवाजा उघडून मी आत शिरलो. घरात चहूदिशांना माझी नजर भिरभिरू लागली. पण ती मला दिसेना. इनमिन चार खोल्यांचे घर ते! त्यात सुद्धा ती घरातच असणार याची मला खात्री होतीच. घराचे मागचे दार सताड उघडे होते. घरात एका खोलीत खाटेवर झोपलेल्या म्हातारीखेरीज कोणीही नव्हते. हळूच मी चारही खोल्या धुंडाळल्या. पण ती मला दिसेना. आता जास्तीत जास्त १० मिनिटे माझ्याकडे उरली होती.
मला प्रचंड राग येऊ लागला......स्वतःचाच...... जवळजवळ दोन आठवडे वाट पाहिल्यावर ही संधी मला मिळाली होती. मी पुन्हा डोके शक्य तेव्हढे शांत ठेवून घर शोधायला लागलो. म्हातारी अजूनही घोरत होती. अचानक मला म्हातारीच्या खाटेच्या बाजूने खडबड ऐकू आली. सर्रकन माझी मान त्या दिशेने वळली. म्हातारीची खाट अन भिंत यामधे एक माणूस झोपू शकेल एव्हढी जागा होती अन खाटेने दोन भिंतींशी त्रिकोण केला होता. काय खडबड झाली हे पाहायला म्हातारीला ओलांडून जाणे भाग होते अन त्यात म्हातारी जागी झाली तर माझी धडगत नव्हती. वेळ जात होता अन कुठल्याही क्षणी शेजार्‍याची बायको येऊ शकली असती. अखेर मी म्हातारीला ओलांडून जायचे ठरवले. काहीही झाले तरी मी ही संधी सोडणार नव्हतो. म्हातारीच्या खाटेला ओलांडून पलीकडच्या बाजूला मी पाय टाकला. अन त्या त्रिकोणात मला ती दिसली. बारीक डोळे माझ्याकडे रोखून ती बघत होती. कदाचित आपल्या भविष्याची तिला कल्पना आलीच असावी. माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. आता तिला मी उचलणार इतक्यात.........
जिन्यात पावले वाजल्याचा आवाज आला अन खाटेवरच्या म्हातारीला खोकल्याची उबळ आली.
भिंतीच्या विरुद्ध दिशेला म्हातारी तोंड करून झोपली होती. उबळ आल्यासरशी तिच्या डोक्याजवळच्या एका बाटलीतून तिने कसलेसे औषध पिले अन आता म्हातारी कूस बदलून माझ्या दिशेने पाहणार हे माझ्या लक्षात आले. आता मला हवी असलेली गोष्ट माझ्या हातात होती. त्या लहानशा जीवाला आपल्याभोवती चालू असलेल्या गोंधळाची कल्पनाही नव्हती. म्हातारीने कूस बदलायला सुरूवात केली अन पुढल्या दरवाजाची कडी वाजली.
माझी गडबड उडाली. आता काय करावे हेच मला सुचेना. खाटेच्या पायाशी दोन तीन उशा पडलेल्या मला दिसल्या अन काय करावे हे न कळाल्याने मी त्यातल्या दोन उशा म्हातारीच्या तोंडावर फेकल्या. महिने-दोन महिने हात सुद्धा न लावलेल्या त्या उशा उचलताच त्यातून धुळीची एक लाट आली अन म्हातारीच्या तोंडावर त्या आदळल्यावर तर धुळीचे लोटच उठले. म्हातारीचे खोकणे नव्या जोमाने सुरू झाले. मागचा दरवाजा उघडाच होता अन पुढचा आता उघडू लागला होता. हातात तिला घट्ट पकडून मी मागच्या दरवाजाने धूम ठोकली.
परसात जाऊन मी तिला खाली ठेवली. शांतपणे अन समाधानाने तिच्याकडे पाहू लागलो. नवीन जागी तिची नजर भिरभिरत होती. मान वळवून ती चारी बाजूंचा अंदाज घेत होती. पाचेक मिनिटे मी शांत बसून राहिलो. घामाने अंग भिजून गेले होते. छातीची धडधड हळू हळू कमी झाली. आपल्या इटुकल्या पायांनी तेव्हढ्या वेळात तिने परस फिरून घेतला. माझ्या घरातून मी सुरा घेऊनच आलो होतो. एका हातात तिची मान घट्ट पकडून मी तिला दगडावर झोपवले.........................
माझा कार्यभाग तर उरकला आता पुरावे नष्ट करण्याची गरज होती, मला घरामागची मोकळी जागा आठवली. कुणाच्याही नकळत एक लहानसा खड्डा खणून मी त्यात तीचे अवशेष......हो आता अवशेषच राहीले होते.......त्यात पुरून टाकले..............
==========================
तर बाळू खुरोंडे म्हणजे एक नंबरचा बिनडोक माणूस. येडचापाला अक्कल म्हणता काही नाही. आता आमचा भाडेकरू म्हणून तीन-साडेतीन वर्षे राहतोय पण कध्धी म्हणून शहाणासुरता वाटला नाही. बायकोमुळे संसार नीट चालू आहे म्हणायचा.
गेले तीनेक महिने मात्र त्याची लक्षणे काही नीट दिसत नव्हती. त्या गायतोंड्यांची दोन वर्षांची मुलगी वाड्यात कुठे खेळत असताना ह्याची नजर असायची. गायतोंडे प्राथमिक शाळेत शिक्षक. माणूस एकदम साधाभोळा. अशा माणसाला असल्या गोष्टी सांगणे आमचेच कर्तव्य. मी सांगितले त्यांना की या खुरोंड्याची चिन्हे काही नीट नाहीत. लक्ष ठेवा जरा! पण गायतोंडे कसला ऐकतो! नाही म्हणायला घरात पोरीला बंद ठेवायला लागला म्हणा!
पण त्या दिवशी बाहेरून आलो तर गायतोंड्यांकडे गोंधळ उडालेला...... घरी जायच्या आधी सरळ तिथे गेलो. पोरगी बेपत्ता झाली होती. दोन तास झाले घरात पोरीचा पत्ता नव्हता. दोन वर्षाची पोरगी जाऊन जाऊन अशी किती वेळ घरातून नाहीशी होणार!!!! घरात म्हातारीचा खोकायचा आवाजच घुमत होता. गायतोंडे रडायचाच बाकी होता. "पोलिसाकडे जाऊ" म्हणायला लागला. त्याला म्हटलो थांब जरा. आधी खुरोंड्याकडे जाऊ, मग पोलिसाकडे! गायतोंडेच्याच घरातला एक सागवानी दांडका घेऊन सरळ खुरोंड्याकडे गेलो.
खुरोंड्याकडे मांस-मच्छीचा वास पसरला होता. गायतोंडेला काही समजले नसले तरी मला वेगळीच शंका आली. खुरोंड्याने दार उघडले अन तसेच त्याचा कानाखाली एक आवाज काढला. खुरोंड्या तीन फूट लांब उडून मगच उभा राहिला.
"बाळ्या, कुठे आहे ह्याची पोरगी?" मी ओरडलो.
खुरोंड्या थरथरत होता. त्याला घाम फुटला होता. कसाबसा चाचरत तो म्हणाला.
"पोरगी? कस्.....कोणाची पोरगी?"
"गायतोंडेंची पोरगी!!!!!!! तूच पळवले का नाही बोल हरामखोरा!!!!" मी दुसर्‍या गालावर तडाखा हाणणार इतक्यात बाळ्याची बायको मधे आली.
"वहिनी, तुम्ही मध्ये येऊ नका. ह्या साल्याला त्या पोरीवर नजर ठेवताना मी पाहिले आहे. पोरगी बेपत्ता झालीये आज. पोलिस येतीलच पण आधी तुला आम्हीच तुडवून काढतो." मी आता दांडका उगारला.
बाळ्याच्या घशातून कसाबसा आवाज फुटला.
"अहो कसली पोरगी? मला खरंच काही माहीत नाही. अहो मी पोरगी पळवली नाही. मी तर तिच्याकडे पाहिले पण नाही."
"मग कोणाकडे पाहत असायचास रे? आणि वास कसला सुटलाय घरात?" मी पुन्हा दरडावले.

"अहो............कोंबडी................"
"काय कोंबडी? कसली कोंबडी साल्या?"
" अहो गायतोंडेची कोंबडी........."
"......."

"मालक, चूक झाली हो माफ करा. मी कोंबडी पळवली हो गायतोंडेची!!!! अहो मी असे नको करायला पाहिजे होते. माझी चूक झाली हो......" खुरोंड्या धाय मोकलून रडत होता. मी, गायतोंड्या अन खुरोंड्याची बायको एकमेकांकडे बघायला लागलो.
इतक्यात गायतोंडेची बायको पळत आली.
"मालक, सापडली हो पोरगी! तुमच्याच घरी खेळत बसली होती. तुमची बायको आत्ता पोचवून गेली घरी."
गायतोंड्या गेल्यावर थोडंस वशाट मी घरी घेऊन आलो. बदल्यात नंतर गायतोंड्याची समजूत काढली. ते काही अवघड नव्हतं........

आजकाल वाड्यात कामं सोडून इतरत्र लक्ष द्यायचं कमी केलं आहे जरा......... मूर्खांचा बाजार उठलाय जणू आमच्या वाड्यात.
                             तुरूंग
२० जुलै, बुधवार.
८.००
रक्तदाब घेण्यासाठी मला त्यांनी उठवले तेव्हा मला कळाले की मी स्वप्नात नव्हतो. हळुहळू माझ्या डोक्यात वास्तव शिरायला लागले. त्यांनी मला लगेच कपडे करायला सांगितले. बाहेर दवाखान्याची पांढरी शुभ्र गाडी उभी होती. त्याच्यावरची अक्षरे मला ओळखीची वाटली. चायला यांना दूसरी नावे नाहीत का ? एखाद्या मनोरुग्णाचे नाव ठेवायला काय हरकत आहे ? मी मनाशी म्हटले. अशा गाडीत स्वत: चालत जाऊन बसायचे ही काही एवढी सोपी गोष्ट नाही.

आसपासच्या खिडकीतून नजरा माझ्याकडेच रोखलेल्या मला कळत होत्या. एक केस वाढलेला तरूण खाली मान घालून या गाडीत बसलेला त्यांना दिसत असणार. हो ! खाली मान घातलेला. पराभूत.
९.३०
सगळे सरकारी कागद त्या घाणेरडया वास येणार्‍या शाईने भरल्यावर सगळे सोपस्कार झाले असे मला सांगण्यात आले. आज परत त्याच तिसर्‍या मजल्यावर मी बसलोय. हे सोपस्कार वगळता सगळ्या गोष्टी कशा पटापट घडल्या. कोणाचा विश्वास बसणार नाही इतक्या पटापट. हा नऊ आकडा फारच धोकादायक. नऊ महिन्यानंतर मी या जगात आलो ना. सालं ग्रहणच असावे तेव्हा. कालच मी माझ्या मैत्रिणीबरोबर आनंदाने फिरत होतो. थोडा काळजीत होतो, पण हे असे होईल असे काही मला वाटले नव्हते. मी जर घरी गेलोच नसतो तर बाबांशी भांडणाचा तो तमाशा झालाच नसता.
मधून मधून मी माझ्या मैत्रिणीचा विचार करतो. तिची खूपच आठवण येते.
इथे सगळे कसे उदास आहे. भिंतीवर एक कार्टून लावलेले आहे, फक्त त्याच्याच चेहर्‍यावर हास्य आहे. बाकी सगळे डोळे कुठेतरी शून्यात काहीतरी शोधत असतात. बहूदा ते स्वत:लाच शोधत असतील. माझ्या रूम पार्टनरला मृत्यूचा विचार छळतो आहे. त्याला चिडवण्यासाठी मी मगाशी मुद्दामच माझ्या छोट्याशा बासरीवर रडकी गाणी वाजवली. आमच्या गावात नदीकाठी झाडाखाली बसून मी वाजावायचो, तीच बासरी. बासरी आहे ते बरे आहे. या उदास आणि दु:खी वातावरणात तेवढेच जरा बरे वाटते. आयुष्याकडे काहीच न मागणार्‍यांचे दु:ख फार भयानक असते. काहीच मागणे नाही. नशीब त्यांना अजून स्वर आणि गाणे कळते.

दुपारी ३.००
येथे तीन वर्षे काढलेल्या एका तरूणाबरोबर बोलत होतो. मी त्याला सांगितले की मी इथे विटलो आहे आणि मला बाहेर जायचे आहे.
गंभीरपणे तो म्हणाला “का ? चांगलं आहे की इथे. कशाचीही काळजी नाही. कशाला स्वत:शी झगडायच ? तसे कोणाला काय पडलंय म्हणा इथे ?” ते ऐकून मी हादरलो. हादरलो कारण उद्या मी पण असा विचार करायला लागलो तर ? हा विचार करताना मला खरच यातना होताएत. कधी या जाळीतून जगाकडे बघायचे थांबणार आहे कोणास ठावूक ! एखाद्या माणसाला फाशीची शिक्षा झाल्यावर त्याला माहीत असते की तो एक दिवस दयेच्या अर्जावर बाहेर येणार आहे, पण तो दिवस केव्हा येणार ? आज ? का उद्या का एका महिन्यानंतर का पुढच्या वर्षी? का कधीच नाही ?
कधीच का नाही ?

संध्याकाळी ५
कधीच नाही का ?

संध्याकाळी ७.२०
हा मजला सोडून मला जाता येत नाही, मला कोणाला फोन करता येत नाही ना कोणाला पत्र लिहता येते. थोड्याच वेळापूर्वी मी माझ्या मैत्रिणीला गुपचूप फोन करायचा प्रयत्न केला पण बहूदा तिला तो घेता आला नाही. पण घेतला असता तरी मी काय बोललो असतो तिच्याशी ? मी तक्रार केली असती का, स्वत:लाच दुषणे दिली असती ? मी बोलूच शकलो असतो का ? मला अजूनही बोलता येते ?

ज्या शांतपणे लोक येथे स्वत:ला कोंडून घेतात याचे मला फार आश्चर्य वाटते. त्यात काय आश्चर्य वाटायचे? मीही एक दिवस याचा स्विकार करेन का ? एवढ्याच शांतपणे ? माणूस विसाव्या वर्षी क्रांतीकारक असतो आणि चाळीसाव्या वर्षी तो विझतो, असे म्हणतात तर माझे वय काय ? बहूदा ३९ वर्षे आणि ११ महिने असावे. मी पूर्ण पराभवाच्या उंबरठ्यावर उभा आहे याची जाणीव, मला मी, मला आई भेटायला आली, तेव्हा तिच्या डोळ्यात बघितले तेव्हा झाली. तिच्या नजरेत तिला माझ्याविषयी वाटणारी घृणा मला स्पष्ट दिसली. आज पहिलाच दिवस आहे आणि मला अर्धी लढाई हरल्यासारखे वाटते आहे. हे बरोबर नाही. काहीतरी केले पाहिजे.
२१ जुलै गुरवार.
८.००
साला काय दिले होते मला कोणास ठाऊक. जी झोप लागली ते आत्ता उठलो. त्यात त्याने रात्रीच मला झोपेतून उठवून मला प्रश्न विचारला की हस्तमैथून करणे पाप आहे का नाही. मी नाही म्हणालो आणि कूस बदलली. त्याने मला हा प्रश्न का विचारला असेल ? का मलाच तसे स्वप्न पडले ? काहीही असले तरी विचित्रच साला ! हा माझा सोबती, दिवसभर गप्पच बसलेला असतो. जेव्हा बोलतो तेव्हा एकच प्रश्न विचारतो. “ बाहेर कसं काय आहे ?” जणू काही तो आजच बाहेर जाणार आहे. बिच्चारा. त्याला त्याच्या जातीचा भयंकर अभिमान आहे पण तो आता आत आहे आणि त्याला हे पटलेले आहे की त्याला कसलातरी आजार झालेला आहे.
मी मात्र हे कधीच मान्य करणार नाही
कधीच नाही !

११.३०
आत्ताच पाकीट बघितले तर ते त्यांनी रिकामे केलेले आहे. आता काही विकत घ्यायचा प्रश्नच मिटला. आज माझी मैत्रीण भेटायला येणार आहे. तिने तसे वचनच दिले आहे मला. मला माहिती आहे मला कोणाशीही बोलायला परवानगी नाही, पण मला तिच्याशी फार महत्वाचे बोलायचे आहे म्हणून मी चोरून तिच्याशी फोनवर बोललो. मीही तिला मी किती उदास आहे याचा पत्ता लागून दिला नाही. उगचच हलके फुलके विनोद मारत होतो मी.

सगळ्यांना मला काहीतरी दाखवायचे असते. एकजण मला जादू दाखवतो आणि शिकवतो. आजच त्याने मला दुसर्‍याचे वय कसे ओळखायचे हे शिकवले. माझे ३९ आहे का ? असा प्रश्न माझ्या मनात येऊन मी परत उदास झालो. रूम पार्टनरला कायम मोठ्मोठ्या लोकांची ओळख वाढवायचे वेड आहे. खरे खोटे त्याला माहीत पण त्याची ज्या लोकांशी ओळख आहे असे तो सांगतो, त्या ओळखीने, तोच काय आम्ही सगळे इथून बाहेर पडू शकतो. एक एक नमुने भरलेत इथे. एकजण सारखे त्याचे अन्न हुंगत असतो तर दुसरा जाडे होण्याच्या भीतीने कित्येक दिवस जेवतच नाही. एकाला तर सेक्स सोडून दुसरा विषयच माहीत नाही तर दुसर्‍याला सेक्सचे दुषपरिणाम या विषयात गोडी आहे.
रूम पार्टनर त्याच्या कॉटवर आढ्याला डोळे लावून पडला. रेडिओवर एक युगूल गीत लागलेले दिसते. पण याच्या मनात काय चालले आहे ? त्या आढ्यात काय शोधतोय तो ? का त्या मोठ्या शुन्यात तो भरकटत चाललाय ? का त्याने त्या शून्यापूढे शरणागती पत्करलीए ? त्याच्याकडे नकोच बघायला, नाहीतर मलाच वेड लागेल.
मी बाकीच्या रोग्यांशी बोलायचा प्रयत्न केला. काही येथे तीन महिने आहेत तर काही कित्येक वर्ष ! येथे रहाणे माझ्या सहनशक्तीच्या पलिकडचे आहे.
उजेड कमी होत चालला आहे. रस्त्यावर बाजूच्या उंचा इमारतींच्या सावल्या बघून आता अंधार पडणार आहे हे समजते. अरे देवा ! मला या अंधारापासून वाचव !

१०.००
हंऽऽऽऽ काल रात्री मी माझ्या मैत्रिणीला फोन केला. तिने माझ्यावर तिचे अजून प्रेम आहे हे सांगितल्यामुळे मी एकदम खूष आहे. त्या आनंदाच्या भरात बहूतेक मी काय काय बडबडलो देवाला माहीत. भावना न आवरता येणार्‍या माणसाला काय म्हणतात बरे...... मूर्ख...मूर्ख... तिने आता सोमवारी यायचा वादा केलाय. माझा स्वभाव कटकट्या तर झालेला नाही ना? मी एक क्षूद्र माणूस आहे असे मला का वाटते आहे आज ?....

रविवार २४ जूलै
रविवार सकाळ.
मी रेडिओ ऐकतोय. मला आज एकटे एकटे वाटतय. ही एकटेपणाची भावना माझा जीव घेते आहे. रविवार सकाळ, एक उदास, कंटाळवाणा रविवार. इथे मी या जाळीच्या दरवाजाच्या मागे माझ्या एकांतात बुडालेला बसलोय. हंऽऽऽ एकांतात बुडालेला... हे आवडले मला..
रविवार सकाळ, कोणी गात नाही. रेडिओ वर एक प्रेम आणि वेदना यावरचे गाणे लागले आहे. नेहमीसारखाच एक भवितव्य नसलेला दिवस. असाच लोंबकाळणारा दिवस.
ती तर खूप दूर आहे. माझे मित्रही दूर आहेत. रात्रीच्या पार्टीनंतर जागरणामुळे अजून झोपलेले असणार. मी आपला इथे एकटा.. रेडिओवर एक जूने गाणे लागले आणि मला माझ्या वडिलांची आठवण झाली. मला त्यांची कीव आली. माझ्यासारखा मुलगा असणे म्हणजे कीव येण्यासारखेच नशीब म्हणायचे !
काय झाले आहे मला आज ? आज तिच्याबद्दल वाटणारे प्रेम पूर्वीसारखे राहिले नाही असे का बरं वाटते आहे मला ? तिलाही असच वाटत असणार. मी तिला काहीच देऊ शकत नाही... एखाद्या चिमणीला पंख नसतील तर कसे वाटेल तसे वाटते आहे... हतबल..एकटा.
या जगात एकटा....
सगळं कसं अचानक एकसूरी वाटायला लागले आहे. नकळत मी आमच्या फोटोवरची आणि सिगरेटच्या पाकिटावरची पकड घट्ट केली. हे नको निसटून जायला...

सोमवार २५ जूलै.
तुला भेटायची वेळ जशी जवळ येते तसे माझ्या छातीतील धडधड अजूनच वाढते. शनिवारी फोनवर मला तू अजून तुझा मित्र मानतेस असे म्हणालीस तेव्हापासून मी किती आनंदात आहे..तू माझी अजूनही माझी मैत्रीण आहेस हा विचारच मला धीर देतो. या तुरूंगातूनही हे जग जरा आपले वाटायला लागते. तू आल्यावर ते अजूनच सुंदर भासेल यात शंका नाही. आज सकाळी तू आलीस की मी माझे ह्र्दय तुझ्याजवळ मोकळे करणार आहे. तू माझ्याजवळ नाहीस म्हणून मला वाइट वाटते खरे पण मी आता मोठा झालो आहे आणि हे सगळे मलाच सहन करायला पाहिजे नाही का ?

रविवार ३१ जुलै.
दूपारी १ वाजता
आत्ताच बातमी कळली की कवितांच्या एका स्पर्धेमधे एकूण २५०० कवितांमधे माझ्या कवितेची निवड झाली आहे. ते आता माझ्या कवितांचे पूस्तकही छापणार आहेत म्हणे. पण मला कुठे भेटतील ते ? मी बाहेर असायला पाहिजे होतो आत्ता. मला खूप आनंद झालाय हे कशाला नाकारू मी ?

आज माझ्या पहिल्या प्रेमाची का आठवण येतेय मला ? तिच्यावरच कविता केल्या होत्या त्या.... आता कुठे आहे कोणास ठावूक. कशी असेल ती ? जाड झाली असेल, का आहे तशीच सडसडीत असेल ? लग्न केले असेल का तिने ? कदाचित एखाद्या मोठ्या श्रीमंत घरात पडली असेल ती. त्या दिवशी मी तिला फोन लावला होता...पण तिचा आवाज ऐकल्यावर ठेऊन दिला.
शनीवार ६ ऑगस्ट.
डॉक्टरांनी आज मला विजेच्या झटक्याचे उपचार द्यायचे सुतोवाच केले. ते मला व्यसनीही म्हणाले. मला एखाद्या कोंडलेल्या हिंस्र श्वापदासारखे वाटते आहे आज. कोणाच्यातरी नरडीचा घोट घ्यावासा वाटतोय. पण काय करणार मी हतबल आहे. काहीच करू शकत नाही. म्हणूनच मला तुझ्याशी बोलावेसे वाटतय. थोड्याच वेळात माझे व्यक्तीमत्व, जो मी आहे तो, नष्ट करायची क्रिया चालू होईल त्याच्या अगोदर एकदा तरी माझ्याशी बोल. पाया पडतो तुझ्या. हा अत्याचार सहन करताना तू माझ्या जवळ असलीस तर फार बरे होईल.

जगातील अतीसामान्य गोष्टींबद्दल सामान्य गप्पा मारूयात आपण. फार भव्य दिव्य असे काही नाही ग....साध्यासुध्या गप्पा. बघ मी तुला खात्री देतो तुला येथे परत यावेसे वाटेल. काही घडलेलेच नाही असे तू भासवशील आणि मी तुला सगळे ठीक चालले आहे असे... निरोप घेताना माझे डोळे हळव्या अश्रूंनी भरून आलेले तुला दिसतील. पण मी ते लपवेन. तू अगदीच विचारलेस तर डोळ्यात काहीतरी गेल्यामुळे पाणी आले असेही खोटे खोटे सांगेन. जाताना तू सारखे मागे वळून बघशील आणि या जाळीतून बाहेर आलेल्या माझ्या हाताकडे बघून हात हलवशील. तू गेल्यावर मात्र मी ढसढसा रडेन आणि काय झाले, काय व्हायला पाहिजे होते, काय व्हायलाच नको होते आणि काय होणारच नाही याचा विचार करत बसेन. थोड्याच वेळात डॉक्टर त्यांची ती काळी बॅग घेऊन येतील व माझ्या शरीरात ती वीज खेळायला लागेल.
रविवार ७ ऑगस्ट
डॉक्टरांबरोबरचे माझे संभाषण.
“ तुला स्वाभिमानच नाही. तू पहिल्यांदा येथे आलास तेव्हा तू येथे परत येणार नाहीस असे मला वाटले होते. तू स्वतंत्रपणे काहीतरी करशील असे मला वाटले होते. पण नाही, तू आपला परत इथेच ! या मधल्या काळात काय मिळवलेस तू ? काहीऽऽऽऽ नाही. ते घेऊन काय मिळवलेस तू ? असे तुझ्यात काय कमी आहे की तू काहीच करू शकत नाहीस ?”

“कोणीच एकटे काही मिळवू शकत नाही”. मी.
“नसेलही. पण तू त्या तेथे कशाला गेला होतास मरायला ? काय मिळवलेस तू ?”
“अनुभवासाठी”
“तुम्ही लोक असे आहात ना, सगळे आयुष्य असल्या घाणेरड्या अनुभवासाठी पणाला लावाल”
“डॉक्टर प्रेमापोटी एखादी गोष्ट केली तर ती करण्यायोग्य असते असे माझे तत्वज्ञान आहे. आवडले आपल्याला तर ते करण्यासाठी तेवढे कारण पुरेसे आहे असे आपले मला वाटते”
“मी खालच्या मजल्यावरून सिझोफ्रेनियाचे दोन चार रुग्ण आत्ता जर इथे आणले तर ते सुद्धा या पेक्षा तर्कशूद्ध उत्तर देतील याची मला खात्री आहे.”
“माझे काय चुकले, ते सांगा ना !”
“काय चुकले ? तू सगळा वेळ स्वत:ची एक खोटी प्रतीमा तयार करण्यात घालवतोस. आपण काय आहोत याचा सुद्धा तू विचार करत नाहीस. तू आता काय आहेस ? एक पोकळी ! ज्यात काहीच नाही......
“कल्पना आहे मला. मी कितीही सांगितले तरी मला माहीत आहे माझी किंमत शून्य आहे”
“मग काहीतरी कर ना ! पण तू नाही करू शकणार. कारण मला माहिती आहे तू आहेस त्याच्यात खूष आहेस. हे बघ तू जर असाच वागलास तर मला तुला विजेचे धक्के देण्यावाचून दुसरा उपाय नाही. तू ठरव काय ते. ही सुधारायची शेवटची संधी समज. जरा विचार कर आणि माणसासारखा वाग”
रविवार १४ ऑगस्ट – फादर्स डे.
गुड मॉर्निंग डॅड ! आज तुमचा दिवस.
गेली अनेक वर्षे या दिवशी तुम्ही हसतमुखाने मला सकाळीच समोर यायचात.
आणि मी आणलेली भेट स्विकारायचात.
आणि हसत मला मिठीत घ्यायचा, आशिर्वाद द्यायचा.

गुड मॉर्निंग डॅड, आजही तुमचा दिवस पण मी आज तुम्हाला काही देऊ शकत नाही.
काही म्हणूही शकत नाही.
तुम्ही तरी आता ते कुठे राहिलात ?
तुमच्या ह्र्दयापर्यंत आता माझे शब्द पोहोचत नाहीत कारण तुमचे मन आता कडवटपणाने भरले आहे.
थकलात तुम्ही आता.
तुमच्या ह्रदयाला वेदना होताएत. पण नशीब तुम्ही अजून रडू शकता ते. आत्ताही तुम्ही रडत असाल.
एका बापाचे करूण अश्रू.
तुम्ही रडत आहात कारण मी आज एका खोलीत बंद आहे.
तुम्ही रडत आहात कारण आज फादर्स डे आणि मी येथे एकटा पडलो आहे.
तुमच्या मनात आज कडवट आठवणी आणि दु:ख या शिवाय काय असणार ?

गुड मॉर्निंग डॅड ! तो पहा सुंदर सूर्य उगवतोय.
आज सगळीकडे आनंदी आनंद असेल पण तुम्ही दु:खी असाल. ते दु:ख मीच आहे याची मला कल्पना आहे.
माझ्यामुळेच तुमचे ह्रदय रक्तबंबाळ झाले आहे.
याच क्षणी माझी बहीण तुमच्या खोलीत एखादी भेट घेऊन आली असणार. तुम्ही हसून तिला दाद द्याल पण मला माहिती आहे आतून तुम्हाला ती भेट स्विकारताना वेदना होत असणार पण तिला वाईट वाटू नये म्हणून तुम्ही वरवर हसणार.
मी तुम्हाला भेट म्हणून अजून त्रासच देऊ शकतो.
अश्रू आणि “कशाला याला जन्माला घातला” हा विचार भेट देऊ शकतो.
खरेच मी नसतो तर तुम्ही सुखी असता. शांत आयुष्य जगायची इच्छा असणार्‍या माणसाला अजून काय हवे असते ?
पै पै जमवून, त्याला हातही न लावता तुम्ही ते पैसे आमच्यासाठी एखादी वस्तू आणण्यासाठी जपून ठेवले असतील. ही वस्तु देताना कुठल्याही बापाच्या ह्र्दयात आनंद मावत नसतो.
आज फादर्स डे आहे आणि माझ्या वडिलांना मला इथे भरती करावे लागले. मी त्यांना पाहू शकत नाही भेट तर लांबच.
मला माहीत आहे जेव्हा इतर माणसांची मुले आज त्यांच्या भोवती तुम्हाला दिसतील तेव्हा तुमच्या पोटात मोठा खड्डा पडेल पण काय करणार मी येथे आहे आणि कित्येक दिवसात मी सूर्य बघितलेला नाही.
तुम्हाला आत्ता मी अंधारच देऊ शकतो. हो अंधार अशा माणसाचा ज्याला आता आयुष्याकडून काहीही नकोय.
म्हणून मी काहीच करत नाही. म्हणूनच मी तुम्हाला या दिवसाच्या शुभेच्छाही देत नाही.
एका रात्री तुम्ही मला या जगात आणले आणि आईने मला कळा सोसत जन्म दिला. मला जीवनाची भेट देणार्‍या बाबा, मी फक्त तेच तुला परत देऊ शकतो.
मी कसलीही हालचाल करू शकत नाही. त्या हालचालीने तुला माझ्या वेदना कळाल्या तर तुला जास्त दु:ख होईल. मला निस्तब्धच जगायला हवे.
माझ्या सारखा मुलगा असणे यासारखे दुसरे दु:ख नाही.

गुड मॉर्निंग डॅड.
माझे हात रिक्त आहेत. पण आज मी तुम्हाला उगवत्या सूर्याची भेट देतो. सोनेरी आणि सगळीकडे असणारा. त्याने तुमचे दु:ख थोडे हलके होईल.
कदाचित तुमचे बरोबर आहे हे तुम्हाला कळाल्यानंतर
मला आनंद होईल.

मंगळवार, २३ ऑगस्ट.
आज माझ्या वाढदिवसाची पहाट. आज मला माझ्या वहीत आशा आणि समजुतदारपणा दाखवला पाहिजे. म्हणूनच मी पहिली लिहिलेली पाने फाडून टाकली. माझ्यासारख्या माणसाला एक महिना सूर्य न बघता राहणे अवघड आहे. खरंच अवघड आहे. पण मला माहीत आहे की माझ्यापेक्षाही कमनशिबी माणसे येथे आहेत. माझ्या धमण्यातून तरूण रक्त वाहते आहे आणि मी अनेक वेळा परत सुरवात करू शकतो.

वाढदिवसची संध्याकाळ.
आज पहाटेच या ओळी खरडल्या त्याने मी माझा आत्मविश्वास परत मिळवू पहातोय.

“हे बघ तू परत पुढच्या वर्षी विद्यापिठाची परीक्षा देऊ शकतोस. अजून तुझ्यापुढे कितीतरी आयुष्य पडले आहे. याचा उपयोग फालतू विचार करण्यासाठी न करता लिहिण्यासाठी कर. तुझा सगळ्यात जवळचा मित्र तुझा टाइपरायटर तर तुला सोडून गेलेला नाही ना ? तुझे अनुभव शब्दबद्ध कर. कदाचित पुढेमागे ते कोणालातरी उपयोगी पडतील. फक्त स्वत:चा विचार करू नकोस. सुरवातीला तुझे मित्र तुझ्या उपयोगी पडले ते लक्षात ठेव. एखादा तुला सोडून गेला असेल तर त्याला क्षमा कर. विसरणे ही देवाने तुला दिलेली सगळ्यात मोठी ताकद आहे हे विसरू नकोस. मित्र आता तुला सोडून गेले असतील तरी त्यांचा राग मनात धरू नकोस. त्यांना जे शक्य होते ते त्यांनी केले. ते तुला कंटाळले आणि तुला सोडून गेले. कदाचित तू त्यांच्या जागी असतास तर तेच केले असतेस.”
गुरवार १ सप्टेंबर
जुलैपासून मी येथे आहे आणि मी आता घाबरलोय. सगळा दोष माझ्याच माथी आहे. कालच मी शरण जाऊन सगळी इंजेक्शने स्वत:हून घेतली आणि शांत झोपलो. बाकिचे मात्र हातपाय झाडत विरोध करत होते. एका नर्सला माझी मैत्रिण आवडत नाही त्यामुळे तिला आता मला भेटायला परवानगी देत नाहीत. मी माझे सगळे सामान एका दुसर्‍या रुग्णाला विकणार आहे याची कुणकूण त्यांना लागल्यावर त्यांनी ते सगळे काढून घेतले. पैसे मिळवायची संधी गेली....पण मी माझ्या एका मित्राला पटवले आहे आणि तो माझ्यासाठी एक पिस्तोल आणणार आहे....गरज पडल्यास मी त्याचा उपयोग करेन.....

केस कापण्यासाठी बोलवून माझी विचारशृंखला तोडली साल्यांनी.
गेले सगळे केस. मी आता एखाद्या बाळासारखा दिसतोय. लोकांवर अवलंबून.....
मी का घाबरलो आहे ते मला आता उमगले आहे... मला येथेच रहायची इच्छा झाली तर ?.... हाच, हाच विचार मला सारखा छळत असतो.
सगळं संपलय आता. बाहेर तरी कशाला जायचं ?
मी फेब्रूवारी नंतर केस कापलेच नव्हते. शेवटी या लोकांनी मला केस कापले नाहीत तर येथेच रहावे लागेल असे सांगितल्यावर मी तयार झालो.
याचा अर्थ काय ? मला अजून बाहेर जायचय? केस गेले म्हणजे माझी शेवटची वस्तू गेली असा विचार आता मनात यायला लागलाय... ही पाने मी बंडखोर विचारांनी भरणार होतो पण आता माझी इच्छाच मेली आहे लिहायची.
मी आता वेडाही आहे आणि शहाणाही आहे. काय करू ?
मी आता या पोकळीतून निवृत्त व्हावे हे बरे.

या इथे मी संपलो.
मला आता एकही निरोप पाठवायचा नाही
काहीच मिळवायचे नाही आणि जिंकायचेही नाही.
माझ्या इच्छेची आतडी माणसांच्या घृणा भरलेल्या नजरांनी टरा टरा फाडलेली मला आता दिसतात.
मस्त मोकळे वाटतय आता हा संपूर्ण पराभव स्विकारल्यावर.

हंऽऽऽऽऽ चला आता पहिल्यापासून सुरवात करू या हं.......