' देशपांडे कुठे राहतात ते आम्हाला माहीत नाही. उगाच घंटी वाजवून विचारू नका. '
दारुडा डॉक्टर
डॉक्टर - तुमच्या आजाराचं नक्की कारणच समजत नाहीय. कदाचित दारु पिण्याने असं होत असेल. पेशंट - हरकत नाही , मला काही घाई नाही. तुमची उतरली की येतो.
बहिनिची मागणी
मुलगी - असा काय बघतोयस माझ्याकडे , तुला बहिण वगैरे नाही का ? मुलगा - आहे ना , म्हणून तर बघतोय मुलगी - का ? मुलगा - कारण ती म्हणते , गोरी गोरी पान फुलासारखी छान , दादा मला एक वहिनी आण.
गंपू ची डिग्री
मुलाखतकारः तुझं शिक्षण किती ? गंपूः पीएचडी. पास्ड हायर सेकंडरी विथ डिफिकल्टी
फेसबुकवर हंबरणा-या म्हशी
पोरगा - hi.. पोरगी - hmm.. पोरगा - मग कशी आहेस ? पोरगी - hmmm.. पोरगा - ऑनलाइन आहेस ? पोरगी - hmmmm... पोरगा ( वैतागून )- अगं बोल की , नुसतं हम्म्म काय करतेस म्हशे !
वीक पॉइंट
एचआर मॅनेजर - तुमचा सगळ्यात स्ट्राँग पॉइंट काय आहे ?
गंपू - माझी बायको .
एचआर मॅनेजर - आणि तुमचा सगळ्यात वीक पॉइंट कुठला आहे ?
गंपू - दुस-याची बायको
कलियुगातिल नाते
झंप्या - आई , आपल्याकडे आजोबा , आजी आणि आत्या आले आहेत ना ? झंप्याची आई - हो...... झंप्या - पण , तू तर काल म्हणत होतीस की एक म्हसोबा , सटवी आणि टवळी असे तिघेजण चरायला येणार आहेत म्हणून. मग त्यांचं काय झालं ?