chitika
Monday, 8 October 2012
वरदान
ब्रम्हदेव अतिशय प्रसन्न होते , कुणाला तरी वर दिल्या शिवाय त्यांना चैन
पडेनासे झाले. पण गेल्या कित्येक शतकात हिमालयावर तपश्चर्या करण्याची फॅशन
लयाला गेली होती. जेव्हा प्रसन्नता अगदीच अनावर झाली तेव्हा ब्रम्हदेव
अप्सरे कडे निरोप ठेऊन त्वरीत पृथ्वीतलावर अवतरले . तिथे सतराशे साठ विघ्ने
पार पाडून राम गणेश गडक-यांच्या ठकीचे लग्न अखेरीस जुळले होते. वरातीतील
बॅन्ड बाजाचे सूर ऐकून ब्रम्हदेव अजूनच प्रसन्न झाले. कुणालाही वर द्यायचाच
आहे ना तर इथेच वरदानाचे कार्य पार पाडून मोकळे व्हावे ह्या विचाराने
त्यांनी वरातीसह कार्यालयात प्रवेश केला.
ठकीचे रूप बघून ते हादरलेच ह्या अभागी मुलीलाच रूप सौन्दर्यचा आशीर्वाद
देऊन तिचे भले करावे ह्या विचाराने ते तिचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न
करू लागले, पण ठकी आपल्याच सुख स्वप्नात रममाण होती. जेव्हा जेरीस येऊन
ब्रह्मदेवांनी शुक शुक केले तेव्हा ठकीने त्यांच्या कडे फणका-याने बघितले, '
जेव्हा माझा बाप माझे लग्न ठरवण्यासाठी चपला झिजवत होता तेव्हा कुठे गेले
होतात? आता जा मरा! असा विचार करून तिने नाक मुरडले. '
एका वराचे दान नुकतेच तिच्या पदरात पडले होते आता तिला कुठल्याही वराची गरज नव्हती.
मग त्यांचे लक्ष ठकीच्या नव-या कडे गेले, ह्या महाभागाने अशा कुरूप पोरीली
स्वीकारले तेव्हा ह्यालाच वर देऊन ह्याचे जन्माचे भले करावे असा त्यांनी
विचार केला पण ठकीचा नवरा मिळालेल्या हुंड्याचा हिशोब करण्यात गुंग होता,
मिळालेला पैसा कसा वाढेल अन मग ठकीच्या जागी दुसरीची सोय लवकरात लवकर कशी
करता येईल ह्याच विचारात होता.
ठकीचा नवरा वरदक्षिणे वरच संतुष्ट होता त्यालाही कुठल्या अजून वरदानाची गरज नव्हती.
जाऊ द्या पण हा लक्ष्मी नारायणाचा अतुलनीय जोडा ज्याने कुणी घडवला तो
महाभागच आपल्या आशीर्वादाला खरा पात्र आहे असा विचार करून त्यालाच वर
देण्याचे ब्रह्मदेवांनी ठरवले. चौकशी केल्यावर त्यांना ह्या सगळ्या
चमत्काराचा कर्ता करविता बाळकराम असल्याचे कळले. त्यांनी बाळकरामाचा शोध
घेतला , बाळकराम आता एकांतात गोविंदाग्रज ह्या टोपण नावाने कविता करीत
बसलेले त्यांना आढळले, ब्रम्हदेवांनी त्याचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला
तेव्हा असेल कुणी ' चिंतातूर जंतू ' म्हणून त्यांनी त्यांच्या कडे दुर्लक्ष
केले.
राम गणेश गडकरी उर्फ बाळकराम उर्फ गोविंदाग्रज ' दोन बोटांचे अंतर ' पार
करून काव्यसाधनेच्या स्वर्गात विचरण करीत होते त्यांना आता कुठल्याही भौतिक
वरदानाची गरज नव्हती.
ब्रम्हदेवांनी त्यांचाही नाद सोडला आणि ते कार्यालयात परतले.
कार्यालयातील सगळे वराती मनसोक्त भोजन करून ढेकरा देत हात पाय पसरून आरामात
पसरले होते त्यातील कुणालाही वर द्यावा असे ब्रम्हदेवांना वाटेना, भोजन
भाऊ कुठले! ब्रम्हदेव मनातल्या मनात म्हणाले, त्यांची प्रसन्नता हळूहळू कमी
कमी होत होती.
निराश होऊन ते परतण्याच्या विचारात ते होते तितक्यात त्यांना पु. ल. देशपांड्यांचा नारायण नजरेस पडला.
नारायण सा-या कार्यालयात पायाला भिंगरी लावल्या सारखा फिरत होता, कुठलेही
कार्य त्याच्या शिवाय पार पडत नव्हते, त्याचा उत्साह, त्याची धावपळ अन धडपड
बघून ह्यालाच आशीर्वाद देऊन आता एकदाचे निघावे असा विचार ब्रम्हदेवांनी
केला, पण लग्नाचे सर्व सोपस्कार पार पडे पर्यंत नारायण काही त्यांचा हाती
लागला नाही , जेव्हा वरातीसह ठकी सासरी जाण्याचा कार्यक्रम पार पडून
कार्यालयात शुकशुकाट झाला तेव्हा कुठे नारायणाला थोडी उसंत मिळाली, थोडे
पडण्यासाठी तो बाकड्या वर बसताच ब्रम्हदेवांनी त्याला गाठले, नारायण जेव्हा
त्यांना बघून उभे राहून त्यांना नमस्कार केला तेव्हा त्यांना अत्यानंद
झाला त्यांना इतका आदर पृथ्वीतलावर आल्यापासून कुणीही दिला नव्हता.
" काही हवंय का आपल्याला?" नारायणाने त्यांना विचारले.
" नको मला काही नको! आम्ही फार प्रसन्न आहोत " ब्रम्हदेव म्हणाले .
" धन्यवाद! धन्यवाद!!जितकं जमलं तेव्हढ केलं हं, काही कमी जास्त झालं असेल तर समजून घ्या " नारायण म्हणाला.
" नाही तुला कळलं नाही, मी देव आहे " ब्रम्हदेव म्हणाले.
नारायण गोंधळात पडला, " देव ! देव आडनाव होय तुमचं? नक्की कुणाकडचे?
मुलाकडचे की मुलीकडचे? माफ करा हं आजकाल नावं विसरायला होतं मला पुष्कळदा.
पण दोन्ही कडची मंडळी गेलीत आता कुणालाही भेटायचं असेल तर आता इथे कुणीही
भेटणार नाही " नारायण म्हणाला.
" तसं नाही रे ' ब्रम्हदेव म्हणाले.
" मग माझ्याकडे काही काम आहे का?" नारायणाने विचारले..
ब्रम्हदेवांच्या रागाचा पारा चढण्यास पुन्हा सुरवात झाली, "माझं तुझ्या कडे
काहीही काम नाही, तुझ्याकडून मला काहीही नकोय, मी देव आहे! मी अतिशय
प्रसन्न आहे तव्हा तुला काय हवं असेल ते मागून टाक, जे मागशील ते मिळेल,
बोल काय हवं तुला?" ब्रम्ह्देव राग आवरून म्हणाले.
"आं!" नारायणाने जांभई दिली, " मला काहीही नकोय हो, मी फार थकलोय, बस झोपू द्या मला आता थोडा वेळ शांतपणे" नारायण म्हणाला.
"तथास्तु! !" ब्रम्हदेव चिडून म्हणाले आणि क्षणात अंतर्धान पावून आपल्या महालातील कोप भवनात जाऊन बसले.
बातमी कळताच "नारायण! नारायण !!" चा घोष करीत नारदमुनी थेट कोप भवनात प्रवेश करते झाले.
" नाव नका घेऊ त्या नारायणाचं! मूर्ख कुठला! इथे मी त्याला स्वत: आशीर्वाद
द्यायला गेलो तर तो मूर्ख मागतो काय, झोप ! किती घोर तपश्चर्या करायचे ऋषी
मुनी पण मी काही केल्या प्रसन्न होत नसे, काळ बदललाय हेच खरं, आता ह्याला
बसल्या जागेवर वर द्यायला गेलो तर कीम्मत नाही, मागून काय मागितलं तर झोप!
हद्द झाली " ब्रम्हदेव म्हणाले.
" पण देवा आपण वर बिर देण्याच्या भानगडीत पडलाच कशाला? अहो वर काय शाप काय
ते देण्याचा कारभार करूच नये कधी. मनुष्याला स्वत:ला नेमके काय हवं तेच कळत
नाही त्यामुळे अशा गोष्टी मुळे गडबडच होण्याची शक्यता जास्त असते"
नारदमुनी म्हणाले.
" काहीतरीच काय बोलताय तुम्ही मुनिवर! " ब्रम्हदेवांचा पारा अजूनही चढलेलाच होता.
" रागवू नका देव! पण तुम्ही इथे स्वर्गात असता, मी सतत इथून तिथे फिरत असतो
मला सृष्टीची खडानखडा माहिती आहे, राग माणु नका पण तुमच्या पेक्षा मला
परिस्थितीची जास्त जाणीव आहे, आता हेच बघा अश्वथ्याम्याचे अमरत्वाचे दुख:
माहीत असूनही मनुष्याची अमरत्वाची हौस अजुन पुरती फीटली का? माणसाच्या
इच्छा असंख्य असतात म्हणुन त्याला स्वतःला नक्की काय हवंय अन नेमकं काय
मागाव हेच कळत नाही, त्यामुळे आजवर कुठलाही मनुष्य कुठल्याही वराने संतुष्ट
झालेला नाही, उलट त्याचं दुख: मात्र अजूनच वाढलं आहे " नारदमुनी म्हणाले.
" कसं शक्य आहे ते?" ब्रम्हदेवांनी चिडून नारद मुनीनां विचारले .
" अहो खरं तेच बोलतोय मी " नारदमुनी म्हणाले, " भगवान शंकरांची गोष्टं
सांगतो ऐका, मागे एकदा असेच भगवान शंकर तुमच्या सारखेच अतिशय प्रसन्न होते,
प्रसन्नतेच्या आवेगात एकाला त्रिभुवनाचे राज्य देऊन बसले, पुढे काय झाले
असेल माहीत आहे? " मुनीवरांनी विचारले.
" नाही तुम्हीच सांगा काय ते " ब्रम्हदेव म्हणाले.
" कुणालाही वाटेल की त्याच्या सारखा सुखी तोच " नारदमुनी म्हणाले.
" हो मग काय!" ब्रम्हदेव म्हणाले.
" पण उलट तो अजून दुखी: झाला " नारदमुनी म्हणाले.
" कसं काय? " ब्रम्हदेवांनी विचारले.
" अहो त्रिभुवनाचे राज्य मिळाले तरही प्रारब्ध कुठे बदलतंय? राज्य मिळाले
पण ते चालवण्याची क्षमता कुठे होती, जो माणूस एक संसार धड चालवू शकला नाही
तो राज्य काय चालणार?" नारदमुनी म्हणाले.
" मग?" ब्रम्हदेवांनी विचारले.
" अहो तो राजा झाला तशी त्याची बायको राणी झाली ना? त्याच्या खाष्ट बायको
पुढे त्याचे काहीच चालायचे नाही, मग काय त्याच्या बायकोने त्याच्या
प्रमाणेच त्रिभुवनाचे राज्य आपल्या तालावर नाचवले, हा नावापुरता राजा
राहिला " मुनिवर म्हणाले.
" अरे रे! मग? " ब्रम्हदेवांनी विचारले.
" मग काय! राज्य मागण्या पेक्षा देवाला एखादी अप्सराच मागितली असती तर
जास्त सुखी राहिलो असतो ह्या पश्चातापातच जन्मभर जळत राहिला बिचारा "
नारदमुनी म्हणाले.
" अरे रे!" ब्रम्हदेव म्हणाले.
" पुढे ऐका, असेच विष्णू भगवान एकदा तुमच्यासारखेच वर देण्या साठी आसुसले
होते, तेव्हा त्यांनी काय केले ठाऊक आहे?" नारदमुनींनी विचारले.
" सांगा तुम्हीच!" ब्रम्हदेव म्हणाले.
" भिकेसाठी वणवण फिरण्या-या भिका-याला कधी न संपणा-या धन संपत्तीचा वर देऊन बसले " नारदमुनींनी सांगितले.
" मग? " ब्रम्हदेवांनी विचारले.
" मग काय! विष्णू भगवानांच्या शब्दाखातर कुबेराने आपलं खजिना रिकामा करून
दिला, पण इतके मिळूनही तो भिकारीही ही कुठे सुखी झाला? " नारदमुनी म्हणाले.
" का बरं? "ब्रम्हदेवांनी विचारले.
" अहो खजिना तर संपता संपेना, पण आयुष्य मात्र संपून जाणार अन खजिन्याचा
उपभोग तो पुरेपूर घेऊ शकणार नाही ह्याच दुखा:त त्याचा अंत झाला, खजिन्या
सोबच देवाला अमर पट्टा का मागितला नाही ह्याच दुखा:त तो जन्मभर तडफडत
राहिला " मुनिवर म्हणाले.
" हसावे की रडावे हेच कळत नाही " ब्रम्हदेव म्हणाले, आता त्यांची मनस्थिती परत ताळ्यावर येत होती.
खाली पृथ्वीतलावर नारायाणालाही जाग आली होती.
" झाली झोप? "जवळ बसलेल्या नारायणाच्या बायकोने त्याला विचारले.
" हो , अगदी मस्त झोप झाली" नारायण म्हणाला." अरे तो माणूस गेला की काय?" आळस झटकून नारायणाने विचारले.
" कोण हो, कुठला माणुस? " नारायणाची बायको म्हणाली.
" कोण तो नक्की माहीत नाही देव नाव सांगत होता, त्याला बघितल्यावर पहिले
मला वाटलं की इथे पूजेला बोलावलेला ब्राम्हण असणार, पण त्यांना तर त्यांची
दक्षिणा आधीच दिली होती " नारायण म्हणाला.
" काय म्हणत होता?" नारायणाला बायकोने विचारले.
" काही नाही गं! म्हणत होता मी प्रसन्न झालोय तुझ्यावर काय वाट्टेल तो वर माग, नारायाणाने बायकोला सांगितले.
" अहो देव प्रसन्न झाल्याचं स्वप्न पडलं असेल तुम्हाला " नारायणाची बायको म्हणाली.
" स्वप्नच असावं कदाचित तू म्हणते तसं " नारायण म्हणाला.
" ते जाऊ द्या पण तुम्ही काय मागितलं ते तर सांगा " बायको म्हणाली.
" काही नाही गं, म्हटलं शांतपणे थोडावेळ झोपू द्या मला " नारायण म्हणाला.
" नशीब माझं! असा नवरा मिळालाय की ज्याला देव प्रसन्न झाला तर काय मागतो झोप!" नारायणाची बायको हसून म्हणाली.
" जाऊ दे गं! आपण आहोत ना एक दूस-याला सांग अजून काय हवं? वर जाताना काय
घेऊन जाणार आहोत तर कुणाला काही मागत बसायचं" नारायण म्हणाला.
" जाऊ दे निघूया घरी आता "असे म्हणून नारायणाने थैली उचलली अन बायको सोबत चालू लागला.
" बघा बघा! मुनीवर, आम्ही प्रत्यक्ष त्याला वर द्यायला गेलो तर म्हणतो काय
मागायचं, काय म्हणावं तुम्हीच सांगा?" ब्रम्हदेवांनी कपाळावर हात मारला.
" अरे ह्याच्या विषयी बोलत होता तुम्ही?" नारदमुनी म्हणाले.
" तुम्ही ओळखता ह्याला?" ब्रम्हदेव आश्चर्यचकित झाले.
" हो तर! हा फार प्रसिद्ध आहे हा, पु. ल. देशपांड्यांचा नारायण! मोठ्या
लेखकाचं प्रसिध्ध पात्र! ह्याला कोण ओळखत नाही? अन हा तुम्हाला काय
मागणार?" नारदमुनी म्हणाले.
" काय मागणार? म्हणजे! जसं काही ह्याच्या जवळ सर्व काही आहे?" ब्रम्हदेवांनी नारद मुनीनां विचारले.
" सर्व काही तर नाही पण ह्याच्या जवळ एक गोष्टं मात्र नक्कीच आहे, जिच्या पुढे जगातील सर्व सुखे फिक्की पडतील " मुनिवर म्हणाले .
" कोणत्या गोष्टीबद्दल बोलताय तुम्ही मुनीवर?" ब्रम्हदेवांनी विचारले.
" मी कशाबद्दल बोलतोय ते तुम्हाला चांगले ठाऊक आहे देव! फक्त ते तुमच्या
ध्यानात येत नाही इतकच! आता सृष्टी निर्मात्याचेच त्याकडे दुर्लक्ष होत
असेल तर माणसाला तरी कसा दोष द्यावा? " नारदमुनी म्हणाले , " आनंदा बद्दल
बोलतोय मी, आनंदा बद्दल असंच होतं माणूस नेहमीच आनंदाला दुय्यम मानतो
म्हणूनच दुखी: राहतो पण हा नारायण अगदी लहान सहान गोष्टीं मधेही आनंद शोधतो
" नारदमुनी म्हणाले.
" आजवर इतिहासात अनेकानेक घनघोर तपश्चर्या झाल्यात अनेकानेक वर देण्यात
आलेत, पण देव लोकांच्या इतिहासात आजवर कुणाही मनुष्याने आनंदाचे वरदान
मागितल्याचा उल्लेख नाही " ब्रम्हदेव म्हणाले.
" खरं आहे देव ते " नारद मुनी म्हणाले, " तुम्हाला तर ठाऊक आहे आनंद काय
मागून मिळत असतो का? तो तर पृथ्वीतलावर सर्वत्र पसरलाय, प्रत्येक
मनुष्याच्या मनात दडलाय, ज्याला तो सापडत नाही तोच दुस-या गोष्टींचे वरदान
मागत फिरतो अन तरीही दुखी:च राहतो, आणि ज्याला आनंदाचा ठेवा सापडलाय त्याला
दूस-या कुठल्या वरदानाची गरज असणार? तुम्हीच सांगा " नारदमुनी म्हणाले.
" नारायण ! नारायण !! "
अहो आश्चर्यम! ह्या वेळेस हे उद्गार चक्क ब्रम्हदेवांच्या मुखावाटे बाहेर पडले.
एक लघुकथा
उरल डोंगररांगा रशिया देशाच्या पश्चिमेला आहेत व पार उत्तर दक्षिण
पसरलेल्या आहेत, ह्या पर्वतराजीतल्या उत्तरेकडच्या टोकाला भयानक थंडी
असते, तिकडच्याच एका गावात घडलेली ही गोष्ट.
नादिया नावाची एक म्हातारी स्त्री गावाबाहेर आपल्या रानातल्या प्लम व चेरींच्या टुमदार बगिच्यात लहानशी बंगली बांधुन राहात असे, दुर्दैवाने तिचा मुलगा तुर्कांसोबतच्या युद्धात दुर दक्षिणेला कॉकेशस पर्वतांमधे झालेल्या एका युद्धात झार मालकांसाठी मरण पावला होता, व तिचा नवरा एकदा उरल मधेच तावदा नदीत मासे पकडायला गेला असताना मरण पावला होता "ग्रेगोरी गेला" हे ऐकुनच तिला धक्का बसला होता.
अशी ही म्हातारी नादिया म्हातारवयामुळे व आलेले संकटाचे डोंगर झेलुन थकल्यामुळे आजकाल तिरसट व चिडचिडी झाली होती परवाच तिने व्होल्गा पारिचेव्होबा चा मुलगा इवान ह्याला घोड्याच्या वादीने फ़ोडले होते कारण त्याने नादियाच्या बागेतील एक चेरी चा घोस तोडुन खाल्ला होता. सबंध गाव तिला घाबरुनच असे. मुलगा व नवरा दक्षिणेला गेले व देवाने हिरावुन घेतले म्हणुन ती दक्षिणेतुन आलेल्या कोणाचा ही रागराग करित असे. वरतुन ती गावाच्या उत्तर टोकाला राहात असे म्हणुन ती दक्षिणेला वसलेल्या गावचा व गावक~यांचा पण राग करीत असे.
अशीच एकदा नादिया रात्री झोप येत नाही म्हणुन बायबल वाचत बसली होती. तोच तिच्या दारावर टकटक झाली, म्हातारी नादिया तिरीमिरीत उठली व दार वाजवुन घाबरवणा~या पोराला बोल लावायचे म्हणुन दार उघडले तो काय नवल, तिला एक तरुण शिपाई दिसला, बर्फ़-पाण्यात भिजलेला तो जीव करुण झाला होता, पण नादियाच्या खाष्ट स्वभावाला तोड नव्हती.
"काय आहे?? इतक्या रात्री काय खुशाल दारे बडवताय"
"माय, मी दुर सैबेरीयातुन आलोय ग, तिकडे छावणी होती माझी, मी माझा घोडा हरवला म्हणुन आमच्या कर्नल ने मलाच तो शोधुन द्यायचा आदेश दिला . तो दिला व आता मी सुट्टीवर घरी जातो आहे, मी मुरमान्स्क चा आहे, फ़िनलंड देशाच्या सरहद्दीवर आहे माझा गाव."
"हे बघा माझ्या कडे तुम्हाला काही मिळणार नाही सांगुनठेवते. नसती नाट्के करु नका व्हा चालते"
तसे त्या शिपायाची मुद्रा अजुनच काळवंडली. गयावया करीत तो म्हणाला
"नका नका माय असे म्हणु नका तुमच्या गावच्या शिवेवरच माझा पाय मोडलाय हो, दया करा, पुर्ण गावात फ़क्त तुमच्या टेकडीवरच्या घरातच दिवा दिसला म्हणुन आलोय मी"
"नाही त्रिवार नाही, मर तुझ्या कर्माने जा चालता हो" असे म्हणत नादिया दार धडकणार इतक्यात तो बोलला
"माय, ऐकुन तरी घे ग, बघ माझ्या पिशवीत सगळे आहे, मला फ़क्त तुझी ओसरी दे व एक जग भरुन पाणी दे, मी
माझे दगडाचे सुप करुन पितो अन झोपतो तुझ्याच पडवीत, सकाळी उठुन जाईन माझ्या वाटेने", तेव्ढ्यात दुर डोंगरात एक लांडग्याची बांग ऐकुन म्हातारी पण थोडी द्रवली. खरे तर तिचे कुतुहल चाळवले गेले होते
ती लगबगीने एक जगभरुन पाणी घेऊन आली,
येताना पुटपुटतच आली "काय पण म्हणे थेरं, अन दगडाचे सुप म्हणे"
"काय रे दगडाचे कधी होते का सुप??"
"हो माय, हा खास दगड आहे, मी एकदा युद्धात जखमी झालो होतो तेव्हा मी सेंट पिटर ची मनापासुन करुणा भाकली होती तेव्हा मला शांत झोप पण लागली अन दुसरे म्हणजे उठलो तेव्हा माझ्या उजव्या मुठीत हा दिव्य दगड होता."
"बघु बघुच तुझे हे दिव्य दगडाचे सुप म्हणुन म्हातारी नादिया दाराच्या उंब~यावर ठाण मांडून बसली"
गडी कामाला लागला, पहिले त्याने जवळच्या काही काड्या गोळा केल्या त्यांची आगोटी तयार करुन त्यावर सैनिक शिधा शिजवत ते भांडे ठेवले. त्यात खुप जपुन कोटाच्या आतल्या खिश्यात ठेवलेला एक वाटोळा गोटा ठेवला व म्हातारीने दिलेले पाणी त्यात ओतले.
"माय, हे सुप ढवळायला तुझ्याकडे पळी असेल काय ग?"
"काय कटकट आहे, माझ्याकडे नाहीये काही पळीबिळी" असे म्हणत म्हातारी उठली व शेवटी पळी घेऊनच आली
"हे घे शिपुर्ड्या, अजुन काही मिळायचे नाही सांगुन ठेवते"
बराचवेळ गडी पाणी ढवळत बसला. मग हळुच स्वगत बोलल्यागत बोलला "सफ़रचं...... चक्चक चक"
चौकस झालेली म्हातारी म्हणाली "काय रे काय म्हणालास तु?"
"काही नाही माय, ह्या सुपात जर सफ़रचंदाच्या फ़ोडी घातल्या तर असली लज्जत येते, पण जाऊ दे तुझ्याकडे
कुठली ह्यावेळी सफ़रचंद असणार ग" असे म्हणुन तो पाणी ढवळत बसला...
"नाही का म्हणुन आहेत माझ्या कडे सफ़रचंदे थांब आणते," म्हणत म्हातारी घरात पळाली व तीन सफ़रचंदांच्या चांगल्या फ़ोडी करुन घेऊन आली "पुरेत काय रे?
"बख्खळ झाली माय बस कसे आहे सफ़रचंदांनी गोडमिट्ट होते ग दगडाचे सुप, म्हणुन मी किनई त्यात दोन चार बटाटे घालत असतो, पण नसतील तुझ्याकडे बटाटे..... असो"
शिपाईगड्याचे बोलणे ऐकुन ते संपायच्या आतच म्हातारी बटाटे चिरायच्या उद्योगाला लागली होती, दोन बटाटे पुरेत ग माय त्याने स्वयंपाकखोलीत असणा~य़ा नादियाला ओरडुन सांगितले.
बटाटे टाकुन पण तो काही काळ ते सुप ढवळत बसला, थोड्या वेळाने हसुच लागला तसे म्हातारी नादिया चिडुन म्हणाली
"हसायला काय झालंय तरी काय मेल्या???"
"काही नाही ग माय, ह्या सुपात किनई बोकडाचे खारवलेले मांस फ़ार मस्त लागते व लज्जत वाढवते,
सैबेरीयाच्या छावणीत तर बोकड नसला तर आम्ही ह्यात रेंडीयर टाकत असु...ते आठवले अन हसलो बघ"
"देऊ का तुला खारवलेलं बोकडाचं मांस?" "
"नको नको माय कश्याला उग्गीच तुला त्रास" असे म्हणुन तो सुप ढवळत बसला........
"त्यात कसला आला आहे त्रास म्हणत नादिया उठली व चांगली खारवलेली कलेजीच घेऊन आली"
मटण टाकुन तो तसाच ढवळत बसला, थोड्या वेळाने घाबरा झाला तसे नादिया म्हणाली "काय रे असा का घाबरा झाला तु?"
"मी जातो माय....."
"ते काही नाही आधी कारण सांग, ते सुप पुर्ण कर अन मग मर कब्रस्तानात जाऊन"
"अगं, मला सेंट पिटर चा आदेश आहे ग, ह्या दैवी सुपात जर मी कांदा नाही घातला तर मला नरकवास होईलच पण मला लांडगे फ़ाडुन खातील अन मगच मी मरेन. आता तुला कांदे मागणे काही मला रुचत नाही, त्यापेक्षा मी पळतोच कसा!!!!!"
"थांब मेल्या , बीनकांद्याचा मेलास तर माझ्या डोक्याला मढ्याचा ताप होईल तुझ्या" असे म्हणत नादिया २ कांदे चिरुन घेऊन आली
"माय तु जीव वाचवलास बघ माझा!!!!!!"
"झाले का रे बाबा तुझे दिव्य सुप???"
"थोडा धीर धर माय"........
थोड्यावेळाने तो एकदम उठला व जोरजोरात नकारार्थी मान हलवत जायला लागला
"ए बाबा काय झाले?"
"अग माय हे सुप करायच्या आधी त्यात २ चमचे लोणी, चिमुटभर मीठ व काळी मिरी नाही घातली तर पुर्ण सुप खराब होते. व ते देवाचे नाही सैतानाचे सुप होते, असो आजचा दिवसच खराब आहे, येतो मी"
तो जोडे घालेस्तोवर म्हातारी विचारमग्न झाली व हळुच म्हणाली "मागुन मीठ-मिरी-लोणी" घातले तर नाही का चालत रे?"
"अग पण ते आहे का तुझ्याकडे? नाही उगाच तुला कश्याला त्रास"
"नाही नाही त्रास कसला.... देवाचे काम सैतानाचे व्हायला नको, मला पण थोडे पुण्य लागु देत की"
मीठ मिरी लोणी आले, तसे सुपचा रंग मस्त खुलुन आला.... व ते उकळु लागले.
"आता झाले का रे ते सुप??"
"हो "आई" ते सुप झाले आहे"
"आई" अरे देवा अंधारात अधु डोळ्यांना दिसले नाही खरे आहे पण मी आवाजही कसा विसरले..... अरे तु तु तु माझा मिखाईल... अरे तु जिवंत..... मिखाईल!!!!!"
म्हातारी ढसाढस रडु लागली तसे पोरगा म्हणाला. "आई, मी वारल्याची अवाई उठली ..... काही दिवसांनी बाबा पण गेले..... पण तुला देवाने चांगले आरोग्य दिले होते ना? म तु अशी का झालीस???, हे बघ आई देवाने आपल्याला सगळे दिले असते आपणच ते शोधु शकत नाही, घरात सफ़रचंदापासुन ते लोण्यापर्यंत सगळे आहे पण जर ते काढण्याची वृत्तीच आपल्याकडे नसेल तर कसे होणार माऊले????"
"आज मी गावात आलो ते कुठे न जाता घरी यायला निघालो तसे व्होल्गा परिचेव्होबा भेटली, ती म्हणाली तु खुप खाष्ट झाली आहे व नवरा-मुलगा गेल्या पासुन तु दैवाला दोष देत जे चांगले आहे ते न पाहता देखील सारखी चिडत असतेस, म्हणुन तुला समजवायसाठी हे सुप पुराण केले बघ".... म्हातारी आता शांत पणे घळा घळा डोळ्यातन आसवे गाळत होती
ती हळुच उठली येशुच्या तसबीरीपुढे उभी राहीली व कन्फ़ेशन देऊ लागली... तसे मिखाईल सुप घेऊन आत आला थोड्या वेळाने दोघ मायलेकरु गरम ऊन सुप पिउन झोपी गेले.
सकाळी नादिया उठली कधी नव्हे ते तिने आरश्यात स्वतःलाच हसताना पाहिले व स्वतःच हरखली, ती टोपले घेऊन बागेत गेली भरघोस लहडलेल्या चेरीं मधुन तिने टोपलीभर चेरी तोडल्या व व्होल्गा मावशीच्या दारात उभी राहुन हाळी दिली
"व्होल्गाsssssss कुठेस गं????"
आता भांडायचे असा विचार करुनच ती पण बाहेर आली, तो काय!!! आक्रित व्हावे तसे नादियाने वाकुन तिच्या हाताचा मुका घेतला व म्हणाली "माफ़ी मागायला आले मी"
"जाऊ द्या ना काकी काय तुम्ही पण ,मी लहान आहे माझी कसली माफ़ी मागताय" असे व्होल्गाही म्हणाली..
असे म्हणुन टोपली भर चेरी इवान ला देऊन म्हातारी प्रसन्न मुद्रेने घरी आली
नादियाच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली होती, तिने जवळच्याच खेड्यातल्या एका सुंदर मुलीशी मिखाईल चे लग्न लावुन दिले व पुढे मुला-सुना-नातवंडात राहुन उरलेले आयुष्य मजेत घालवु लागली.

प्रेम
त्या दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते.
त्याचं जरा जास्तच. तिच्यासाठी काय करु
आणि कायनको असं त्याला
झालेलं. पण त्याचा खिसा कायम फ़ाटलेला. कडकाच
होता बिचारा. पण भलताच romantic . तिच्याशिवाय
जगण्याची कल्पनाही त्याला करवत
नसे.तिला काहीतरी गिफ़्ट द्यावं असं त्याला मनापासुन
वाटतं होतं. पण द्यायच काय...? खिशात तर
दिडक्या नाहीत..शेवटी न राहवुन त्याने तिला रंगीत
कागदांची फ़ुलंच प्रेझेण्टकेली.. ती खुष
होती..तशीही तिची त्याच्याकडुन फ़ार
मोठी अपेशा नव्हती. तो जे देत होता त्यात
ती समाधानीचहोती..
तसाही तो सामन्यच होता. जेमतेम नोकरी.. भविष्यात
काही करुन दाखवेल असं पाणीही त्याच्यात दिसत
नव्हतं...पण एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले ते
दोन जीव सुखात होते.....
पण एक दिवस सगळा नुरच पालटला..ती म्हणाली, "
तुझ्याबरोबरं आयुष्य जगायंच म्हणजे नेहमी असं रडखड्त, मन
मारतचं जगावं लागेल..काय सुखात ठेवणार तुमला..? काय
आहे
तुझ्याकडे...? - तर काहीच नाहि...मी परदेशी चालले
आहे..पुन्हा कधीच परत येणारनाही..तु मला विसर.
आजपासुन आपले मार्ग निराळे.. माझा-तुझा संबंध एकडेच
संपला......."
ती कायमची निघुन गेली...
हा मॊडुन पडला....संपलाच जणुकाही....सर्व काही संपले
त्याच्यासाठी..
दिवस सरले आणि याच्या मनातली दु:खाची लाट ऒसरुन
संतापाच्या लाह्या तड्तडायला लागल्या..त्याने ठरवलं, ’
तिने पॆशांसाठी आपल्याला सोडलं ना..? मग आतापॆसाच
कमवुन दाखवायचा.इतका की आपल्यापुढे सारं जग
तिलाथिटं दिसलं पाहिजे..’
पुढे..
या जिद्दीने पेटुन उठ्ला तो..झोकुन दिलं स्वतःला..! कष्ट
केले..राब राब राबला..मित्रांन ी मदत केली.चांगले लॊक
भेट्ले..त्याचे दिवस पालटले..तो खुप श्रींमत
झाला..स्वतःची कंपनी उभारली..पॆसा, नोकर, चाकर,
गाड्या, मानमरातब सगळं कमावलं.
विरहाच्या आगीतुन, प्रेमभंगाच्या अपमानास्पद
दुःखातुन तो बाहेर पडला..उभा राहिला..जगण्यास
ाठी धडपडला आणि यशस्वीही झाला..पण
तरीही त्याच्या मनात चुटपुट कायमच होती..तीसोडुन
गेल्याची..तिनं नाकारल्याची..आपल्या गरीबीचा अपमान केल्याची..तिच्या
वरच्या प्रेमाची जागा एव्हाना तिरस्काराने घेतली होती..
एक दिवस त्याच्या आलिशान गाडीतुन तो जात
होता.बाहेर मुसळधार पाऊस पडत होता.गाडिच्या काचेतुन बाहेर पाहतो तर म्हातारं व्रुद्ध जोडपं एकाच छत्रीत कुड्कुडत उभं होतं.भिजलेल्या
त्या दोघांना पाऊल उचलणं अवघड झालं होतं.त्याने
गाडी थांबवली.आणि नीट पाहीलं.हे ’ तिचेच’ आईवडील.! त्याने त्यांच्याजवळ गाडी थांबवली..त्यांना गाडीत बसण्याचा आग्रह करावा असं त्याला वाटत
होत.त्याच्या मनातली सुडाची आग जागी झाली होती.
त्यांनी आपली श्रींमती पहावी.त्यानी आपली गाडी पहावी.आपली प्रगती पाहून
त्यांच्या लेकीनं जे काय केलं त्याचा पश्चाताप व्हावा.असं त्याला मनोमन वाटतं होत.तिला धडा शिकवण्याच्या.अपमानाच्या घावांची परतफ़ेड करण्याच्या एका वळणावर आपण आलॊ आहोत हे त्याला जाणवतं. ते दोघे मात्र
स्मशानभुमीकडे थकल्या खाद्यांने चालतच
राहातात.हा गाडीतुन उतरुन त्यांच्या मागे जातॊ.
"..पाहतो आणि कोसळतोच.."
तिचाच फ़ोटो.तसाच हसरा चेहरा आणि कबरीजवळ
ठेवलेली त्याने दिलेली कागदांची फ़ुलं. हा सुन्न झाला.धावतच गेला कबरीकडे.तिच्या आईबाबांना विचारलं.काय झालं ते सांगा.
ते म्हणाले."ती परदेशी कधीच गेली नाही.तिला '
कर्करोग’ झाला होता.तो झाल्याचं कळलं तेव्हा थोडे
दिवस होते तिच्या हातात.आपल्या अकाली जाण्याचं
दुःख तुझ्या वाट्याला येऊ नये म्हणुन
प्रेमभंगाचा चटका देवुन ती गेली.तू संतापुन
उभा राहशील.जगशील.यावर तिचा विश्वास होता.
म्हणुन तिनं तुला सोडुन जाण्याचा नाटक केले.
ती गेली.आणि तू जगलासं

Subscribe to:
Posts (Atom)