chitika

Sunday 30 September 2012


                    नावाचा फायदा

एकदा एका गावात दरोडा टाकायला डाकूंची टोळी येते . ते डाकू सगळ्यांना ठार मारु लागतात . एका घरात एक म्हातारी आणि म्हातारा दोघेच असतात .
डाकू : म्हातारे तुझं नाव काय ?
म्हातारी : माझ नाव गंगूबाई .
डाकू : ठिक आहे , मी तुला सोडतो ... कारण माझ्या आईचं नाव पण गंगूबाई होतं .
डाकू : म्हाता - या तुझं नाव काय ?
म्हातारा : माझं नाव ग्यानबा . पण सगळे लाडाने मला गंगुबाईच म्हणतात


         सोना किधर है!

दरोडेखोरः सोना किधर है!
गंपूः तुला पाहिजे तिथे झोप... आपलंच घर समज! 


          पुणेरी घरासमोरील पाटी

  ' देशपांडे कुठे राहतात ते आम्हाला माहीत नाही. उगाच घंटी वाजवून विचारू नका. '

                                                दारुडा डॉक्टर 


डॉक्टर - तुमच्या आजाराचं नक्की कारणच समजत नाहीय. कदाचित दारु पिण्याने असं होत असेल. 
पेशंट - हरकत नाही , मला काही घाई नाही. तुमची उतरली की येतो.
                                           बहिनिची मागणी 

मुलगी - असा काय बघतोयस माझ्याकडे , तुला बहिण वगैरे नाही का ?
मुलगा - आहे ना , म्हणून तर बघतोय
मुलगी - का ?
मुलगा - कारण ती म्हणते , गोरी गोरी पान फुलासारखी छान , दादा मला एक वहिनी आण.
                           गंपू ची डिग्री 

  
मुलाखतकारः तुझं शिक्षण किती ?
गंपूः पीएचडी. पास्ड हायर सेकंडरी विथ डिफिकल्टी
 

  फेसबुकवर हंबरणा-या म्हशी

पोरगा - hi..
पोरगी - hmm..
पोरगा - मग कशी आहेस ?
पोरगी - hmmm..
पोरगा - ऑनलाइन आहेस ?
पोरगी - hmmmm...
पोरगा ( वैतागून )- अगं बोल की , नुसतं हम्म्म काय करतेस म्हशे

                                           वीक पॉइंट

 एचआर मॅनेजर - तुमचा सगळ्यात स्ट्राँग पॉइंट काय आहे ?

गंपू
- माझी बायको .

एचआर
मॅनेजर - आणि तुमचा सगळ्यात वीक पॉइंट कुठला आहे ?

गंपू
- दुस-याची बायको

 



                            कलियुगातिल नाते 


झंप्या - आई , आपल्याकडे आजोबा , आजी आणि आत्या आले आहेत ना ?  
झंप्याची आई - हो......  
झंप्या - पण , तू तर काल म्हणत होतीस की एक म्हसोबा , सटवी आणि टवळी असे तिघेजण चरायला येणार आहेत म्हणून. मग त्यांचं काय झालं ?
                    कलियुगाच्या  सुनबाई 

सासू - किती वेळा सांगितलंय की बाहेर जाताना टिकली लावत जा म्हणून.
सून - अहो सासूबाई , जीन्सवर टिकली लावत नाहीत.
सासू - अगं जीन्सवर नाही , कपाळावर लाव.
                           गंपुची भेटवस्तू 


गंपूने गर्लफ्रेंडसाठी सोन्याचा हार आणला.
गर्लफ्रेंड - थँक यू डिअर. मला हा हार जाम आवडला. पण याची किंमत काय असेल ?
गंपू - किमान तीन वर्ष जेल.
                                     जावा व्हर्जन्स      


संता आयटीच्या ऑफिसमध्ये नोकरी मिळवण्यासाठी इंटरव्ह्यू देत होता.
मॅनेजर - जावाच्या ४ व्हर्जन्स कुठल्या ते सांग
संता - ओय व्हेरी सिंपल...मर जावा , मिट जावा , लुट जावा , सडके जावा.
मॅनेजर - हो का ? बरं मग आता घरी जावा.
                                         नविन टेक्नॉलॉजी

नर्स - काँग्रॅच्युलेशन्स , तुम्ही बाप बनलायत. तुमच्या घरी मुलगा जन्माला आलाय.

गंपू - अरे वा...देवा , काय जबरदस्त टेक्नॉलॉजी आलीय. बायको इथे हॉस्पिटलमध्ये आणि मुलगा घरी जन्माला आलाय.
                         चिंटूचे  बाबा

पोलिस - बाई , तुमच्या बहादुरीचं कौतुक करायला पाहिजे. हातात काठी-बिठी काहीच नसताना तुम्ही त्या चोराची काय सॉल्लिड धुलाई केलीय.

गणपुले बाई - छे हो...त्यात काय एवढं ? रात्रीच्या अंधारात मला नीट दिसलंच नाही. मला वाटलं , रोजच्यासारखे चिंटूचे बाबाच उशिरा घरी आलेत.
                     मुलगा आणि मुलगी 

मुलगा - तुझा ड्रेस खूप छान आहे गं
मुलगी - थँक्स
मुलगा - लिपस्टिक एकदम मॅचिंग आहे , मेकअप तर छानच केलायस.
मुलगी - थँक यू दादा.
मुलगा - एवढं करूनही दिसायची मात्र बोंबच आहे.

Mulaga aani mulagi

 मुलगा आणि मुलगी 

मुलगा - बस आणि मुलगी सारखेच आहेत...एक गेली की दुसरी येते.
मुलगी - रिक्षा आणि मुलगा सारखेच आहेत. एकाला बोलवा , पाच-पाच येतात.