chitika

Sunday 28 October 2012


निवृत्तीनंतर..

आता दिवसाचे चोवीस तास
फक्त माझे...माझेच आहेत
त्यात तुझेही चोवीस तास
जमा झाले आहेत!

दिवसाचे अठ्ठेचाळिस तास
संपता संपत नाहीत;
मुलांच्या रिकाम्या खोलीतून डोकावताना
किती पटकन संपले आयुष्य कळत नाही.

चमचाभर उपमा खायला
पुर्वी फुरसत नसायची
तुझ्यासाठी आणलेल्या वेणीतली
फुले कोमेजून जायची

रात्री झोपताना भविष्यातील
स्वप्नांची फुले तू माळायची
मुलांची गोड पापे घेऊन
कुशीत माझ्या विसावायची

आता...
करकरीत सकाळी
करकरीत तिन्हीसांजेला
तू मला विचारतेस,
"एक कप चहा, बशीभर उपमा करु?"
निवांत दुपारी म्हणतेस,
"चल जुने छायाचित्र संग्रह बघू"
रात्री झोपताना गुडग्याचे दुखणे विसरून हट्ट करतेस
"आता वेळ आहेच तर आपण सर्वांना भेटून येऊ!"

खरयं ग!
आता दिवसाचे चोवीस तास
तू माझी.. फक्त माझीच आहे!
मी तुला मी अन् मला तू
शेवटपर्यंत उरणार आहेस!

चल खेळू या...

चल खेळू या...
डाव मांडून तुझं खुल्या दिलांन, आमंत्रण,
म्हटल, चला खेळू या.
मी तुझ्या बाजुनी खेळणार, म्हटल, वा!
मग पलिकडे कोण? नाही तसं नाही तिकडेही मीच खेळणार;
अं? म्हणजे...
मी तुझ्या बाजुनी खेळणार,
मीच माझ्याही बाजुनी खेळणार.
चल खेळू या?

दान तुझ्यात हातात असणार..
खेळाचे नियम तेही तुझेच
हरकत नसेल माझी
दिवसेंदिवस चालला खेळ तरी चालेल
चल खेळू या...!

तू पाऊस आण, नखशिखांत भिजव
तू उन्ह पाड....लाही लाही करुन सोड
तू शिशीरात पाने गाळ,
तू वादळानी उध्वस्त कर
तू लाटामधे दडव सगळं

आणि विचार मग.... चल खेळू या?

   ऋतू

डोळ्यात ऋतू पावसाचे
ढगाआड ऊन - हसू ओठांवरचे?

कळेना वळेना पंख निळ्या फुलपाखराचे - जपण्यास दिले का?
पान पान उतरवूनी आलो स्पर्शाकाठी तुझ्या
मेंदी ओले हात वणवा जपतात म्हणतेस का?

एक लाट अर्धी अर्धी कशी वाटून घ्यावी?
ही चोरपावलांची भाषा नकळत उमलून यावी...
स्वर बघ दारापाशी सुया घेऊन आले
हे दोन पावली अंतर एकदम वयात आले!

डोळ्यात म्हणे ऋतू पावसाचे
गहिवरातले चंद्र भेटीत न्हाले!

   रंगसंगती

वर्तमान रंगवत असताना
एखादा हवा असलेला
रंग सापडतच नाही!
त्या सारखा
इतर कुठलाच रंग
हव्या असलेल्या
रंगसंगतीशी जुळत नाही.

अवचितच भुतकाळ
हात धरत धरत
खूप खूप मागे नेतो

तिथे भेटतात
कधीकाळी चितारलेली
वेड्यासारखी रंगवलेली
काही स्वप्ने!

फक्त त्या स्वप्नांपाशीच असतो
हवा असलेला तो रंग
पण तो मी घेणार
इतक्यात आवाज येतो
"ती तर केंव्हाच भंग झाली आहेत"

वर्तमानाचे ते चित्र बिचारे
त्या रंगाविना नापंसत ठरते
आणि आजमितीच ठाऊक असलेले
रंगेल जग... हवे तसे
त्याला नावे ठेवते...


एक कविता

मला आवडते
झुंजुमुंजु पहाटे होणारी
तुझ्या बांगड्यांची किणकिण
आणि निरव रात्री
झोपेत होणारा
तुझ्या पैजणांचा आवाज

मला आवडतात तुझ्या
बनारसी रेशिम साडीवरचे
जरतारी सोनेरी बुंदके
आणि राजस्थानी ओढणीचे
नरम मुलायम चंदेरी काठ!

मला आवडतो
थंडगार काळ्या फरशीवर
उमटलेला तुझ्या
चारवेढी जोडव्यांचा ओरखडा
आणि मला आवडतो
तुझ्या हनुवटीवर गोंदलेला
पाच ठिपक्यांचा डाग हिरवा!

मला आवडते
तू रंगवलेल्या मधुबनी चित्रातले
पिवळसर हिरवपोपटी रान
आणि पदराआडून दिसणार्‍या
मीरेच्या चेहर्‍यावरील उत्कट भाव!

मला आवडते
तुझ्या नाकात टोचलेल्या
बेसरबिंदीची जांभळी झाक
आणि कानात घातलेल्या
झुमक्यांची मोहक हालचाल.

मला आवडतात
घडीची पोळी उलटताना
तुझ्या नाजूक बोटांचा नाच
आणि कपाळावरची बट सारताना
तू झटकलेला पिठाचा हात.

मला आवडतो
करकरीत कच्च्या कैरीत
दात रुतवताना
तुझ्या ओठातून ओघळून
पडलेला आंबट थेंब
आणि मिठात घोळवलेली
चिंच चाखताना
घट्ट मिटलेले तुझे डोळे!

माझ्या काळ्या-पांढर्‍या-करड्या
परिटघडीच्या जगाचे
रोजच धागे उसवतात
तेंव्हा तू काढलेल्या
रुमालावरचे गच्छी टाके
माझे मन सुखावतात.

   वर्तुळ

पुन्हा नव्या वाटा, नवी नावं
नवे चेहरे आणि नवी गावं
अव्याहतपणे चाललेलं हे चक्र...

एका वर्तुळातून दुसरं वर्तुळ
नवे व्यास पण केंद्रबिंदू तोच
परीघ मापणारी जुनीच पावलं
फिरून पहिल्याच बिंदूपाशी पोचणारी

नवी शिखरं, नवं आकाश
जुन्याचं काय करायचं सुचत नाही
अजून माझ्या मनाएवढी दुसरी जागा शोधायची आहे...

पुन्हा नवे अर्थ, नवे शोध
नवे शब्द, नवेच बोध
जुन्या वर्तुळात अडकून राहीलेला पाय

कुठवर जात राहणार हे असं?

     आसरा

ज्या वळणावर तू भेटलायस
तिथून पुढे मला नाही पहायचंय
तुझ्याबरोबर आता मला
कायमचं तिथेच रहायचंय

तुझ्या शोधात किती भटकले
अन् कितीदा रस्ता चुकले
तुझ्या शोधात धावत राहीले
माझ्या अस्तित्वालाही मुकले

आता थांबवायचंय सारं मला
आता... थांबायचंय जरा
माझ्या फिरस्त्या मनाला
देशील ना तुझा आसरा?

    आता तरी

आता मात्र मी तुला पूर्णपणे विसरले आहे
तुझ्या आठवणींना ओरबाडून दूर फेकले आहे
तुझ्या भेटी, तुझी पत्रं, सारं काही जाळलं
माझ्या विचारातलं तुझं असणं जाणीवपूर्वक टाळलं

तू समोर येऊ नयेस म्हणून मी गावच सोडला
आपल्यातला प्रत्येक बंध काळजीपूर्वक तोडला
नव्या मातीत रूजले, नव्या माणसांत रमले
लग्न केलं नाही अजून, बाकी सर्व जमले

पुन्हा पुन्हा पाहीलंय मी अगदी नीट तपासून
मनावरचा तुझा ठसा टाकलाय ना मी पूसुन?
उत्तर "हो" च मिळतं मला, कसे कुणास ठावे
स्वतःशी खरं बोलणं आता तरी शिकायलाच हवे.

    तावदान

पुढेमागे होणारं खिडकीचं तावदान
एक वावटळ घरात घुसणारी
नि:शब्द बडबडीला आलेला ऊत
मधमाश्यांची गुणगुण, वैताग स्साला!
मोहाचं मोहोळ, डंखाचं सुख
कलंडू पाहतोय काचेचा ग्लास
भिरीभिरी वारं, भिरभिरत्या डोळ्यांत
तावदान अजूनही वाजतंच आहे!

             चांदणस्पर्श

चांदणे मृदुल कायेवरूनी ओघळते
अस्वस्थ होऊनी धरा कुशीवर वळते
चंद्राच्या स्पर्शांमधेच सरते रात
मग उरी परंतु अजून ती का जळते?

Thursday 25 October 2012

comedy picture

comedy picture

comedy picture


comedy picture


comedy picture

comedy picture

comedy pictue

comedy picture

comedy picture

comedy picture

comedy image

comedy picture

comedy picture

comedy picture

comedy picture

comedy picture

comedy picture

comedy picture

comedy picture

comedy picture

comedy picture

comedy picture

comedy picture

comedy image

क्या दिख रही है .
comedy picture

comedy picture

                                           मत देखो थोड़ी तो privacy रहने दो .
comedy picture

comedy picture

comedy picture

comedy picture

comedy picture

comedy picture

आम्ही झोपलोय .
comedy picture

                      कशी आहेस ? खुप दिवस झाल भेटून ?
comedy picture

                           ये हमारा स्टाइल है . 
comedy picture

               स्टाइल 
comedy picture

All in one

comedy picture
                           
                           वजन थोड जास्त आहे .
comedy picture

                                      आम्ही सगळे दोस्त . 
comedy picture

                                   Don't distrub I'm fall in Love .
comedy picture

चला कुठे तरी फिरून येऊ .
comedy image
     
    ये स्टाइल का मामला है .
comedy image

              देवदास  
comedy image

              आज मुड जरा ख़राब आहे .
comedy image

Wednesday 24 October 2012

स्वप्निल डोळे!

 बोलके, स्वप्निल डोळे तुझे ..
अन विखुरलेले चांदणे माझ्या आभाळात,
तुझी आवरण्याची धडपड ..
अन मी अस्ताव्यस्त...माझ्याच पुंजक्यात!
तुझी भावविभोर नजर मला शोधणारी ..
भिरभिरणारी, घाबरणारी मनांत,
पाऊलखुणा शोधते ती माझ्या ..
अन मी मात्र गुरफटलेली स्वतःच्याच अस्तित्त्वात!
ठरवले मग एकदा....
उडायचे, घुसायचे- शिरायचे तुझ्या विश्वात,
एकदा तरी फुलायचे, बहरायचे ..
नाचायचे,बेभान व्हायचे तुझ्या स्वप्नांच्या अंगणांत!
वाटली होती धाकधूक वळताना ..
त्या कोषाबाहेरच्या अनोळखी वळणातं,
पण आश्वासक तुझी नजर भिडली ..
रुतली-रुजली खोलवर माझ्या हृदयात!
विसरुन स्वतःचे अस्तित्त्व मग ..
मारली उडी तुझ्या काळ्याभोर डोळ्यांत,
सोडून सगळे पाश अन ..
हरवले, बुडाले त्या कृष्णवर्णी गहिर्‍या डोहात!
तिष्ठलेल्या त्या आसवांना ..
मग दिली मोकळी करुन वाट,
अन चिंबलेल्या देहासोबत ..
अनुभवली एक लोभस पहाट!

अस्मादिक

स्वत:च दु:खाला कुरवाळत जपले आजपर्यंत जरी
दुसऱ्याच्या रडण्याला क्षुल्लक मानत असतो खुद्द तरी
"मित्रा, भरून आलेल्या थेंबाला गिळून हसणे शिक"
असले फुक्कट सल्ले देण्याला अग्रेसर अस्मादिक !

कुठे दूरवर झोपडीतला कंदिल निवांत मिणमिणतो
माळावरच्या घुबडाच्या सोबत रात्रीला जागवतो
मोजत असते घड्याळ त्याची एकटेच टिकटिक टिकटिक
कधी उशीवर वा खिडकीशी हिशेब करती अस्मादिक !

फक्त उद्याच्या काळजीमुळे 'आज' कितीसे कुरतडले
तरी 'उद्या' ना अजून आला रोज नव्याने खुणावले
ठेच लागल्यावरही ना बदले एखादा चिवट पथिक
दूरदृष्टिचा आव आणती खरे आंधळे अस्मादिक

बरेच असते मनात पण ना कृतीत काही अवतरते
रोजच इमले उंच नवनवे चंचल मन बांधू बघते
शब्द बांधणे शब्द सांडणे होत न काही उणे-अधिक
उगाच गुरगुरती, चरफडती अन घुसमटती अस्मादिक

ओढुन ताणुन गोल लपेटुन बांधुन आवळती नाती
अन डोक्यावर ओझे घेउन प्रेमाचे गाणे गाती
कुंडीमध्ये हसतो चाफा अंगण पडले ओस पडिक
हवे तेव्हढे सारवणारे, सावरणारे अस्मादिक !

'आपल्याच विश्वी रमलेले अप्पलपोटे' म्हणे कुणी
मुखदुर्बळ, निश्चल, निष्प्रभ संभावुन किंमत करे कुणी
जबाबदाऱ्यांना वागवता उडते जी त्रेधा तिरपिट
मुकाट कसरत जीवनभर ती करत राहती अस्मादिक..!

 

काव्य्-नृत्य-नाटिका `अंबा'

ही काव्य-नृत्य-नाटिका असून यात काव्याबरोबच नृत्यांना अतिशय महत्व आहे. या मधील संवाद काव्य रूपात असून ते शास्त्रीय तालांवर म्हणता येतील. पात्रांचा रंगमंचावरील वावर हा संपूर्णपणे नृत्यातच आहे. त्या अनुषंघाने मुद्रा-अभिनयाला सुध्द्दा महत्व आहे. शाळा, महाविद्यालयांच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी ही नृत्यनाटिका बसवता येईल. त्यातील काव्याचा भाग चांगल्या आवाजाच्या पुरूष-स्त्री गायकांकडून म्हणून घ्याव्यात व पात्रे हावभाव करीत असताना पडद्यामागून म्हणावा.
उत्तम नृत्य जाणणा-यांनी नृत्याचा भाग शास्त्रीय नृत्य प्रकारवर सुव्यवस्थीत बसवावा. यात त्या त्या भावांप्रमाणे काही नृत्य प्रकारांचा उल्लेख आहे उ.दा. वंदन नृत्य, तथास्तू नृत्य, बेभान नृत्य, शरण नृत्य, प्रकट नृत्य ,युध्द नृत्य व विजय नृत्य. असे आहेत. ही नावे म्हणजे प्रचलीत नृत्यप्रकारांची नसून त्या त्या वेळी आवश्यक असलेला प्रमुख भाव दर्शविण्यासाठी आहेत.
या नृत्यनाटिकेच्या सुरवातीला प्रेक्षकांना कथेच्या आरंभापासून नाटिकेच्या वस्तूविषयापर्यंत थेट जोडणारे पडद्या मागून ऐकू येणारे निवेदन आहे. तो सगळा गद्याचा भाग असल्याने येथे दिलेला नाही. जर कुणी मागीतला तर अवश्य देईन.
नृत्यनाटिका अंबा (दोन अंकी)
पात्रे:
पहिला सूत्रधार
दुसरा सूत्रधार
महिषासुर
ब्रम्हदेव
शंकर
महाविष्णू
महिषासुराचा प्रधान असिलोमा
महिषासुराचा दूत
आदिमाया अंबा देवसेना (सहा ते आठ देवांच्या वेषातील पात्रे)
अंक पहिला प्रवेश पहिला;
पडदा उघडतो तेंव्हा रंगमंचावर अंधार असून पूर्ण पडदा उघडल्यावर रंगमंचावर
हळूहळू प्रकाश पसरतो. त्याच वेळेस दोन सुत्रधार नृत्य करीत रंगमंचावर अवतरतात.
नृत्य चांगले रंगात आल्यावर... (नृत्य अंदाजे पाच मिनीटे)

पहिला सूत्रधार:
"मंडले तिन भूवने हा काळ ऐसा पातला
ब्रम्हदेवाच्या वराने दैत्य म्हैसा मातला
दैत्य महिषासुर वरेच्छे जो तपाला बैसला
तापसी दैत्यापुढे साक्षात ब्रम्हा जाहला"

पुन्हा नृत्य.... (अंदाजे 6 मिनीटे)
दुसरा सूत्रधार:
"लोटली वर्षे अनेक तो एका पायावरी
राहिला ऊभा महीषी बोलवा दिग अंतरी
ब्रम्हदेवाने दिलेल्या त्या वराने माहिषी
जिंकले मृत्यूसही ना काळजी ती फ़ारशी"
सूत्रधार नृत्य करीत करीत निघून जातात. रंगमंचावर अंधार,
पहिल्या अंकातील प्रवेश पहिला संपूर्ण.
------------------------------------------------------

अंक पहिला प्रवेश दुसरा
आता रंगमंचावर महिषासुर तप करीत असलेला दिसतो.
तो एका पायावर उभा राहून तप करत असतो. तोच वीज चमकल्या
सारखा आवाज होतो व एक दिव्य प्रकाश पडतो रंगमंचावर ब्रम्हदेव
नृत्य करीत प्रवेश करतो. ब्रम्हदेवाला पहाताच महिषासुर वंदन
नृत्य करू लागतो.ब्रम्हदेव व महिषासुर दोघेही नृत्य करू लागतात.
नृत्य चांगले रंगात आल्यावर....... (नृत्य अंदाजे 10 मिनीटे)
ब्रम्हदेव:
"भक्त माझा तूची खासा पाहता आनंदलो
सांग वत्सा काय देऊ मुदित तुजसी जाहलो
सोड संकोचास आता दे मला ती माहिती
रे महीषा बा कशाची ही तुला वाटे भिती
या तपाची योजना केलीस कोण्या कारणे
बोल आता जे हवे ते काय इच्छा मागणे......"
हे ऐकताच महिषासुर अत्यंत आनंदाने नृत्य करू लागतो. नृत्य रंगात आल्यावर....

महीषासूर:
"जिंकणे सा-या त्रिखंडा हेच आता लक्षणे
शत्रु मृत्यू पासुनी दे बा मला संरक्षणे
ब्रम्हदेवा दे वरा ना नाश कोण्या कारणे
कोणत्याही कारणाने ना मला कुणि मारणे......"

हे ऐकताच ब्रम्हदेव नृत्य करताना थोडा थबकतो. महिषासुराकडे पाहून
हसतो व पुन्हा नृत्य करत.....
ब्रम्हदेव:
"ते मला ही शक्य नाही फ़ोल ऐसे बोलसी
येत जन्मा जीव त्याचा होत मृत्यू खासची
माग काही राज्य किंवा त्या निराळे जे हवे
सांग काही जे असे अप्राप्य अन्य दानवे"

पुन्हा नृत्य......
महीषासूर:
"येत मृत्यू खास ऐसे सांगसी देवा तरी
कोणत्याही पुरुष हस्ते मरण ना ऐसे करी
कोणत्या काळी कधी येइल मृत्यू जो मला
मागणे ऐसेच तो येईल स्त्रीहस्ते मला"
महिषासुराचे हे बोलणे ऐकून ब्रम्हदेव मोठ्याने हसतो व ’तथास्तू नृत्य’
करू लागतो. नृत्य रंगात आल्यावर......

ब्रम्हदेव:
"तथ अस्तू मागसी तैसेच होई दानवाऽऽऽ तैसेच होई दानवाऽऽऽऽ तैसेच होई दानवाऽऽऽऽ "

हे ऐकताच महिषासुर अत्यंत आनंदाने बेभान होऊन नृत्य करू लागतो ब्रम्हदेव मात्र
गालातल्या गालात हसत महिषासुराच्या त्या बेभान नृत्याकडे पहात असतो.
ब्रम्हदेव नृत्य करीत रंगमंचावरून निघून जातो तरी महिषासुर बेभान होऊन नृत्य
करीतच रहातो. हळूहळू रंगमंचावर अंधार......

अंक पहिला प्रवेश दुसरा समाप्त
अंक दुसरा प्रवेश पहिला;
सूत्रधार रंगमंचावर नृत्य करताना दिसतात.
पहिला सूत्रधार:
"सुर त्राही किन्नराही त्या भये ते कापती
दैत्य म्हैषाच्या भयाने ठार मेले नृपती
देव आले फ़ार ज्यांना त्रास होऊ लागला
ब्रम्ह विष्णू वा शिवाला साकडे घालायलाsss,साकडे घालायलाsss,साकडे घालायलाsss"
सूत्रधार पटकन रंगमंचावरून जात क्षणभर रंगमंचावर अंधार.
रंगमंच प्रकाशतो तेंव्हा एकीकडे शंकर तपास बसलेले दिसत असून
बाजूलाच महाविष्णू शेषावर स्वस्थ निजलेला दिसत आहे
दुस-या बाजूने देवसेना प्रवेश करते व नृत्य सुरु होते. हे नृत्य सुरु असताना
रंगमंच्याच्या कोप-यात सुत्रधार येतो सुत्रधाराचे कथन सुरु असतानाच देव
शंकराला गा-हाणे घालत असलेले दिसतात.

पहिला सूत्रधार:
"ब्रम्हाचे वरदान कारण असे उन्मत्त म्हैशासुरी
सांगा काय उपाय यास वधणे तात्काल देवेश्वरी"

हे ऐकून शंकर विचारमग्न झालेला दिसत असून काहीच उपाय सुचत नाही
असा अभिनय करतो.
दुसरा सूत्रधार:
"आपुलाले दु:ख जेंव्हा सांगती देवाधिशा
त्यांस ही ना सापडे काही उपायच की तसा"

शंकर जमलेल्या देवांसहीत रंगमंचावर बाजूला शेषावर निजलेल्या
विष्णूंकडे या प्रश्नावर उपाय विचारण्यासाठी येतात. शंकरासहीत सर्व देव
आलेले पाहून विष्णू तात्काळ उठून सर्वांचे स्वागत करतो.

पहिला सूत्रधार:
"देवां त्या पुसताच शेष शयना वात्सल्य मूर्ती जशी
देता तो अभया तयास वदता चिंता नुरे फ़ारशी
देवांनी निज दु:ख त्यास कथले म्हैषी कसा मातला
दैत्याने अति तीन लोक पिडले स्वर्गास ही जिंकलाऽऽऽऽ जिंकलाऽऽऽऽ जिंकलाऽऽऽऽ"

विष्णू सर्वांचे बोलणॆ ऐकून घेतो.
विष्णू:
"ब्रम्हदेवे बोलले ते खरे
वावगेसे काय सांगा बरे?
नाश आहे दानवाचा खरा
मागण्यामध्येच आहे पहा"
शंकर:
"कोणती स्त्री सांग नारायणा
वधण्या येईल या दानवा?"
विष्णू:
"देवहो मी सांगतो मार्ग हा
दे करील आदिमाता पहा
आपुलाली शक्ति गोळा करा
अन महादेवीस त्या निर्मुया"

हे ऐकून सर्व देव विष्णूचे म्हणणे पटल्याचा अभिनय करतात.
तिनही देव देवसेनेसहीत महाशक्ति प्रकट करण्यास जातात रंगमंचावर हळूहळू अंधार
प्रवेश पहिला समाप्त.
--------------------------------------------------------------------------------------------------------
प्रवेश दुसरा
रंगमंच प्रकाशतो तेंव्हा ब्रम्हा विष्णू व शंकरासहित सर्व देव
वर्तुळाकारात नृत्य करीत असलेले दिसतात. वर्तुळाकारात नॄत्य करीत आपापली
सर्व शक्ति वर्तुळाच्या केंद्रस्थानी एकवटतात. तोच मोठा विजा कडाडल्यासारखा आवाज
होऊन मध्यभागी महादेवी प्रकट होते. देवीस दहा भूजा असून अनेक
उत्तमोत्तम वस्त्रालंकाराने ती नटलेली आहे. तिच्या प्रत्येक उजवीकडील हातात
अनुक्रमे, भाला,चक्र,खडग तलवार),धनुष्य व गदा ही शस्त्रे असून
प्रत्येक डाव्या हातात अनुक्रमे शंख,अग्नी,अंकुश,पाश व त्रिशूल ही आयुधे आहेत.
ती प्रकट झालेली पहाताच देव तिच्या तेजाने प्रभावीत होतात व अत्यंत विस्मयाने
तिच्याकडे पाहू लागतात. महादेवी प्रकट नृत्य करू लागते.

आदिमाया:
"सांगा हो सुर देवहो मज अता आवाहना कारणे
कोण्या संकट काय दु:ख हरणे कैचे असे मागणे"

एक देव:
"काय बोलू काय सांगू काय आम्ही सोसतो
स्वर्ग वासी देव आम्ही रान माळी हिंडतो"
दुसरा देव:
"दुष्ट म्हैशाने कशी केली पहा ऐसी दशा
स्वर्ग दे आम्हास पुन्हा उतरवी त्याची नशा"
तिसरा देव:
"इन्द्र चंद्रादीक त्याने जिंकले की स्वर्गिचे
ब्रम्हदेवाच्या वराने त्राहि त्राही होतसे"
आदिमाया:
"काय ऐसे वचन सांगा त्यास ब्रम्हाने दिले
कारणे त्या देव तुम्ही या दशेसी पावले"
ब्रम्हा, विष्णू, महेश:
"हाय सांगू काय माते ब्रम्ह म्हैशासी वदे
जे कधी ना पाहिले ना ऐकले ऐसे घडे
येइना म्हैशास मृत्यू कोणत्याही कारणे
देव नाही दैत्य नाही कोणतीही मानुषे
मारू ना शकती तयासी त्यास हे वरदानसे
येत मृत्यू कोण काळी हस्त स्त्रीचा तो असे"

हे ऐकताच आदिमाया त्यांस अभय नृत्य करीत अभय देते
आदिमाया:
"देवहो आश्वस्त ऐसा खेळते युध्दास मी
महिष दैत्ये मारते निर्दालते रण-अंगणी
ही पहा आताच निघते मारते म्हैशासुरा
देवहो आनंद तुम्ही वरि करा हो साजरा"

असे म्हणून आदिमाया आपले वाहन सिंहावर बसून तात्काळ महिषासुराशी
युध्द खेळायला निघते.महादेवी निघून जाताच सर्व देव तिच्या मागे युध्द
पहण्यासाठी तिच्या मागे जातात.
प्रवेश दुसरा संपतो.
-------------------------------------------------------------
प्रवेश तिसरा

रंगमंच प्रकाशतो तेंव्हा रंगमंचावर डाव्या बाजूस महिषासुराच्या राजमहालाचा देखावा असून
एका मंचकावर महिषासूर गाढ झोपेत असून मोठ्याने घोरत पडलेला दिसत आहे
रंगमंच्याच्या उजव्या बाजूस महिषासुराच्या महालाबाहेरील देखावा दिसत आहे
महालाबाहेरील असलेल्या स्वर्गिय उद्यानाच्या काठावर महादेवी
आपल्या वहानासमवेत बसून त्याच्याशी खेळत असलेली दिसत आहे.

रंगमंच प्रकाशीत झाल्यावर व प्रेक्षकांणा दृष्याचा अंदाज आल्यावर
सिंह मोठी गर्जना करतो त्याच्या मोठा आवाज होतो त्या आवाजाने महिषासुर
दचकून जागा होतो. तोच दोन दानवदूत नृत्य करीत तेथे येतात.
त्या दोघांपैकी एक सामान्य दूत व प्रधान असिलोमा हा असतो.

दूत:
"तळ्याकाठ स्त्री एक आहे महाराज ऽऽऽऽ,आहे महाराज
पहा काय लावण्य आहे महाराज ऽऽऽऽ,आहे महाराज
तिचे मुख तेजाळ आहे महाराज ऽऽऽऽऽ,आहे महाराज
अतीक्रूर सिंहास पाळे महाराज ऽऽऽऽ,आहे महाराज
तयापास खुषाल खेळे महाराज ऽऽऽऽ,आहे महाराज
तळ्याकाठ स्त्री एक आहे महाराज ऽऽऽऽ,आहे महाराज"

ते ऐकून महिषासुराला मोठे आश्चर्य व कौतूक वाटते
असिलोमा:
"पहाया अष्ट्भूजा सुंदरी ती
झणी राया चला की अप्सरा ती
मराली सुंदरी ती शस्त्र धारी
दशा अष्टे नवी शस्त्रे झळाळी
पराक्रमी दिसे राजा बहू ती
तुला बा पट्टराणी शोभते की"

हे ऐकताच प्रधानाचे खुषामती बोलणे ऐकून तो तात्काळ महादेवीस
बघण्यासाठी निघतो.......प्रधान अ दूत देखील जातात...
रंगमंचावर अंधार.... दुस-या बाजूने महिषासूर आपल्या प्रधान व दूतासमवेत
प्रवेश करतात व पहातात की अंबा आपले वाहन सिंह याच्याशी खेळताना
दिसत आहे. अंबेला निरखत निरखत महिषासुर तिच्याशी खुळावून भाषण करण्याचा प्रयत्न करू
लागतो. तेव्हा क्रोधित मुद्रेने अंबा त्याच्याकडे पहाते व म्हणते.

अंबा:
"महिषा रे दैत्य आसूरा बहू तू मातला
देवतांसी रे तुझा अत्यंत त्रासू जाहला
जगत सारे ग्रासले उन्मत्त तुझ्या वर्तने
जाहले आता प्रकट मी देवतांच्या प्रार्थने
सोड स्वर्गा पृथ्वि तू पाताळ ही जागा तुला
ना तरी युध्दात आता मारते रे मी तुला"

हे आदीमायेचे बोलणे ऐकून महिषासूर अत्यंत क्रोधीत होऊन
अंबेवर जोरदार चाल करून जातो. अशा प्रकारे घनघोर
युध्द सुरू होते. ते सतत नऊ दिवस चालते. शेवटी महिषासूर
आपल्या मायावि शक्तिंचा प्रयोग अंबेवर करू पहातो. परंतू
आदिमाया त्यास किंचीतही बधत नाही. असे बराच काळ युध्द नृत्य
झाल्यावर महिषासुर आपले सर्व बळ एकवटून मोठ मोठ्या
डरकाळ्या फ़ोडीत महदेवीर उडी घालतो. देवी ती उडी वरच्यावर आपल्या
भाल्यावर घेते आणि महिषासुराचे मस्तक धडापासून वेगळे करते.
तोच दोन्ही सूत्रधार मंचावर प्रकट होऊन

दोन्ही सूत्रधार: (पडलेल्या महिषासुराकडॆ पाहून)
"अंबेने मग घोर युध्द करता, निर्दाळले दानवा
भाल्याने बघ कंठ छेद करता आनंद झाला नवा"

सर्व देव रंगमंचावर प्रकट होऊन अंबेवर पुष्पवृष्टी करतात
तो दिवस विजयादशमीचा असून देव अंबेसमोर विजय नृत्य करू लागतात
विजय नृत्य सुरू असतानाच पडदा पडतो.

समाप्त

 

शोध 

चालली आहे कधींची सावल्यांची नेत्रपल्ली

या मनाच्या मांडवी जणू, वाढणारी विषवल्ली
भासते कधि नृत्य धीमे, गात आहे कुणि विराणी
भोवताली चाललेली बाहुल्यांची नाचगाणी

भास आहे मी म्हणू की सत्य आहे अंतरंगी
सत्य ही का भास आहे, मिथ्य आहे विविधरंगी

पाहतो त्यांचे इशारे हातवारे गूढ त्यांचे
अर्थ त्याचा मज कळेना फ़ेर धरुनी धुंद नाचे

‘ही’ खुणावे बाहुली, ‘ती’ बोलवे मजला समीप
येत आहे ती पहा पथ दाखवी घेऊन दीप

शांत आहे मी तरीही ना कळे हे काय चाले
सूत्रधारी कोण आहे वाटते गतकर्म बोले

कोणते परिमाण की जे तेच आहे सर्वकाळी
मावळे ना जे कधी वा रोज ते उगवे सकाळी

शक्य आहे की मुखीचे, बोल त्यांच्या ‘मौन’ बोले
न्यास त्यांच्या पावलांचे, स्तब्धसे पार्थीव हाले

कोण फ़ुंकी प्राण दे निष्प्राणल्या त्यांच्या शरीरी
हे असावे पद्म जलधी, जल जयाचे परि विषारी

ना कधी पडद्यापुढे का येत कोणी जो असे तो
शोध त्याचा मी करी पण सापडे ना व्यर्थ जातो

 

एक जमुरा मी तुझा

हे जादुगारा ,
एक जमुरा मी तुझा एक जमुरा रे
तुझाच प्रश्न तुझेच उत्तर
जरी मी वदतो रे ...
एक जमुरा मी तुझा एक जमुरा रे

चादरी खाली स्वत:स लपवून
हजरजबाबी उर्मट होऊन
जगा रिझवतो रे.....
एक जमुरा मी तुझा एक जमुरा रे

तूच शिकवले तयार केले
तुलाच ठकवून गमे जरी
मी टाळ्या घेतो रे ....
एक जमुरा मी तुझा एक जमुरा रे

या दुनियेच्या बाजारात
माझ्या सकट जाणे जरी
नच माझे काही रे ....
एक जमुरा मी तुझा एक जमुरा रे

 

           चौकट

काही क्षण नजर चोरून उभे राहतात- मान तुकवून...

तेव्हा फसवणूक कुणाची, कुणाशी?
त्या लाज वाटलेल्या क्षणांची, जीवनाशी;
की
आपली, त्या क्षणांशी....?

जगताना आपण तयार केलेल्या, बुर्‍याभल्याच्या चौकटी
आपल्यालाच आवळत जातात...

मग असे अवघड प्रश्न,
चौकट छेदूनच सोडवावे लागतात.

 हळवी ओंजळ

 अन्न, वस्त्र, निवारा
याच माणसाच्या मुलभूत गरजा
आणि चालणारा श्वास हेच अंतिम सत्य ,
बाकी सगळं झूठ!'
तुम्ही म्हणालात ठामपणानं.

हो कबूल,
पण श्वासांइतकंच आणि
श्वासांपलीकडेही
महत्त्वाचं असतं ना खूप काही,
जे रुजतं हिरव्यागार सळसळीतून,
उसळतं बेभान लाटांमधून,
उमगतं दूर दूर चालत जाणाऱ्या,
लाल, करड्या पाऊलवाटांमधून,
हुरहुरतं गच्च गच्च स्पर्शातून,
मावळतं कुणाच्या तरी वियोगातून.
असतं महत्त्वाचं खूप काही,
मीही म्हटलं ठामपणानं.
तर तुम्ही उगारलात आसूड छद्मी हास्याचा
अन मांडत राहिलात आपलाच मुद्दा
दुराग्रहानं, त्वेषानं...
अनेक स्वप्नभरल्या डोळ्यांना
हिणवत राहिलात तुम्ही अनंत काळ...

पण आता मीही ठाम
नाही पटवून द्यायचं
तुम्हाला काही पुन्हा पुन्हा,
या मुद्द्यावर!
दगडावर माथा आपटताना,
रक्तबंबाळ होणं
टाळायला शिकलं पाहिजे,
या मुद्द्यावर!

श्वासांपलीकडच्या आणि श्वासांइतक्याच
महत्त्वाच्या खूप काही गोष्टींसाठी
असावी लागते आपल्याजवळ एक हळवी ओंजळ...
ती तर नाही ना हिरावून घेऊ शकत
कुणी आपल्यापासून?
आता मीही ठाम या मुद्द्यावर!!!!

देव शोधून थकलो आम्ही

देव शोधून थकलो आम्ही
देव शोधून थकलो आम्ही, देव नाही, आणि देवपणहि नाही,
संत म्हणून गेले, 'देव माणसात शोधावा'
म्हंटल माणूस शोधून पाहावा
पण अंती कळले माणूस हि उरला नाही,
आणि जो उरला; त्याला माणुसकीच कळली नाही

             या पावलांना काय त्याचे !

थांबलो वळणावरी या पावलांना काय त्याचे 

मी इथे हे मन तिथे रस्त्यास माझ्या काय त्याचे

तू अता विसरुन जा हे ऐकतो येथे कितीदा
ह्रदय जळते आतुनी या शाब्दिकांना काय त्याचे
आठवांची अंतरी वसवून गेलो घरकुले जी
मी ति़थे जाता क्षणी या वादळांना काय त्याचे
ठेविली सांभाळुनी बघ आसवें डोळ्यात हळवी
तू पहावे त्या क्षणी या पावसाला काय त्याचे
हे असे चोचीतुनी एकेक काडी आणताना
वळचणी छळती उरी या पाखरांना काय त्याचे
भावनांच्या संगती मी हिंडलो माझ्या अभाळी
तेथुनी अंधारले या चांदण्यांना काय त्याचे
हारलो रे शेवटी ना गवसलो माझाच मजला
भोगतो मृत्यू इथे या जीवनाला काय त्याचे

                                शिवरायाचे चित्र 

 

कळू लागल्या पासून राजे
चित्र काढू लागलो तुमचे
मंदिल मोती धारधार नाकाचे
टोकदार दाढी तेजस्वी डोळ्यांचे

पण आता काढत नाही
कारण काढायची गरजच नाही
इतके ते हृदयात ठसले आहे
आमचे हृदयच झाले आहे

तुमचे नाव मनात उमटताच
अनामिक भावनांचा पूर येतो
देहातील पेशी पेशी स्फुरित होतो
कण कण तुम्हाला मुजरा करतो

कवी संत आणि शाहिरांनी
गाईलेले तुमचे तेजस्वी यशोगान
ऐकताच आदरान अभिमानान
ओतप्रोत भरून जाते मन

लाखो मराठी मनातील प्रार्थना
उमलू लागते माझ्या मना
या राजे या आता पुन्हा
इथे फिरूनिया जन्मा

सागरगोटे पट कवड्या अन् सापशिडी व्यापार मिळाले

सागरगोटे पट कवड्या अन् सापशिडी व्यापार मिळाले
साधा माळा आवरला तर कसला होतो मूर्ख कळाले

उडलो पडलो झेलत गेलो दान जाहलो गिळला गेलो
राणीचा मी बाग भासलो भायखळ्यावर लुटला गेलो
मरीन लाइन फ्लोरा फौंटन विमानतळ अन् चर्नी रस्ता
ठिकठिकाणी ठरला गेलो जरुरीवरती म्हैंगा सस्ता

तेव्हा तो व्यापार जरा मी शिकलो असतो तर आयुष्या
विनाशिडीचाही मी चढलो असतो वर सरसर आयुष्या
अश्या फेकल्या असत्या कवड्या कोटींमध्ये खेळत असतो
उडवत असतो दुर्दैवाला संधींना मी झेलत असतो

पण सांगू का......??????
पण सांगू का नाळ निरागसतेशी माझी तुटली असती
अब्जाअब्जाच्या भावांची लाखो नाती तुटली असती

चिंता नसती परवाच्या त्या जिवंत उरण्याच्या खर्चाची
चिंता असती 'कुणास सांगावे मी जिवंत आहे' याची

बालपणीच्या खेळामध्ये आयुष्याची शिकवण असते
ज्या ज्या घरास माळा असतो त्या त्या घरास घरपण असते

 

Tuesday 23 October 2012

Man Jumps from Building to Propose His girl..really Amazing..(shocking too) 

                   

          Arab Enjoys with Pillow really funny

                        

        Very Funny.The craziest Cat Ever 

                    

                        funny crazy cats 

                   

Monday 22 October 2012

                    Baby Sneeze and falls

                

           
                                        Best Street Performance 

                                                                                     
                                        

                           संता आणि  बॉस

संता पगाराचा चेक घेवून बॉसकडे गेला आणि म्हणाला....
 संता -  माझ्या प गारात दोनशे रूपये कमी आहेत...
 बॉस -  मागच्या महिन्यात मी तुला दोनशे रूपयांचा जास्तीचा चेक दिला होता, तेव्हा तु काहीच तक्रार केली नाहीस ? 
 संता - ती तुमची पहिलीच चुक होती...  म्हणुन मी लक्ष नाही दिले....  
 पण चुका करण्याची सवय तुम्ही लावून घेतली तर मला सांगावच लागेल ना...

                       चायनीज बोकड !

संता मार्केटमध्ये जातो तेव्हा...
संता: काका, बोकड किती रुपयांचा आहे ?
दुकानदारः 200 रुपये.
संता: इतका स्वस्त?
दुकानदारः अरे, हे बोकड चायनीज आहे.
संता: त्याची गॅरंटी!
दुकानदार: नो गॅरंटी...तो उद्या भूंकूही शकतो !!!

          माझा वस्तरा कसा काय वाटला ?


गि-हाईकाची दाढी करून झाल्यावर न्हाव्यानं त्याला विचारलं, "साहेब! माझा वस्तरा कसा काय वाटला तुम्हाला?"
गि-हाईक म्हणाले," न्हावीदादा, तुमच्या वस्तऱ्याला खरोखरच जगात तुलना नाही. तुम्ही वस्तऱ्यानं माझी दाढी करीत आहात, असं मला वाटलंच नाही."
हे ऐकून एकदम खुषीत आलेल्या न्हाव्यानं विचारलं, "असं? मग मी तुमच्या गालांवरून वस्तरा फिरवीत असताना तुम्हाला नेमकं कसं वाटत होतं?
गि-हाईक म्हणाले, "खरं सांगायच तर, तुम्ही हाती खरखरीत पॉलिशपेपर घेऊन माझे गाल जोरात घासत असल्याचा मला भास होत होता."

                   उंदीर पळताहेत 

 

ग्राहक : वेटर जरा लवकर खायला आण. भुकेने पोटात उंदीर पळताहेत.

वेटर : साहेब, पहिल्यांदा खायला आणू की उंदीर मारण्याचं औषध घेऊन येऊ.

                प्रेयसी आणि  प्रियकर


एक गोष्ट सांग, वजन, उंची, लांबी मोजण्यासाठी युनिट (घटक) आहे...
 तर, प्रेम, दोस्ती आणि विश्वास मोजण्यासाठी का नाही?
 प्रियकर (बराच वेळ प्रेयसीकडे पाहत म्हणाला)...
 हे बघ, माझे डोके खाऊ नको, उगाच मार खाशील, एकतर आधीच मी फिजिक्समध्ये नापास आहे...!!!

 

                  बायको आणि नविन शेजारी 

बायको आपल्या नव-याला म्हणते....
 बायको : खिडकीला पडदे लावा......नवीन शेजारी मला नेहमी लपून पाहण्याचा प्रयत्न करतो....
 

नवरा : एकदा त्याला नीट पाहून घेऊ दे.... तो स्वतःच त्याच्या घराच्या खिडकीला पडदा लावेल...