chitika

Wednesday, 24 October 2012

             या पावलांना काय त्याचे !

थांबलो वळणावरी या पावलांना काय त्याचे 

मी इथे हे मन तिथे रस्त्यास माझ्या काय त्याचे

तू अता विसरुन जा हे ऐकतो येथे कितीदा
ह्रदय जळते आतुनी या शाब्दिकांना काय त्याचे
आठवांची अंतरी वसवून गेलो घरकुले जी
मी ति़थे जाता क्षणी या वादळांना काय त्याचे
ठेविली सांभाळुनी बघ आसवें डोळ्यात हळवी
तू पहावे त्या क्षणी या पावसाला काय त्याचे
हे असे चोचीतुनी एकेक काडी आणताना
वळचणी छळती उरी या पाखरांना काय त्याचे
भावनांच्या संगती मी हिंडलो माझ्या अभाळी
तेथुनी अंधारले या चांदण्यांना काय त्याचे
हारलो रे शेवटी ना गवसलो माझाच मजला
भोगतो मृत्यू इथे या जीवनाला काय त्याचे

No comments:

Post a Comment