हे दूध गायींचे आहे आणि या गायींची ऐटही एखाद्या व्हीआयपीपेक्षा तसूभरही कमी नाही. खाणे-पिणे आणि राहणीमान सगळेच आलिशान. पुणे जिल्ह्यात भीमाशंकरच्या पायथ्याला 35 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या डेअरीतील प्रत्येक गायीसाठी केरळहून मागवण्यात आलेला कॉयरफोमची रबर कोटिंग्ची गादी आहे. प्रत्येकाची किंमत 7 हजार रुपये आहे. या गायींना अल्फा अल्फा गवत, ओट्स, कॉटन सीड्स असा हायप्रोटीन खुराक आहे. दररोज अंघोळीसाठी मल्टीजेट शॉवरही आहे. 35 एकर फार्म हाऊसवर त्या मोकळ्या फिरतात. त्यांना राहण्यासाठी वेगळी, खाण्यासाठी वेगळी, तर झोपण्यासाठी वेगळी जागा आहे. हे महागडे दूध दक्षिण मुंबई, बांद्रे आणि पुण्यातील मोजक्याच 4 हजार धनिकांच्या घरी दररोज सकाळी पोहोचते.
महाराष्ट्रातले 65 टक्के दूध भेसळयुक्त असल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. मात्र, या डेअरीतील दूध यापेक्षा वेगळे आहे. गायीच्या आचळातून थेट ग्राहकाच्या ओठापर्यंत पोहोचेपर्यंत या दुधाला मानवी स्पर्श होत नाही. यात ना ‘प्रिझर्व्हेटिव्हज्’ असतात ना अँटिबायोटिक्स वा इतर रासायनिक घटक. एवढेच काय, आजारी गायीचे दूधच काढले जात नाही. डेअरीचे व्यवस्थापनच मुळी ‘आनंदी गायीचे दूध गोड’ या संकल्पनेवर आधारित आहे. पराग मिल्क फूड्सचा भाग्यलक्ष्मी फार्मवर होलस्टिन फ्रिझन जातीच्या 3 हजार गायी आहेत. सुमारे 35 कोटींची गुंतवणूक आणि फ्रान्स, र्जमनीतले अद्ययावत तंत्रज्ञान असलेला हा ‘फार्म’ देशात अत्याधुनिक ठरावा. ‘पराग’चे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी सांगितले की, अमेरिका-ऑस्ट्रेलियातील मोठय़ा डेअरी फार्मसवरील गायींना बसण्यासाठी वापरल्या जाणार्या रबर गाद्या केरळातून जातात. देशात त्या कोणी वापरत नाही. आमच्या गायींसाठी आम्ही त्या आवर्जून वापरतो. गायी 24 तास मोकळ्या असतात. त्यांना हवे तेव्हा दज्रेदार खाद्य आणि बिस्लेरीइतके शुद्ध पाणी सहजी मिळेल अशी व्यवस्था आहे. रवंथ करण्यात गायींची 70 टक्के ऊर्जा खर्च होते. ते टाळण्यासाठी हा प्रपंच.’
असे केले मार्केटिंग - श्रीमंतांच्या खिशातून पैसे काढणे सोपे नाही. दर्जा, गुणवत्तेशी किंचितही तडजोड ते स्वीकारत नाहीत. 75 रुपयांचे दूध घेणारा वर्ग खूप चोखंदळ आहे. सुरुवातीला त्यांच्या घरी जाऊन ‘फ्री सॅम्पलिंग’ केले. चव, दर्जातला फरक त्यांना लगेच जाणवला. दूध त्यांच्यापर्यंत कसे पोहोचते, याचे ‘प्रेझेंटेशन’ दिले. अनेकांनी प्रत्यक्ष फार्मवर येऊन सगळ्याची खात्री करून घेतली.’ - देवेंद्र शहा
दुधाची किंमत का वाढते?
* मुंबईत विकले जाणारे दूध 36 ते 48 तासांचा प्रवास करून येते. ‘पराग’चे दूध काढल्यापासून 8-10 तासांत ग्राहकाला मिळते.
* धार काढण्यापुर्वी गायींना इलेक्ट्रॉनिक ट्रान्सपाँडरमधून जावे लागते. संसर्ग झालेल्या, आजारी गाय असल्याचे या यंत्रणेतून आपसूक बाजूला होते.
No comments:
Post a Comment