chitika

Sunday, 28 October 2012


   रंगसंगती

वर्तमान रंगवत असताना
एखादा हवा असलेला
रंग सापडतच नाही!
त्या सारखा
इतर कुठलाच रंग
हव्या असलेल्या
रंगसंगतीशी जुळत नाही.

अवचितच भुतकाळ
हात धरत धरत
खूप खूप मागे नेतो

तिथे भेटतात
कधीकाळी चितारलेली
वेड्यासारखी रंगवलेली
काही स्वप्ने!

फक्त त्या स्वप्नांपाशीच असतो
हवा असलेला तो रंग
पण तो मी घेणार
इतक्यात आवाज येतो
"ती तर केंव्हाच भंग झाली आहेत"

वर्तमानाचे ते चित्र बिचारे
त्या रंगाविना नापंसत ठरते
आणि आजमितीच ठाऊक असलेले
रंगेल जग... हवे तसे
त्याला नावे ठेवते...

No comments:

Post a Comment