chitika

Wednesday, 24 October 2012

           चौकट

काही क्षण नजर चोरून उभे राहतात- मान तुकवून...

तेव्हा फसवणूक कुणाची, कुणाशी?
त्या लाज वाटलेल्या क्षणांची, जीवनाशी;
की
आपली, त्या क्षणांशी....?

जगताना आपण तयार केलेल्या, बुर्‍याभल्याच्या चौकटी
आपल्यालाच आवळत जातात...

मग असे अवघड प्रश्न,
चौकट छेदूनच सोडवावे लागतात.

No comments:

Post a Comment