एक जमुरा मी तुझा
हे जादुगारा ,एक जमुरा मी तुझा एक जमुरा रे
तुझाच प्रश्न तुझेच उत्तर
जरी मी वदतो रे ...
एक जमुरा मी तुझा एक जमुरा रे
चादरी खाली स्वत:स लपवून
हजरजबाबी उर्मट होऊन
जगा रिझवतो रे.....
एक जमुरा मी तुझा एक जमुरा रे
तूच शिकवले तयार केले
तुलाच ठकवून गमे जरी
मी टाळ्या घेतो रे ....
एक जमुरा मी तुझा एक जमुरा रे
या दुनियेच्या बाजारात
माझ्या सकट जाणे जरी
नच माझे काही रे ....
एक जमुरा मी तुझा एक जमुरा रे
No comments:
Post a Comment