chitika

Tuesday, 16 October 2012

                            ज्ञानप्राप्ती
स्वप्नीलने त्याच्या वडिलांना विचारले "" युद्ध कसे सुरू होते? '' वडील उत्तरले "" समज पाकिस्तान आणि जपान यांच्यात भांडण सुरू झाले'' त्याचवेळी तेथे आलेली स्वप्नीलची आई म्हणाली "" पाकिस्तान आणि जपान यांच्यात भांडण कसे होईल ? '' वडील उत्तरले "" अग मी केवळ उदाहरणासाठी त्याला सांगतोय ? त्यानंतर दोघांच्यात यावरून जोरदार चर्चा सुरू झाली
आई- पण तुम्ही त्याला चुकीचे शिकवताय
बाबा- मी बरोबर आहे, मी केवळ उदाहरण देतोय
आई- नाही तुम्ही चूक करताय
बाबा- तू मला भडकावू नकोस
आई- तुम्ही अडेलतट्टूपणा करताय
बाबा- तुझे शब्द आवर नाहीतर एक ठेवून देईन
हे सर्व ऐकून स्वप्नील म्हणाला तुम्ही दोघेही भांडू नका, युद्ध कसे सुरु होते ते मला समजले.
 

No comments:

Post a Comment