JOKE : संताचे तीन मुले
सरकारच्या नवीन नियमानुसार ५ मुले असल्यास एक घर मिळणार. हे ऐकून...
संताचे तीन मुले असतात,
तो त्याचा बायकोला म्हणतो शेजारच्या चौबेची दोन मुले माझी आहेत, मी जाऊन घेऊन येतो .
(ती मुले आणल्यावर)
आपले तीन मुले कुठे गेले..??
बायको:- ज्यांचे होते ते घेउन गेले .
JOKE : संता मेडिकलच्या दुकानात
संता मेडिकलच्या दुकानात जातो.
संता(दुकानदाराला) : एक विषाची बाटली द्या...
दुकानदार - प्रिस्क्रिप्शनशिवाय विष देता येत नाही.
संता :( दुकानदाराला लग्नाची पत्रिका दाखवत) हे घ्या.
दुकानदार : बास कर मित्रा.....रडवशील का! विषाची मोठी बाटली देऊ का छोटी???
JOKES : संताचे टेन्शन...
संता आणि बंता गप्पा मारत बसलेले असतात...संता - यार, माझे केस फार गळत आहेत...
बंता - कशामुळे ?
संता: टेन्शनमुळे...
बंता - कोणत्या गोष्टीचं टेन्शन आहे तुला ?
संता - केस गळण्याचे...
शिवी कशाला म्हणतात?
शिक्षक विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारतात...
शिक्षक - शिवी काय आहे?
विद्यार्थी - एखाद्याचा राग आल्यानंतर अशुद्ध शब्दांच्या एका वाक्याचा
उच्चार केल्यानंतर व्यक्तीच्या मनाला जो शांतीचा अनुभव होतो त्याला शिवी
म्हणतात....!!!!
ठमाकाकूचे जावई
रमाकाकू : काय ठमाकाकू, काय म्हणतात तुमचे जावई?
ठमाकाकू : काय सांगू, छोट्याछोट्या कारणांनी माहेरी जाण्याची धमकी देत असतात.