chitika

Sunday, 7 October 2012

comedy picture

 comedy picture
 

Thursday, 4 October 2012

                                                             बंडया

बंडया रडत-रडत घरी आला. बाबांनी विचारलं , ' काय झालं बंडया ?'

बंडया : सरांनी मला मारलं.बाबा : तूच काहीतरी आगाऊपणा केला असशील. बंडया : नाही बाबा
, सरांनी प्रश्न विचारला की , सांग बरं , ३ लिंगं कुठली ? मग मी

म्हटलं
, पुल्लिंग , स्रीलिंग आणि नपुंसकलिंग.

बाबा : बरोबर उत्तर आहे. मग त्यांनी का मारलं तुला
? बंडया : त्यांनी विचारलं याची उदाहरणं सांग. तेव्हा मी म्हणालो , तो फळा , ती शाळा आणि ते सर. 
                                             परवडत नाही

सर - गण्या गाढवा , वर्गात मुलींशी गप्पा मारत का बसतोस ?

गण्या - सर मी खूप गरीब आहे हो. मला एसएमएस , चॅटिंग परवडत नाही हो. 
                                                              आत्महत्या

गंपूः मी ट्रेनखाली आत्महत्या करायला चाललोय ?

झंपूः मग डबा कशाला ?

गंपूः ट्रेनचा काय भरंवसा ? लेट असेल तर भुकेने मरू काय ?
                          गंपूच गणित 

शिक्षक : ३ अधिक ३ किती ?  
गंपू : दहा
शिक्षक : कसे काय ?
गंपू : चुकून!
                                                         संता आणि बंता 

संता-बंताला चेस खेळण्याचा जाम मूड आला होता.
संताः बंत्या , लेका चल बऱ्याच दिवसात चेस खेळलो नाही आपण.
बंताः नक्की खेळायचंय का ?
संताः अरे म्हणजे काय.. चल ना.
बंताः बरं. एक काम कर.. तू पुढे जा. मी स्पोर्टस शूज घालून येतो
.
                                                      डेअरी मिल्क 

मुलगी : आपल्या रोज रोजच्या भांडणांचा मला कंटाळा आला आहे.. मला तुझ्याशी ब्रेकअप करायचे आहे..

मुलगा : बरं...हे घे
, चॉकलेट खा....

मुलगी : ओहह... मस्का मारतोयस..
??..

मुलगा : नाही... माझी आई म्हणते
, " कोणतेही शुभ काम करण्याआधी तोंड गोड करावं."